सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

‘बॅरिस्टरांची माफी’ म्हणजे नेमके काय ?

ग्रेज इनच्या न्यायमंडळाने निर्णय दिला की, आपण राजकारणात कधीही भाग घेणार नाही, अशी लेखी हमी  सावरकर यांनी द्यावी, तशी हमी दिली तरच त्यांना बॅरिस्टरची सनद देण्यात यावी. अर्थातच हा निर्णय सावरकर यांनी स्वीकारला नाही. बॅरिस्टरची अशी सदन मिळवणे हे त्यांचे ध्येयच नव्हते. तर त्यांचे ध्येय होते आपला देश स्वतंत्र करून त्याला महान आणि मोठा बलवान करणे. परिस्थितीपुढे शरण न जाता देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर गेल्या काही काळापासून राजकीय स्वार्थासाठी आरोपांची विशेष करून त्यांनी तुरुंगातून सुटका करण्यासाठी केलेल्या अर्जावरून ज्या लोकांनी नाचक्की केली त्यांना मुळात माफी, लाचारी, दिलगिरी यांचे अर्थ कळत नसावेत किंवा ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी ढोंगीपणाचा आणि निर्लज्जगडाच्या पायऱ्या चढत असावेत, असेच दिसून येते.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅरिस्टर होण्यासाठी विलायतेला प्रयाण केले. त्यासाठी त्यांना मिळालेली शिष्यवृत्ती, त्यानिमित्ताने त्यांचा इंडिया हाऊसमधील निवास या साऱ्या बाबींवर ब्रिटिशांचेही नेमके लक्ष होते. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठीची असणाऱ्या ग्रेज इनच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. परंतु त्यांना आणि हरनामसिंग यांना बॅरिस्टरची सनद देण्यास न्यायमंडळाने नकार दिला. यावर सावरकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.  ब्रिटिश बेरके होतेच त्यांनी त्यांनी या तक्रारीचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीच्या वकिली डावपेचांना आणि तिने केलेल्या उलट-तपासणीला सावरकरही पुरून उरले. या समितीला हिंदुस्थानातील  सरकारचे साहाय्य होते. तरी देखील या समितीला सावरकरांविरुद्ध कोणताच आरोप सिद्ध करता आला नाही. इतके होऊनही या ग्रेज इनच्या न्यायमंडळाने निर्णय दिला की, आपण राजकारणात कधीही भाग घेणार नाही, अशी लेखी हमी  सावरकर यांनी द्यावी, तशी हमी दिली तरच त्यांना बॅरिस्टरची सनद देण्यात यावी. अर्थातच हा निर्णय सावरकर यांनी स्वीकारला नाही. बॅरिस्टरची अशी सदन मिळवणे हे त्यांचे ध्येयच नव्हते. तर त्यांचे ध्येय होते आपला देश स्वतंत्र करून त्याला महान आणि मोठा बलवान करणे. परिस्थितीपुढे शरण न जाता देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते.

आता प्रश्न असा आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तेव्हाच ही ग्रेज इनच्या न्यायमंडळाची अट पूर्ण केली असती तर माफीच्या अर्जावरून आणि त्या आधारे अर्धवट आणि सोयीस्कर माहितीच्या आधारावर सावरकरांवर निर्बुद्धपणे आरोप करण्याची वेळही सध्याच्या आततायी लोकांवर आली नसती. काँग्रेस आणि संलग्न व्यक्तींनी जो सावरकर यांच्याविरोधात सावरकर यांनी माफीसाठी ब्रिटिशांकडे याचना केली होती, असे मूर्खपणाने आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन टिमणे लावले आहे, त्याला आळा नक्की बसला असता. पण तसे काही झाले नाही. सावरकर यांनी ग्रेज इनच्या न्यायमंडळाने जी हमी मागितली होती, ती देण्यास नकार दिला. त्यांना व्यापार, व्यवहार जमला नाही...

मग इतके सारे होऊनही भारतात अनेक बॅरिस्टर कसे काय निर्माण झाले. काही तर म्हणतात की, बॅरिस्टर होण्यासाठी ब्रिटिशांच्या चरणी निष्ठा वाहाव्या लागत होत्या. बरं, सर्वच बॅरिस्टर काही राजकारणात भाग घेत होते असे नव्हे, पण जे राजकारणात बॅरिस्टर होते, जे बॅरिस्टर राजकारणी होते त्यांना ग्रेज इनच्या न्यायमंडळाने काहीच कशी पृच्छा केली नाही, की न्यायमंडळाने ब्रिटिश सत्तेशी, राजसिंहासनाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना आपणाहून सनद बहाल केली... याचा शोध मात्र आता घ्यावा लागेल.

 - रवींद्र यशवंत बिवलकर

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...