बुधवार, २९ मार्च, २०२३

भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व आता कोणाकडे?

 सुरतमधील न्यायालयाच्या निर्णयाचे सध्या केवळ निमित्त आहे. पण मूळ उद्देश काँग्रेस मोदीविरोधी आघाडीतील घटकांकडूनही दुर्लक्षित होत असल्याची भीती अधिक असल्याने काहीही करून आपले महत्त्व वाढवण्यासाठी राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर - मोदी सरकार (भीष्मासारख्या ) हल्ला करण्यासाठी वापरले गेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी हे काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही त्यांच्यातील दावे, भेद यांचे निमित्त करीत सावरकरांच्या वर्तनाबद्दल अद्वातद्वा बोलले तरी कोणाला काही पडलेले नसेल, या कुहेतूने राहुल गांधींचे वक्तव्य सुरूच आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात करून लोकांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. भारताचे खरे दर्शन घेत लोकांपर्यंत संपर्क साधण्याचा त्यांचा प्रयत्न, काही भाजप नेत्यांनीही कोतुक केले.. त्यानंतर त्याच यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही अवमानकारक टिप्पणी करीत, अतार्किक आणि पूर्ण माहितीही न घेता केवळ सावरकर यांच्यावर बेताल बोलावयाचे असा वसाच घेतलेले इंदिराजींचे नातू आणि नेहरुजींचे पणतू यांनी ज्या पद्धतीने विसंगत व्यक्तिमत्त्वाने अतार्किकपणा दाखवला तसेच भाजपावरील जोरदार टीकाक्रमण करण्याच्या नादात पत्रकारांनाही सुनावले आणि बेताल वक्तव्ये करीत आपल्या वर्तनाबद्दल खंतही व्यक्त करण्याचे नाकारले, त्यामुळे सर्वबाजूंनी त्यांच्यावर आता  भडिमार होत आहे.

मुळात त्यांनी असे का केले हा प्रश्न पडत असतो. खरे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मधील निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले. 

तत्पूर्वी अटलबिहारी वाजपे यांचे सरकार भाजपाला घेऊन सत्तास्थानी आले असताना त्यावेळी सावरकरांबद्दल त्यांनी आस्था दाखवून, त्यांना मान देत मोठी सन्मानाची भाषा केली होती. त्यावेळीही तत्कालीन काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपली गरळ ओकली होती आणि दंशही देशाच्या सन्मानाला केला होता.  पण मोदी आल्यानंतर मात्र हिंदु मतांचे आणि हिंदुंचे ध्रुवीकरण झाले हे प्रमाण वाजपेयींच्या काळापेक्षा अधिक प्रभावी होते, ही बाब काँग्रेसला पूर्ण कळलेली आहे. त्यामुळेच हळू हळू काँग्रेस नेतृत्वाच्या पोकळ डाव्या विचारसरणीला मानणाऱ्या मुस्लीम नेत्यांनी व वरिष्ठ नेत्यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडणेच पसंत केले.

यातच मोदी यांनी लोकसभेच्या दुसऱ्या मुदतीवरही अधिक प्रभावी ताबा घेतल्याने काँग्रेसच्या ताकदीलाही मोठा फटका बसला. पण त्याही पेक्षा मोठा फटका बसला तो मोदींना विरोध करणाऱ्या, भाजपाला सत्तेवरून खाली कसे आणावयाचे हा विचार करणाऱ्या आघाडीच्या संबंधात काँग्रेस नगण्य ठरू लागली. काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दलही फार विश्वास अन्य आघाडी घटकपक्ष वा नेते वा कार्यकर्ते यांना वाटत होता, तो शिल्लक राहिला नाही. ही बाब काँग्रेसला भाजपाकडून स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवापेक्षा अधिक घातक आणि बोचरी होती.  साहजिकच त्यामुळे ममता बॅनर्जी, शरद पवार, नितीशकुमार इतकेच कशाला अगदी उद्धव ठाकरे यांच्याकडेही भाजपाविरोधी वा मोदी विरोधी नेतृत्वाची धुरा देता येईल का याचा विचार होऊ लागल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकणे साहजिक आहे. यासाठीच कुठून तरी काही का होईना आपले महत्त्व, आपला भाजप- मोदीविरोध भक्कम करीत हिंदुध्रुवीकरणाने एकवटलेल्या मतांखेरीज असणआरी अन्य मते व अहिंदुंची मते व मतदार यांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा खेळ खेळला गेला. यातम स्वातंत्र्यवीर सावरकरांना लक्ष्य करण्याचा भीषण प्रकार केला गेला. सुरतमधील न्यायालयाच्या निर्णयाचे सध्या केवळ निमित्त आहे. पण मूळ उद्देश काँग्रेस मोदीविरोधी आघाडीतील घटकांकडूनही दुर्लक्षित होत असल्याची भीती अधिक असल्याने काहीही करून आपले महत्त्व वाढवण्यासाठी राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर- मोदी सरकार (भीष्मासारख्या ) हल्ला करण्यासाठी वापरले गेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी हे काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही त्यांच्यातील दावे, भेद यांचे निमित्त करीत सावरकरांच्या वर्तनाबद्दल अद्वातद्वा बोलले तरी कोणाला काही पडलेले नसेल, या कुहेतूने राहुल गांधींचे वक्तव्य सुरूच आहे. त्यामुळेच सावरकर आणि रा. स्व. संघ यांच्यात असलेल्या संबंधांबद्दल स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कानपिचक्या दिल्या आहेत. हे म्हणजे काँग्रेसचे अर्थात राहुल गांधी यांचे चाळे अति झाल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना अखेर बोलावे लागले, तोपर्यंत ते मौनं सर्वार्थं साधनम अशा वृत्तीने गप्पच होते. 

आता या सर्व पार्श्वभूमीवर  खरे म्हणजे जनतेच्या दृष्टीने काही फरक पडणार नाही. कारण हिंदु मतदारांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी ताकद भाजपाकडे राहिली आहे, (अन्य हिंदु राजकीय ताकद नसल्याने) पण मोदी विरोधी - भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यास कोण लायक असेल याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले जाईल. राजकारणाच्या या धुरळ्यात सर्वसामान्य जनता मात्र नेहमीप्रमाणे वंचित आघाडीसारखीच एकाकी पडणार हे मात्र नक्की!

- रवींद्र यशवंत बिवलकर


फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...