तथाकथित धर्मनिरपेक्ष घटनेचा पराभव;
हिंदु मुस्लिमांचा हा करंटेपणाच!
‘धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे आणि ते म्हणजे विज्ञानबळ. पोथिनिष्ठ व्हावे का, मुसलमानासारखे आम्हीही पोथीनिष्ठ व्हावे का, यावर चर्चा - तुलना करताना ते खोचकपणे सांगतात की आम्ही हिंदुनीही आमच्या प्राचीन रुढी नि धर्मसमजुती आहेत त्या धर्मभोळ्या नि हास्यास्पद आहेत, तरीही त्या मुसलमानांप्रमाणे धर्मकडवेपणा संचारविण्यासाठी पाळल्या पाहिजेत. इतके सांगून ते थांबत नाहीत, तर पोथिनिष्ठपणामुळे मुसलमान समाज एकवटला आहे, प्रबळ होत आहे. मात्र त्यामुळे मुसलमानांचीही दुर्दशा होत असल्याचे ते स्पष्ट सांगतात.
रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ब्रिटिशांनी अटी लादल्या होत्या. त्या अटींना पाळणे गरजेचे आणि अत्यंत आवश्यक होते. त्यामुळेच त्या अटी पाळूनही त्यांनी राष्ट्रहितासाठी सामाजिक दृष्टिकोन स्वीकारला आणि हिंदु धर्मातील जातिभेदाच्या आणि कुप्रथांच्या रितींना- रिवाजांना तीलांजली देण्याचे पाऊल अतिशय ठामपणे उचलले. हे करीत असताना हिंदु धर्म, त्यातील वर्णव्यवस्था, त्यातील जाति-उपजातिव्यवस्था इतकेच नव्हे तर अगदी तळातल्या अस्पृश्य मानल्या जात असलेल्या जातिंमध्येही असणारी वर्णव्यवस्था वा भेद आणि त्यासाठी होत असणारे वर्तन त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे अभ्यासले आणि त्यावरही त्यांनी आघात केले. त्यामुळे छोट्या छोट्या जातीनिहाय असणारा जातिभेदही नष्ट होणे कसे गरजेचे आहे, हे त्यांच्या पूर्ण लक्षात आले होते. राजकीय कामात सहभागी न होण्याच्या अटीवर त्यांची अंदमानातून रत्नागिरीला केलेली स्थानबद्धतेमधील रवानगी ही प्रत्यक्ष स्वीकारणे आणि तसे जगणे सोपे नव्हते. राष्ट्रहित, स्वातंत्र्य यासाठी राजकीय क्षेत्र हा मुख्य आधार असतो हे जरी खरे असले तरी मुळात राजकारण ज्यांच्यासाठी करावयाचे असते, त्या समाजाला सुधारणेही राष्ट्राच्या उभारणीसाठी किती गरजेचे आहे, हे सावरकरांना अतिशय अचूकपणे कळले होते. यासाठीच त्यांनी ब्रिटिशांच्या या अटीमधूनही आपले ध्येय साधण्यासाठी सुरुवात केली, रत्नागिरीसारख्या एकेकाळी अति कर्मठ अशा हिंदू धर्मियांच्या भागात त्यांनी केलेली ही कामगिरी तशी ‘लिटमस टेस्ट’च होती. जातिभेदांना नष्ट करताना काही अपरिहार्यताही आहे हे देखील त्यांना माहिती होते, त्यामुळेच सर्व बदल काही अकस्मात आणि झटक्यात होतील, असे त्यांचेही अजिबात मत नव्हते. त्यामुळेच जातिसंघांबाबतचे धोरण काय असावे, ते त्यांनी अतिशय तपशीलवारपणे विश्लेषित केले आहे. जात्युच्छेदक निबंधांमध्ये किर्लोस्कर मासिकातील मार्च १९३७ च्या अंकातील लेख समाविष्ट केला गेला आहे, तो यासाठी अभ्यासनीय आहे. याच मासिकाच्या जून १९३७ मधील अंकातील लेखामध्ये त्यांनी हिंदू धर्माला खऱ्यादृष्टीने एक दिशा दिली आहे, ती म्हणजे हिंदु आणि हिंदुराष्ट्राची दृष्टी ही पोथीनिष्ठ न राहाता विज्ञाननिष्ठ असली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
त्यांचे म्हणणे होते की, ‘धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे आणि ते म्हणजे विज्ञानबळ. पोथिनिष्ठ व्हावे का, मुसलमानासारखे आम्हीही पोथीनिष्ठ व्हावे का, यावर चर्चा - तुलना करताना ते खोचकपणे सांगतात की आम्ही हिंदुनीही आमच्या प्राचीन रुढी नि धर्मसमजुती आहेत त्या धर्मभोळ्या नि हास्यास्पद आहेत, तरीही त्या मुसलमानांप्रमाणे धर्मकडवेपणा संचारविण्यासाठी पाळल्या पाहिजेत. इतके सांगून ते थांबत नाहीत, तर पोथिनिष्ठपणामुळे मुसलमान समाज एकवटला आहे, प्रबळ होत आहे. मात्र त्यामुळे मुसलमानांचीही दुर्दशा होत असल्याचे ते स्पष्ट सांगतात. यावरूनच त्यांचा देशातील समाजासंबंधातील अतिशय सूक्ष्मपणे आणि आपलेपणाने केलेला विचार स्पष्ट होतो. दुर्दैवाने तथाकथित पुरोगाम्यांना सावरकरांच्या या हिंदुत्वनिष्ठतेचा अर्थही उमगला नाही. १९३७ च्या या अंकात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी केवळ दहा वर्षे आधी त्यांनी हा लेख लिहिला आहे, त्यात हिंदुंचाच नव्हे तर मुसलमानांच्या संबंधातही विचार केला. मुसलमानांच्या संबंधातील पोथिनिष्ठता, रुढी कशा घातक आहेत, याचाही विचार त्यांनी केला. हिंदु मुस्लीम या दोन्ही धर्मांमधील उणेपणाचा एकत्रितपणे विचार त्यांनी केला आणि विज्ञाननिष्ठ व्हायला हवे, हेच सांगितले. मुसलमान जर विज्ञाननिष्ठ नि प्रगत झाले तर त्यात हिंदुंचेही कल्याण आहे. हिंदी मुसलमानांचे तर कोटकल्याणच आहे. असे ते सांगतात. असे असूनही सावरकरांना जातीय ठरवण्याचा करंटेपणा करणारे भारतात अजूनही आहेत, यापेक्षा तथाकथित धर्मनिरपेक्ष घटनेचा पराभव तो कोणता?
- रवींद्र यशवंत बिवलकर
२९ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा