तीन माकडांची उद्याची गोष्ट (भाग ४)
माकड हा मानवाचा "पूर्वज" आहे. वंशज नाही. आणि हा सिद्धांत डार्विन च्या नावावर ठोकला जातो. मूळ सिद्धांत : "कपी (गोरीला, चिंपांझी सारखे बिनशेपटाचे माकड) आणि मानव यांना एक सामायिक पूर्वज आहे." त्यामुळे म्हणायचेच असल्यास कपी ही आपली चुलत भावंडे आहेत. पूर्वज नाहीत. हा संदर्भही सर्वांनी नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.
भविष्यकाळ सांगणे ही, ज्योतिषाची व्यावसायिकता आहे. ते खरे होईलच याची मात्र शाश्वती तो देऊ शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ व्या वर्षात वाटचाल करताना नेमके काय जाणवले असेल त्यापेक्षा विद्यमान भारतीय नागरिकांना चीन- जपान वा भारतातूनही उत्पत्ती झालेल्या या बुद्धिमान माकडांच्या संदेशातून काय घेता आले असेल आणि आजच्या घडीला त्याने त्यातून काय टाळले असेल वा त्याने काय टाळावयाचे ठरवले असेल, ते मात्र भविष्यातील सहाव्या माकडाला उमगेल का, हा प्रश्न आहे.
शेवटी माकड ते माकड आणि माणूस तो माणूस, मग भले कोणी माकडाला माणसाचा वंशज म्हणो वा माकड आपण माणसाचे वंशज असल्याचे मानो. विद्यमान घडीला अद्ययावत होत असलेल्या, सतत बुद्धिवादाच्या वा पुरोगामीत्वाच्या नादाने भारावलेल्या माणसाने माणसाचा गुणावगुण आत्मसात पूर्ण केला आहे. मात्र तरीही त्याच्या बुद्धिवादाला सध्याच्या माकडचाळ्यातून पडलेली बेडी त्याला तोडता येत नसेल तर त्याच्या बुद्धिवादाचा उपयोग काय? धर्म, जात, भाषा, देश अशा विविध भेदांप्रमाणेच, भांडवल, उद्योग, सत्ता अशा नशेच्या अधीन राहाणाऱ्या जगाने जर शेखचिल्लीसारखे हातात कुऱ्हाड घेऊन बसलेल्या फांदीवरच घाव घातला तर ती बाब त्या पूर्वीच्या तीन माकडांच्या भावी पिढीची रुपरेषा ठरू शकेल.! त्यासाठी गांधीजींची, जपान्यांची, चिन्यांची वा भारतीयांची तीन माकडे असण्याची गरज नाही. !
माझ्या एका स्नेह्यांनी दिलेल्या माहितीनुसार माकड हा मानवाचा "पूर्वज" आहे. वंशज नाही. आणि हा सिद्धांत डार्विन च्या नावावर ठोकला जातो. मूळ सिद्धांत : "कपी (गोरीला, चिंपांझी सारखे बिनशेपटाचे माकड) आणि मानव यांना एक सामायिक पूर्वज आहे." त्यामुळे म्हणायचेच असल्यास कपी ही आपली चुलत भावंडे आहेत. पूर्वज नाहीत. हा संदर्भही सर्वांनी नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.
काळानुसार अद्ययावत होण्याची, चंगळवादापेक्षा कर्तव्याने मानवी आणि निसर्गजीवन फुलवण्याची गरज आहे. मात्र सत्तेच्या आणि सत्तालोलूपांच्या हातचे माकड बनण्याचे जर भारतीयांनी ठरवले तर हिंदुस्थानातील संस्कृतीचे तोंडी गुणगान गाऊन काही बुद्धिमान माकड बनता येणार नाही. कारण तुम्ही माकड असाल तरी तुमचा मदारी मात्र बुद्धिमान माणूस नसेल तो सत्तालोलूप, राजकारण करणारा, सत्तेसाठी हिंस्त्र होणारा, उद्योगाला उद्याच्या फायद्यासाठी वापरणारा, भांडवली मदार सांभाळणारा दशमुखी रावणापेक्षा अधिक अहंकारी असू शकेल. आपलाच धर्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याने त्यापुढे सर्वांनी मान तुकवावी असे फतवे काढणाराही असू शकेल. ज्याला सहजीवनाने देश फुलवण्याचे, माणसे जोडण्याचे तंत्र अनावश्यक वाटत असेल... असे हे तीन माकडांच्या उद्याच्या गोष्टीतील सहावे माकड कसे असेल ते प्रत्येकाने ठरवले पाहिजे. शिक्षणाचा, साक्षरतेचा वापर करीत तारतम्याने 'स्व'ला अद्ययावत करण्याचे आणि कालानुरूप सक्षम बनवण्याचे ध्येय जर या सर्व माकडांच्या अंगी बाणवले नाही, तर सहाव्या माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल, यात शंका नाही. त्यातून काय काय पेटले जाईल, ते मात्र अंदाजितही करता येणार नाही, हे नक्की!
- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा