गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ७  

सावरकरांना गेल्या काही वर्षांत ते आमचे नव्हते असे सांगणारे राजकीय नेतेही आणि पक्षही आरडाओरड करीत राजकीय हितरक्षणासाठी तयार झालेले दिसतात तसेच सावरकरांची बाजू घेत असल्याचा अविर्भाव आणून ‘मी सावरकर’ अशा टोप्या घालायला लावणारेही दिसतात. वास्तविक सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना यापैकी कोणाच्याही कुबड्या घेण्याची गरज नाही, इतके सावरकरांचे विचार स्पष्ट आहेत. त्यांचे हिंदुत्वही तितकेच पारदर्शक आहे. जे राष्ट्राभिमुख आहे. त्यांचे हिंदुत्व हे अतिशय तार्किकतेने मांडलेले आहे, त्यात धर्म नव्हे तर समाजरक्षण आणि नवविचारांना बदलत्या काळाप्रमाणे दिशा देणारे आहे. राष्ट्र आणि समाज यांना त्यांनी अचूकपणे समजून संकल्पित केले आहे.

 राष्ट्राभिमुख हिंदुनेस

सावरकर आणि हिंदुत्व यांचा संबंध नेमका कसा आहे, हे आतापर्यंत विविध समीक्षकांनी, लेखकांनी, राजकीय नेत्यांनी, सावरकरांचे विरोधक आणि अनुयायी म्हणवणाऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला खरा पण तो तटस्थपणे किती जणांनी केला हे पाहाणे गरजेचे आहे. सावरकरांना गेल्या काही वर्षांत ते आमचे नव्हते असे सांगणारे राजकीय नेतेही आणि पक्षही आरडाओरड करीत राजकीय हितरक्षणासाठी तयार झालेले दिसतात तसेच सावरकरांची बाजू घेत असल्याचा अविर्भाव आणून ‘मी सावरकर’ अशा टोप्या घालायला लावणारेही दिसतात. वास्तविक सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना यापैकी कोणाच्याही कुबड्या घेण्याची गरज नाही, इतके सावरकरांचे विचार स्पष्ट आहेत. त्यांचे हिंदुत्वही तितकेच पारदर्शक आहे. जे राष्ट्राभिमुख आहे. त्यांचे हिंदुत्व हे अतिशय तार्किकतेने मांडलेले आहे, त्यात धर्म नव्हे तर समाजरक्षण आणि नवविचारांना बदलत्या काळाप्रमाणे दिशा देणारे आहे. राष्ट्र आणि समाज यांना त्यांनी अचूकपणे समजून संकल्पित केले आहे. धर्म या शब्दाचेही त्यांनी बारकाईने विवेचन आणि विश्लेषण केले आहे. तसेच वैदिक असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो की मुस्लीम, शीख असो किंवा ज्यू अशा विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. लंडनमध्ये असताना त्यांनी शिखांचा इतिहास लिहिला मात्र तो काळाच्या गर्तेत कुठे गहाळ झाला. सांगायचा मुद्दा त्यांनी इतिहासाचा अन्वयार्थ वा निष्कर्ष काढताना धर्माचेही अस्तित्व लक्षात घेतले होते कारण समाज आणि धर्म याचे महत्त्व त्यांना पुरते ठाऊक होते. सावरकरांच्या संपूर्ण वाटचालीत वा आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये त्यांना येणाऱ्या अनुभवांमधून त्यांनी आपल्या विचारांनाही अधिकाधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला वयानुसार त्यांच्या विचारांमध्ये फरक होत गेला अनुभवानुसार आणि घटना, परिस्थितीनुसारही त्यांना त्यातून शिकायला मिळाले ते शिकत गेले आणि त्यातूनच हिंदुत्व या समाजाचा अर्थ त्यांनी मांडला तो देखील राष्ट्राच्या जाणीवेसाठी. केवळ हिंदु या रुढार्थाने स्वीकारल्या जाणाऱ्या एका धर्माच्या संबंधात त्यांना हिंदुत्व अभिप्रेत व्हते. अंदमानातील मुसलमानांच्या अनुभवामुळेही काही केवळ त्यांनी हिंदुचे संघटन करण्याचे ठरवले नव्हते, अंदमानातील अनुभवांमुळे ब्रिटिशांची कूटनीती कळली, मुसलमानांना आपण वेगळे आहोत, ही जाणीव ज्या त्यांच्या नेत्यांनी दिली होती, त्याला खतपाणी घालण्याचे काम ब्रिटिशांनी केले ते ओळखले होते. इतकेच नव्हे तर तसे पाहायला गेले तर हिंदु समाजातील असंघटित मानसिकता जी मुस्लीम धर्मीयांच्यापुढे खूप कमी प्रमाणात होती ती स्पष्ट जाणवल्याने त्यातील उणीवा दूर करण्याची गरज आहे, हे त्यांना पक्के जाणवले. पण हे करताना ब्रिटिशांविरोधात काम करताना हिंदुमुस्लीम ऐक्य हवे पण लाचारी नको, ही भूमिका त्यांना घेणे का भाग पडले, याचाही विचार करायला हवा. तो न केल्याने अनेकदा सावरकरांवर मुस्लीम विरोध वा द्वेष करण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आरोप केले जात असल्याचे दिसून येते. ही स्थिती अतिशय सावरकरांवर अन्याय करणारी आहे असेच म्हणावे लागेल. मुळात मुस्लीमांच्या संबंधात तुष्टीकरणाची वा बोटचेपेपणाची भूमिका तत्कालीन काँग्रेसजनांनी, गांधीजींनी, नेहरूंनी आणि अन्य नेत्यांप्रमाणेच हिंदु जनतेनेही का स्वीकारली हा जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न हिंदु- मुस्लीम यांना न्याय्य अस्तित्व हवे असे सांगताना स्वत्व जपण्याचा प्रयत्न त्यादृष्टीने मुस्लीम नेत्यांना का करावासा वाटला नाही, मिळेल तितके घशात घालण्याची वृत्ती मुस्लीम नेत्यांनी स्वीकारली त्या बद्दल मुस्लीम समाजातील लोकांनी वा अन्य नेत्यांनी गप्प बसणे का पसंत केले असा प्रश्नही विचारण्याची आणि त्यावर अभ्यास करण्याचीही गरज आहे. हे सारे राष्ट्राभिमुखता याच घटकाकडे मुस्लिम समाजाची धारणा कशी होती, त्यावर प्रकाश टाकणारे आहे. मुळात धर्मवेडाच्या आणि इतिहासातील सत्ताधारी असल्याचा अहंकार हा भारतीय मुस्लिमांत रुजला आणि रुजवला गेलाही. त्याला कारण मुळात धर्मवेड इतकंच नव्हे तर एका धर्मग्रंथात सांगितलेले आहे तितकंच स्वीकारित नव्या काळाकडे न बघण्याची प्रामाणिक वृत्ती नसणारी धर्मवेडी वृत्ती. यामुळे बुद्धिवादी विचार करणे मुस्लिमांमधील अनेक नेत्यांना झेपले नाही. सत्यशोधक मुस्लीम व्यक्ती किती झाल्या तर त्याही हाताच्या बोटावर मोजून बोटे शिल्लक राहातील इतक्याच. धर्म त्यातील उदारमतवादी असणारे मुस्लीम नेते वा व्यक्ती स्वातंत्र्यपूर्व काळातही फार दिसून येत नाही. हिंदू समाजात मात्र तसे न झाल्याने वैदिक, सनातनी कर्मठ व्यक्तीं विचार या विरोधात बुद्धिवादी व्यक्तीही तशा बऱ्याच झाल्या. आधुनिक आणि अद्यावत शिक्षणाकडे झुकणारा हिंदु समाज त्यामुळेच राष्ट्रवाद या अर्थाने राष्ट्र या संकल्पनेला समजण्याप्रत आला अनेकांनी त्यात दिशाहीही दिली. हिंदु समाजाला पुरातन वा श्रुतिस्मृति पुराणोक्ततेपासून बाहेर काढण्याचा सावरकरांचा प्रयत्न आणि हिंदुत्वाचा संकल्प हा खऱ्या अर्थाने त्या राष्ट्र, स्वराज्य, स्वत्त्व या बाबींना अधिक खुलवून सांगमारा आहे. अर्थात तरीही हिंदु समाजात आज धार्मिक कर्मकांड वा संस्कृतीच्या नावाने पुराणकालीन प्रथांना, कर्मकांडांना मोठं करून आणि बुद्धिवादी वा ज्ञानवादी असणारी वा दावा करणारी परंपराही चालत आहे. त्या धर्मग्रंथांना बाजूला जपून इतिहास म्हणून पाहा असे सांगणारे सावरकर त्या हिंदुना झेपले नाहीत, आजही झेपतच नाहीत असेच दिसत आहे. यातून मुस्लीम समाज कुठे असेल याची फक्त कल्पना केलेली बरी. सध्याच्या काळात तर धर्माच्या नावाने फाळणी करून निर्माण झालेला मुस्लिमांचा पाकिस्तान त्याच जुन्या विचारांना, धर्मग्रंथाना पोथिबद्ध स्थितीतच स्वीकारणारा असल्याने तेथील झालेली नागरिकांची मानसिकता, बौद्धिकता ही समाजाला विकलांग करणारी दिसू लागली आहे. अशाच प्रकारची मौलवी मानसिकता हिंदु समाजात भिक्षुक मानसिकतेकडे गेली तर उत्तर पेशवाईसारखा कालखंड पुन्हा निर्माण होऊ शकतो. आणि यासाठीच धर्म, रिवाज आदी जुन्या पोथिबद्ध विचारांबद्दल सावरकरांनी दाखवलेली कपाटे हीच योग्य आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टीने व बुद्धिच्या, सारासार विवेकाच्या सहाय्याने तावून सुलाखून आणि पडताळून घेतले गेले नाही, तर जुन्या चांगल्या रिती रिवाज यांना आधार राहाणार नाही, काळाच्या कसोटीवर ते उतरतातच असे केवळ तोंडी म्हणण्याऐवजी ते विज्ञानाच्या कसोटीवर पारखले गेले पाहिजेत इतके कारण हाच हिंदुनेस वा हिंदुपण पुढे राष्ट्राभिमुख दिशादर्शनासाठी उपयुक्त ठरणार आहे. पुढच्या पिढ्यांना भुर्जपत्रांच्या आधाराऐवजी आंतरजालाचा वा त्याही पलीकडे असलेल्या वैज्ञानिक माध्यमांचा आधार द्यावा लागणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्त्व जितके सरळ साधे सोपे आहे तितकेच ते सखोल विचार करून समाजाला गांभीर्याने बुद्धिवाद पत्करायला लावणारे आहे. मानवी शरिराचा वापर हा सर्व प्रकारे करावा लागतो, होऊ शकतो केवळ त्यामुळेच जात्युच्छेदन असो वा व्यवसाय बंदीची बेडी तोडणे असो वा अन्य विविध बेड्या असोत त्या तोडण्याची गरज आहे. सावरकरांनी सांगितलेल्या सात बेड्या या किंबहुना त्यांनी दाखवून दिलेली उदाहरणे वा प्रातिनिधीकही आहेत. त्या व्यतिरिक्त अन्य बेड्या वा बंधनेही आहेत त्यांना कालनिहाय विचारांनी. उपयुक्ततावादाच्या नजरेने शोधण्याची आवश्यकता आहे. नवनव्या शोधांमुळे समजाची झालेली स्थिती, वाढणारी नगरे, नगररचना, जीवनशैली याचा विचार करता सावरकर हे त्या काळात किती पुढे होते आणि आपण आजच्या काळातही किती मागे आहोत, ते लक्षात येऊ शकते. 

 (क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...