गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ८  

व्यक्तिमत्त्व मांडताना त्यामधील तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ तसेच राजकीय ही अंगे अधिक महत्त्वाची वाटतात. ती पाहाता त्यातील कार्य हे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि लढलेल्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक वा नेते यांच्यापेक्षा अधिक मोठे वाटते कारण ते काळाच्या पुढे जाणारे आहे. अगदी सावरकर जिवंत असताना, अन्य नेते, राजकीय विचारसरणीचे अन्य पक्ष- प्रवाह आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार करता स्वातंत्र्य मिळाले असतेच. त्यासाठी या सर्वांचे प्रयत्न होतेच. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वा ते मिळविताना समाज, राष्ट्र आणि धर्म ही संकल्पना कशी असावी, ती भविष्यात कशी उपकारक ठरू शकेल, तत्कालीन काळाचाही विचार करता त्यांनी मांडलेले या संबंधातील विचार आजही तितकेच प्रेरक आहेत,उपयुक्त आहेत नव्हे तर ते आणखी अधिक पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करणारे आहेत. नवीन नागरीकरणाची पद्धती वा नागरी जीवनाची प्रणाली व जागतिक स्तरावर होऊ घातलेली जीवनप्रमाणाली त्याकाळात सावरकरांनी ओळखली होती. आणि त्यादृष्टीने भारतीय समाजानेही वाटचाल करायला हवी हा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.  

विज्ञाननिष्ठ, अद्ययावत भविष्याभिमुख समाजाचा विचार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व असा ठेवावासा वाटतो. यामध्ये स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी दिलेले योगदान हा खरे म्हणजे अनेक पैलू असणारा भाग आहे. त्यात वरील तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व समाविष्ट आहे. परंतु हेच व्यक्तिमत्त्व केवळ आणि केवळ देश, समाज, धर्म, माणूस यांना नवकालाकडे, नव्याजमान्याकडे, बदलत्या काळाकडे पाहाण्यास आणि ते सारे स्वीकारण्यास शिकवणाऱ्या गुरुसारखे आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व मांडताना त्यामधील तत्त्वचिंतक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ तसेच राजकीय ही अंगे अधिक महत्त्वाची वाटतात. ती पाहाता त्यातील कार्य हे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि लढलेल्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक वा नेते यांच्यापेक्षा अधिक मोठे वाटते कारण ते काळाच्या पुढे जाणारे आहे. अगदी सावरकर जिवंत असताना, अन्य नेते, राजकीय विचारसरणीचे अन्य पक्ष- प्रवाह आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार करता स्वातंत्र्य मिळाले असतेच. त्यासाठी या सर्वांचे प्रयत्न होतेच. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वा ते मिळविताना समाज, राष्ट्र आणि धर्म ही संकल्पना कशी असावी, ती भविष्यात कशी उपकारक ठरू शकेल, तत्कालीन काळाचाही विचार करता त्यांनी मांडलेले या संबंधातील विचार आजही तितकेच प्रेरक आहेत,उपयुक्ताहेत नव्हे तर ते आणखी अधिक पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करणारे आहेत. नवीन नागरीकरणाची पद्धती वा नागरी जीवनाची प्रणाली व जागतिक स्तरावर होऊ घातलेली जीवनप्रमाणाली त्याकाळात सावरकरांनी ओळखली होती. आणि त्यादृष्टीने भारतीय समाजानेही वाटचाल करायला हवी हा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. त्यासाठी कदाचित अन्य काँग्रेसच्या वा अन्य विचारसरणीच्या नेत्यांसारखे प्रचंड लेख लिखाण, पत्रलिखाण करून त्यांनी तत्कालिन कालातील लोकांपुढे आकार मोठा असलेले साहित्य काही ठेवले नाही. कदाचित अंदमानासारख्या ठिकाणी तुरुंगवासामध्ये अनेक वर्षे काढावी लागल्याने अधिक प्रमाणात ते लिखाण जनतेपर्यंत नेता येईल इतके करू शकले नसतील पण त्यातही त्यांनी केलेेले लिखाण हे मौल्यवान आहे आणि प्रेरकही आहे. पत्रलेखनही केले त्यातमध्ये अद्याप अप्रकाशित बरेच काही असू शकते.  किंबहुना १९३७ पासून प्रत्यक्ष राजकीय जीवन त्यांनी जगण्यास सुरुवात केली आणि त्यापूर्वी असलेले नियंत्रित विचारांचे लेखनही अधिक राजकीय अंगानेही विचार देत मांडले. मात्र त्याचे प्रमाण तसे कमी भासले तरी ते वैशिष्ट्यपूर्ण होते, द्रष्टे होते आणि भवितव्यातील भारतीय मानसिकतेला बदलू पाहाणारे होते. त्यामुळे त्या राजकीय लिखाणातही स्वातंत्र्यापेक्षा तत्कालीन राजकीय परिस्थितीतून समाजाला हिंदु-मुस्लीम द्वंद्वातून बाहेर काढण्यासाटी व्यावहारिक - मानसिक तयार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. तो दुर्दैवाने ना हिंदु समाजापर्यंत पोहोचला ना मुस्लीम समाजापर्यंत पोहोचला. विज्ञाननिष्ठ समाज घडण्याची गरज, सतत काळाप्रमाणे बदलणे कसे आवश्यक आहे ही माहिती देत समाजसुधारणा करण्याची तळमळ त्यांनी व्यक्त करीत अखेरपर्यंत आपल्या तत्वज्ञानाचा पाठपुरावा केला. मात्र तो प्रयत्न पुढे नेण्यासाठी आवश्यक सैनिक निर्माण करण्यात त्यांना यश आले नाही, त्याची काही कारणे असूही शकतील पण त्यांचे तत्वज्ञान आजही रुजू न शकल्याने हिंदु पुन्हा त्यांच्या मानसिक आणि पारंपरिक सनातन धर्मात अडकून बसले आहेत तर मुस्लीम समाजही सत्यशोधकांच्या प्रयत्नांनंतरही कुराणाच्या पोथीनिष्ठतेने बद्ध झाला आहे. काळाप्रमाणे आव्हाने स्वीकारण्यासाठी सावरकरांनी सांगितलेल्या अद्ययावत व विज्ञाननिष्ठ समाजानिर्मितीला अजूनही सुरुवात झाली नाही. किमान भारतीय मानसिकतेत बदल होणे गरजेचे होते खरे पण समाजाला सावरकरी विचारांना पुढे नेणे सोडा पण जे त्यांनी मांडले आहेत, ते देखील स्वीकारणे जड जात असल्याने एका विशिष्ठ पोथिबद्ध हिंदुत्व वा सनातन धर्माचा आसरा सध्या घेतला जात आहे.

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधाचे स्वरूप हे समाजाला संस्कारित करणाऱ्या आधुनिक चिंतकाचे होते. नवकालाला सामोरे जाणारे होते. त्यातूनच शिक्षण, जगण्याचा दृष्टिकोन, समाजिक स्तरावरील जीवनप्रणाली, धर्माबद्दलचे त्यांचे मत, जातिनष्ट व्हाव्यात आणि सर्व समाज समान स्तरावर यावा, वर्गकलह नव्हे तर वर्गहित लक्षात घेऊन अर्थनीती ठरावी हे मांडणारे सावरकर केवळ हिंदुंना आपले नेते वाटू शकतात, मुस्लिमांना ब्रिटिशांविरोधातील राजकीय लढ्यामध्ये त्यांच्या मुस्लीमधर्मनिष्ठतेला बाजूला करण्यासाठी याल त तुमच्यासह न याल तर तुमच्याविना आणि विरोधाल तर तुमच्याशीही संघर्ष करण्याची तयारी हिंदुंची असेल असे सांगण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्या मुस्लीम लीगच्या कर्मठ वा धार्मिक कट्टरतेच्या वैचारिकतेतून आणि अव्यवहार्य शिकवणुकीतून मुस्लीम समाजाला बाहेर काढण्यासाठी दिलेले वैचारिक आव्हानच होते. आम्हाला मुस्लिमांपेक्षा जास्त काही सुविधा नकोत, त्यांना आमच्यापेक्षा अधिक काही देऊ नये, हे सांगणारे सावरकर हे जर अधिक समानतावादी वाटले नसतील तर तो दोष त्यांच्या विरोधातील वैचारिकतेचा, त्यांच्या विरोधकांच्या दृष्टिदोषाचा, विरोधकांच्या स्वार्थी मनोवृत्तीचा भाग ठरतो. भारतीय मानसिकतेत, वातावरणात रुजू पाहाणारा त्यांचा वर्गहितावर आधारित राष्ट्रवादाला अधिक प्राबल्य देणारा आर्थिक विचारही जो प्राथमिक स्तरावर मांडला गेला, तो ही जागतिक साम्यवादी विचारापेक्षा आणि भांडवलदारांच्या निव्वळ एकांगी व खडतर ठरू शकणाऱ्या वैचारिकतेपेक्षा अधिक सोयीस्कर व भारतीय अंतरंगाला साजेसे रूप देणाऱा साम्यवादापेक्षा उजवा ठरू शकला असता. पण सावरकरांचा हा राष्ट्रीय अर्थनीतीवाद विकसित व्हायला हवा होता, तो समाजवादी वैचारिकतेलाही झेपला नाही, हीच खरी भारतातील समाजवाद्यांच्या अपयशाची पावती म्हणावी लागेल. कारण भारतीय समाजवादाला असणारी धर्मस्वीकार्यतेची धर्मनिरपेक्षतेची गुणवत्ता कदाचित सावरकरांच्या धर्मनिरपेक्षतेला तत्वतः तोंडही देऊ शकली नाही का, याचा खरे म्हणजे विचार होणे गरजेचे आहे. किंबहुना समाजाला विज्ञाननिष्ठ बनविण्यासाठी असणारी सावरकरांची ताकद भारतीय समाजवादाला आणि तथाकथित साम्यवादालाही झेपली नसावी असे म्हणावे का? असा प्रश्न पडतो.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...