तीन माकडांची आधीची गोष्ट - (भाग १)
माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असे दोन्ही घटक असतात. गुणावगुणांनीच माणूस बनलेलाल दिसतो. यामुळे आपण यातून चांगल्या गुणांचे शिक्षण घ्यावे वा चांगले गुण आत्मसात करावे, यामुळेच काय बघू नका तर वाईट बघू नका, काय ऐकू नका तर वाईट गोष्टी ऐकू नका, काय बोलू नका तर वाईट बोलू नका, असे उपदेशच या तीन माकडांमधून मिळतात.
माकड हा म्हणे मानवाचा वंशज आहे. डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले; ते काही असले तरी माकडाचा आणि माणसाचा संबंध असल्याचे त्याने दाखवले होते. अशा या माकडाची आधीची गोष्ट नेमकी काय होती याचे औत्सुक्य खरे म्हणजे सर्वांना असले पाहिजे. शेवटी आपला तो पूर्वज नव्हे का?...
भारतात तीन माकडांची एक प्राक्कथा प्रसिद्ध आहे. या तीन माकडांची उत्पत्तीही भारतातच झाली आहे, असेही एक म्हणणे आहे. त्यासाठी बौद्ध धर्माच्या भिख्खुंच्या कथनाचा आधार घेतला जातो. असे म्हणतात की, आठव्या शताब्दीच्या दरम्यान, एका बौद्ध भिख्खूने वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका अशी शिकवण चीनमध्ये आणली. वाईट गोष्टींबद्दल असणारी ही म्हण, जपानमध्ये मिजारू, किकाजारू आणि इवाजारू या स्वरूपात प्रसिद्ध पावली.
या मिजारू म्हणजे दोन्ही हाताने आपले डोळे झाकून घेणारे माकड आहे. तर किकाजारू हे माकड दोन्ही हाताने आपले कान झाकून घेते, इवाजारू हे दोन्ही हाताने आपले तोंड बंद करत असते. या अशा तीन प्रकारच्या माकडांच्या स्वरूपातून मिळणारा संदेश हा मोठा आहे. ही तीनही माकडे बुद्धिमान आहेत. लहानपणापासून दिल्या जाणाऱ्या या माकडांच्या प्रतिकृतींमधील शिकवणुकीतून अनेकांचे जीवन साकारले आहे, हे खरे.
प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असे दोन्ही घटक असतात. गुणावगुणांनीच माणूस बनलेलाल दिसतो. यामुळे आपण यातून चांगल्या गुणांचे शिक्षण घ्यावे वा चांगले गुण आत्मसात करावे, यामुळेच काय बघू नका तर वाईट बघू नका, काय ऐकू नका तर वाईट गोष्टी ऐकू नका, काय बोलू नका तर वाईट बोलू नका, असे उपदेशच या तीन माकडांमधून मिळतात.
माकडांना दिलेली ही तीनही नावे जपानी भाषेतील आहेत. आता तरीही ही माकडे नेमकी कुठली आहेत भारतातील, चीनमधील की जपानमधील? याबद्दल तीन मते व्यक्त केली जातात.
एका मतानुसार ही तीन माकडांची उत्पत्ती जपानमघील आहे. जपानमधील निक्को नावाच्या छोट्याशा गावातील तोशोगू उद्यानात लाकडात कोरलेली ही माकडे आहेत. जपानमधील कोशिन कालातही या माकडांच्या शिल्पांना साकारले गेले होते. त्यांना संरक्षणाचे प्रतीक मानले जाई.
दुसऱ्या मतानुसार आठव्या शतकात एक जपानी बौद्ध तेंदाई शाळेशी संबंधित होता त्याला चीनमधील तान्ताई शाळेमध्ये बौद्ध धर्माच्या शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्याने या तीन माकडांद्वारे दिलेल्या संदेशाला तेथूनच आत्मसात केले आणि त्या संदेशाला माकडांच्या प्रतीकात त्याने साकारले होते. जी आता माकडांची प्रतीके सर्व जगात पोहोचलेली आहेत
तिसऱ्या मतानुसार या माकडांची वा त्यांच्या संबंधातील प्रतीकात्मकतेची उत्पत्ती ही मूळ भारतातील आहे. ओशो रजनीश यांच्या दाव्यानुसार ही प्रतीकात्मक शिकवण आशियात बौद्ध भिख्खूंद्वारे प्रसारित केली गेली होती. त्यांची उत्पत्ती ही बौद्धकाळात झाली होती.
उत्पत्तीसंबंधात काही वाद असले तरी त्यातून मिळणारा संदेश हा मात्र नक्कीच मोलाचा होता. पण त्याहीपेक्षा तो कालानुरूप आणि माणसागणिक बदलणाराही होता. किंबहुना त्यात माकडांबरोबरच माणसांची भरही पडली आहे. तुमचा त्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलला जाऊ शकतो. यामुळेच या तीन माकडांची ही आधीची गोष्ट जितकी माहितीपूर्ण ठरू शकते, तितकीच नंतरच्याही गोष्टीत त्यात मोलाची भर पडणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा