मंगळवार, २३ मे, २०२३

  सावरकर : कालआज आणि उद्या  

माझ्या नजरेतून - 

सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचे अर्धज्ञान घातक
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा


समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या बुद्धिवादाच्या परंपरेचे स्वातंत्र्यवीर विदासावरकर हे क्रांतिकारक पाईक म्हणावे लागतातराष्ट्र ही संकल्पना प्राचीन हिंदुकालात मांडली गेली असल्याचे अनेकांचेकाही हिंदुत्ववाद्यांचे दावे आहेतविशेष करून पूर्वपरंपरारिती रिवाजसंस्कृती या घटकांचे संदर्भ देत अनेक हिंदुधर्मनिष्ठ राष्ट्र ही संकल्पना अस्तित्त्वात होतीअसे सांगताततर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदुस्थानची व्याख्या करतातकिंबहुना त्यांच्या व्याख्येत कालापलीकडे पाहाण्याचही इच्छा आहेइतकेच नव्हे तर हिंदुराष्ट्र ही संकल्पना भूमिनिष्ठ आणि राष्ट्रीयराष्ट्रनिष्ठ दृष्टीने स्वीकारताततसेच हिंदुत्व हे तत्त्व याच भूमिनिष्ठराष्ट्रनिष्ठ भूमिकेतून मांडताना समाजाला अद्ययावत बनवू पाहातात.

 वस्तुस्थिती आणि इतिहासतसेच सत्य नाकारून धर्माच्या पोथिनिष्ठतेपुढे माना झुकवणाऱ्यांच्या मानसिकतेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळूनही  बहुसंख्य आणि अल्पसंख्य नागरिक आजही विज्ञाननिष्ठतेऐवजी पोथिनिष्ठ धर्मआणि प्राचीन परंपरारिवाज यांच्या विळख्यात गेले आहेतकेवळ नागरिक नव्हे तर आजचे राजकारणतथाकथित विविध विचारसरणीइतकेच नव्हे तर अगदी धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय स्रोत आणि त्यांचे वंशजही खऱ्या अर्थाने विज्ञानवादीविज्ञाननिष्ठ युगातील अद्ययावत होण्यास तयार नाहीतही स्थिती केवळ आजची नाहीतर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातीलही होतीअशी विविध उदाहरणेही त्या अनुषंगाने आढळून येतील.  अशा या परिस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मांडलेले समाजसुधारणेसंबंधातील विचार हे म्हणजे एक तत्त्वज्ञानच आहे.  

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या बुद्धिवादाच्या परंपरेचे स्वातंत्र्यवीर विदासावरकर हे क्रांतिकारक पाईक म्हणावे लागतातराष्ट्र ही संकल्पना प्राचीन हिंदुकालात मांडली गेली असल्याचे अनेकांचेकाही हिंदुत्ववाद्यांचे दावे आहेतविशेष करून पूर्वपरंपरारिती रिवाजसंस्कृती या घटकांचे संदर्भ देत अनेक हिंदुधर्मनिष्ठ राष्ट्र ही संकल्पना अस्तित्त्वात होतीअसे सांगताततर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदुस्थानची व्याख्या करतातकिंबहुना त्यांच्या व्याख्येत कालापलीकडे पाहाण्याचही इच्छा आहेइतकेच नव्हे तर हिंदुराष्ट्र ही संकल्पना भूमिनिष्ठ आणि राष्ट्रीयराष्ट्रनिष्ठ दृष्टीने स्वीकारताततसेच हिंदुत्व हे तत्त्व याच भूमिनिष्ठराष्ट्रनिष्ठ भूमिकेतून मांडताना समाजाला अद्ययावत बनवू पाहातातसबळसामर्थ्यवान देश करून जगाच्या स्पर्धेत शक्तिशाली कसे बनता येईलत्यासाठी झगडतातबदलत्या कालाबरोबरत्यातील नवनव्या विचारांना सामोरे जातही आपल्या हिंदुनिष्ठ भूमिकेला ते नवा बळकट पाया देण्याचे काम करताताहा पाया आहेविज्ञानाधारित भूमिनिष्ठ हिंदुधर्माचाहा त्यांचा धर्म हिदुंच्या प्राचीन परंपराइतिहाससंस्कृती अशा वारशाला डोळसपणे जपूनही नवकालालाआधुनिकतेला अद्ययावत संस्कारांना स्वीकारणारात्यामुळेच त्यांचा हा हिंदुपणा किंवा हिंदुत्वाचा पाया पारंपरिक,  रिवाजाधारितश्रुतिस्मृतिपुराणोक्त  धर्मालासामूहीक वर्तनाला वा त्या संलग्न हिंदुधर्माला झुगारणारा आहेते केवळ ही संकल्पना भारतीय उपखंडातील एकाच धर्मालाही लावू पाहात नाहीततर अन्य धर्मांमधील श्रुतिस्मृतिपुराणोक्त गृहितकांनाही ते बाजूला सारण्यासाठी आवाहन करतात

त्यांचा हा धर्म यामुळेच नव्या पिढीला दिशादर्शक ठरू शकतोकारण तो बुद्धिवादी आहे तो विचारपूर्वक वागायला शिकवणारा आहेतो 'आसिंघु-सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।या भूमिकेला ग्राह्य मानून या भूमीतील मूल समाजधर्माशीपंथगट यामधील व्यक्ती आणि व्यक्तीसमूहांना आक्रमकांपासून झालेल्या हिंसक वृत्ती आणि हिंसकतेमुळे दबल्या गेलेल्या समाजाला जगातील भूमिचे महत्त्व सांगतलक्षात आणून देत त्यांना तुम्ही या भूमीचे आहात आणि ही भूमी तुमची आहेजगात अन्यत्र तुम्हाला स्वत:ची भूमी नसल्याचे वास्तव स्पष्ट करणारा आहेयामुळेच आक्रमकांच्या जोखडापासून मुक्त करूनमानसिकबौद्धिकभावनिक अशा गुलामगिरीपासूनही मुक्त व्हाअसे सांगणारा सावरकरांचा हिंदुत्वाचा वा हिंदुपणाचा अभिनिवेश नीट लक्षात घ्यावा लागतोतो नीट लक्षात न घेतल्याने हिंदुस्थानातील हिंदुआहिंदु यांचेही मोठे नुकसान स्वतंत्र भारतातीली त्रिशंकू अशा धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीने वा शिकवणुकीने झाले आहेत्यामुळे खरी धर्मनिरपेक्षताच संबंधितांना नीट उमगली नसल्याने आजही कोणीतरी अल्पसंख्याकांना घाबरूनत्यांच्यापुढे लाचार बनून धर्मनिरपेक्षतेचा आव आणल्याचे राजकारण खेळत आहे

क्रांतिकारक सावरकर हे केवळ सशस्त्र क्रांतिकारकांचे मार्गदर्शक नव्हेत तर नव्याने उभारी घेत असलेल्या नव्या युगातील भारतीय उपखंडाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञानी होतेब्रिटिशोत्तर भारताला आधुनिकतेच्या जीवनविचारांकडे नेऊ पाहाणारेअद्ययावत मानसिकतेला स्वीकारण्यासाठी व्यक्तिवादाला जोपासून ( - व्यक्तिवादाला बाजूला सारून वा कोणावर जबरदस्ती करून नव्हेेसावरकरांचे हिंदुत्वाचेविज्ञाननिष्ठतेचेअद्ययावत समाज निर्मितीचेराष्ट्राला शस्त्रसमर्थ बनविण्याचेआक्रमकांच्या इतिहासातून शहाणे होतहिंदुंनी शस्त्रसज्जसंरक्षण शिक्षण घेत राष्ट्र बळकट करावेहे तत्त्वज्ञान देतयंत्रयुगाला स्वीकारणारे सावरकरयुगच संकल्पित केलेमात्र त्यांचे हे युगत्यांच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्येत्यांच्या तत्त्वज्ञानातीलविचारामधील मूळ प्रवाहाला स्मरत जातव्यावहारिकतेलाउपयुक्ततेलाअर्थ देणारी धोरणे अधिक सूक्ष्मपणे पाहाणे गरजेचे आहेत्यांच्यामते धर्माचे असणारे महत्त्व आणि भूमीचे असणारे अधिष्ठान याची त्यांच्या विज्ञाननिष्ठ समाजाला सुधारणेकडे नेणारी दिशा ही क्रांतिकारक होतीती कशी ते पाहण्याचा माझा प्रयत्न आहेया प्रयत्नात सर्वांना समानतेच्या स्तरावर आणण्यासाठी व्यक्तिवादही संवेदनशीलपणे जोपासणाऱ्या आणि इतिहासाच्या देदिप्यमान काळाला तसेच त्यातील अत्याचारी राजवटींनाही लक्षात घेत भूमिनिष्ठ हिंदुत्व मांडतविज्ञाननिष्ठ धर्माला साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावरकरांना अधिकाधिक शोधण्याची ही धडपड आहेत्यांनी मांडलेल्या सावरकर युगाचा विद्यमान स्थितीतही विजय झालेला नाहीपराभव पाहावा लागत आहेही शोकांतिका आहेअसे मात्र राहून राहून वाटते.

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...