सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून - ५
सावरकरांच्यादृष्टीने धर्म
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

| चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा |
अहिंदु असणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतरही काय स्थान राहील हे सावरकरांनी हिंदु महासभेच्या भाषणांमधून सातत्याने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही मुस्लिमांना नेमके ते न कळू देण्याच्या भूमिकेतून आणि मुस्लिमांच्या पुढे लाचारी पत्करीत वा मतांसाठी लाचार होत काँग्रेससारख्या पक्षाने केलेली सुरुवात ही मुस्लिम धर्मियांनाही घातक होऊन बसली आहे, हे त्यांनाही लक्षात येऊ नये, यासारखे मुस्लिमांचे दुर्दैव नाही. अलीकडच्या काळात मुस्लिम समाजाला वा धर्मीयांना सुधारण्यासाठी सत्यशोधक मंडळासारख्या फारच थोड्या संघटना आणि व्यक्तींचे प्रयत्न झालेले दिसतात.
आसिंघु-सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिदुरिति स्मृत: ।।
ही व्याख्या दृढ करण्यामागील सावरकरांची भूमिका ही देखील राजकीय आणि हिंदुसंघटकाची आहे. हिंदुसंघटक म्हणून जातीयतेचा वास घेणाऱ्यांना हिंदु असणाऱ्यांनाही ही व्याख्या नेमकी उमजत नाही, हे दुर्दैव आहे. मुळात भारतावर झालेल्या विविध आक्रमणांमुळे धर्मांतरे झाली, या धर्मांतरामुळे झालेल्या नकारात्मक मानसिकतेमधून हिंदुंना अस्तित्त्वाची जाणीव करण्याचे काम अनेकदा काळाकाळामध्ये अनेकांनी केले. त्यात अलीकडच्या काळातील बुद्धिवादातून हिंदुत्त्वाला साकारणारे आणि भूमिनिष्ठ, विज्ञाननिष्ठतेमधून हिंदुना नव्या आधुनिकतेकडे नेऊ पाहाणारे सावरकर हे द्रष्टे होते. त्यामुळेच हिंदुंचे संघटन वा त्यांचे महत्त्व हे केवळ सत्ता मिळविण्यासाठी नव्हे तर जगामध्ये ज्या भूमीवर पूर्वीपासून मालकी असूनही वा जी भूमी त्यांच्या पूर्वापार पिढ्य़ांपासून आपली असल्याचे ज्ञात असूनही पराभूताच्या मानसिकतेत जगणाऱ्या हिंदुना जागृत करण्याचे मुख्य उद्दिष्ट सावरकरांचे होते. या उद्दिष्टातून त्यांनी मूलत: याच भूमीत वाडवडील जन्मलेल्या आणि त्यांचीही धार्मिक नाळ समान असलेल्या अन्य धर्मांतरित व्यक्तींना पुन्हा धर्मात घेण्याचे महत्त्वाचे काम करून मानसशास्त्रीय दृष्टीने निखळलेला सांधा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आधुनिक काळात झालेला हा प्रयत्न ज्या काही नामांकितांनी केला, त्यात सावरकर हे अद्यतनी असून धर्म या संकल्पनेला भूमीशी नाळ जोडणाऱ्यांमधील एक बीजकर्तेच होते. पण त्याचे महत्त्व आजही ना हिंदुना जाणवले ना मुस्लिमांना जाणवले ना ख्रिश्चनांना जाणवले. हे असे काम सावरकर का करू शकले, किंवा का करीत होते, कारण धर्म या पारंपरिक संकल्पनेला त्यांनी नेमके ओळखले होते. आधुनिक काळासाठी धर्म, रिवाज परंपरा, त्यातील बेड्या तोडण्याची गरज प्रतिपादित करतानाच त्यांनी धर्माभिमानापेक्षा पुण्यभू या शब्दाला महत्त्व देत हिंदुंना त्यांचे हिंदुत्त्व समजावून दिले. यामुळेच त्यांचे हिंदुत्त्व हे भूमिनिष्ठ, विज्ञानिष्ठ आणि समाजमनाला, माणसाला अद्ययावत करण्याचे त्यांचे कार्य ज्याला समजेल तोच खरा हिंदु आणि अहिंदु यातील फरक कळून घेऊ शकेल.
अहिंदु असणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतरही काय स्थान राहील हे सावरकरांनी हिंदु महासभेच्या भाषणांमधून सातत्याने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही मुस्लिमांना नेमके ते न कळू देण्याच्या भूमिकेतून आणि मुस्लिमांच्या पुढे लाचारी पत्करीत वा मतांसाठी लाचार होत काँग्रेससारख्या पक्षाने केलेली सुरुवात ही मुस्लिम धर्मियांनाही घातक होऊन बसली आहे, हे त्यांनाही लक्षात येऊ नये, यासारखे मुस्लिमांचे दुर्दैव नाही. अलीकडच्या काळात मुस्लिम समाजाला वा धर्मीयांना सुधारण्यासाठी सत्यशोधक मंडळासारख्या फारच थोड्या संघटना आणि व्यक्तींचे प्रयत्न झालेले दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यादृष्टीने धर्म या शब्दाची व्य़ाख्या वा अर्थ किंवा त्या संकल्पनेचे नेमकेपण काय आहे ते पाहाण्यासारखे आहे. विज्ञानिष्ठ निबंधामध्ये त्यांनी धर्माबाबत खूप नेमकेपणाने स्पष्ट केले आहे. त्यांच्या धर्मासंबंधातील या नेमकेपणाच्या निष्कर्षातून त्यांचे बुद्धिवादाविषयक मार्ग लक्षात येतात. हिंदुत्वाची त्यांची नेमकी व्याख्या, त्यांची संकल्पना समजू शकते. धर्म म्हणजे नेमके काय, त्यामागची धारणा काय आदी बाबींची शहानिशा करणे म्हणजे बुद्धिवादाचे महत्त्वाचे काम आहे. अद्ययावत होण्यासाठी सावरकरांचा हाच दृष्टिकोन पाहाणे गरजेचे आहे. कारण याच दृष्टिकोनामुळे सावरकर यांची विज्ञाननिष्ठा, समाजाविषयीचा दृष्टीकोन, धर्मांबद्दलचे मत, हिंदुस्थानाबद्दलचा अभिमानपूर्ण मागोवा, इतिहासाचे त्यांचे आकलन आणि नव्या युगातील संभाव्य बदलाचाही त्यांना मिळालेला कानोसा वा अंदाज असे सारे घटक यातून स्पष्ट होत जातात.
धर्म हा जगात अतिशय महत्त्वाचा घटक असून वैयक्तिक, सामाजिक इतकेच नव्हे तर राज्यसंस्था वा राजसत्ता यांना ठरविणे वा स्वीकारणे वा उभी करणे यात धर्माने अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहे. या धर्माचे म्हणूनच चिकित्सकपणे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. किंबहुना यामुळेच धर्माच्या संकल्पनेला अफूची गोळी असे जरी साम्यवाद्यांनी म्हटले तरी त्या धर्माचे महत्त्व ते नाकारू शकले नाहीत. त्या साम्यवाद्यांमधील अनेकांना आजही धर्मसंस्थेच्या आधारे असलेल्या काही समाजघटकांनाही आपल्यामध्ये सामावणे गरजेचे वाटते. त्यातून त्यांना त्यांचा स्वार्थही साधता येतो, हे देखील एक दुर्दैवच म्हणावे लागते. सावरकरांच्यादृष्टीने मानवकल्याण वा त्याचे हित हेच महत्त्वाचे होते. त्यांनी त्याचदृष्टीने धर्माची व्यवच्छेदक व्याख्या करण्याचा वा त्याचे नेमके स्वरूप शोधण्याचा वा जाणण्याचा प्रयत्न केला. तो बऱ्याच अंशी आजही अचूक वाटतो. सावरकर यांनी धर्माचे विविध अर्थच सांगितले आहे. त्याचा व्यापक असा अर्थ नियम असा असून एखाद्या वस्तूचे अस्तित्त्व वा व्यवहार याचे नियमन करतो तो त्या वस्तुचा धर्म आहे. म्हणजे सूर्याचा धर्म प्रकाश देण्याचा आहे तर आगीचा धर्म जाळण्याचा आहे. थोडक्यात त्या वस्तुचा नैसर्गिक गुण वा नियम अर्थात त्या वस्तुचा वा संकल्पनेतचा तो गुणधर्म् आहे. ते त्या वस्तुचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे निसर्ग वा निसर्गाच्या मुळाशी असणारा नियम वा त्याला नियंत्रणात ठेवणारी शक्ती तिचा शोध वा विचार आहे असे शोध वा ज्ञान हा धर्मच आहे.
संदर्भ - सह्याद्री मासिक मे १९३६
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा