बुधवार, २४ मे, २०२३

   सावरकर : कालआज आणि उद्या    

माझ्या नजरेतून - 

हिंदुत्व म्हणजे एक धर्ममत नव्हे

हिंदुत्व म्हणजे एक धर्ममत नव्हे असे स्पष्ट करतानाच सावरकरांनी वेद या धर्मग्रंथाचा अनुनय करणारे वैदिकबुद्ध नावावरून त्याचे अनुनय करणारे बौद्धजिनमताच्या अनुयायांचे नाव जैनविष्णुचे उपासक वैष्णवलिंगपूजक ते लिंगायत असे सांगत त्यांनी हिंदु हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून वा संस्थापकावरून किंवा धर्ममतामधून निघालेले नसल्याचे सांगतिलेत्यामुळेच त्यांनी केलेली हिंदुंची व्याख्या विचारात घेण्यासारखी आहेकारण त्यामागे राष्ट्र आणि विशेष करून भूमीनिष्ठ अशा सामूहीकतेची जाण त्यांनी ठेवली होतीकिंबहुना आज जगामध्येही भूमीनिष्ठतेवरूनच अनेक देशातील लोकांना ओळखले जातेती भूमी त्यांची मानली जाते
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्तिवाद वा व्यक्तीस्वातंत्र्य यालाही तितकेच महत्त्व दिलेयामुळे धार्मिक वर्तनावर टीका करताना त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर आक्षेप न घेता त्याचा व्यक्तिवादही स्वीकारून त्यांच्याबरोबर त्या वर्तनातही सहभागी झालेमात्र स्ववर्तनामध्ये त्यांनी स्वच्छ विज्ञाननिष्ठ दृष्टी ठेवून आपल्या तत्त्वानुसार आदर्शच लोकांपुढे ठेवला.  

आगरकर आणि सावरकर या दोन्ही व्यक्ती त्यांचा काळ वेगळा असला तरी बुद्धिवादाच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्य वा व्यक्तिवादाच्या तत्त्वज्ञानाला दोघांनीही प्रखरपणे सामावून घेतले होतेकिंबहुना याच व्यक्तीवादाच्या समर्थनामधूनच सावरकरांनी आपले जीवनही या तत्त्वज्ञानाला सादर करण्यातस्वीकारण्यातसाकारण्यात  आणि अद्ययावत होण्यामध्ये अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत व्यतीत केलेप्रायोपवेशन आणि त्यामागील भूमिका इतकेच नव्हे तर मृत्युनंतर आपल्यामागे कोणी काय करावे हे देखील त्यांनी स्पष्ट केले आणि त्यामागेही अद्ययावतपणाआदर्शवत विज्ञानवादी वृत्ती त्यांनी जोपासली होती.  

हिंदुत्व म्हणजे एक धर्ममत नव्हे असे स्पष्ट करतानाच सावरकरांनी वेद या धर्मग्रंथाचा अनुनय करणारे वैदिकबुद्ध नावावरून त्याचे अनुनय करणारे बौद्धजिनमताच्या अनुयायांचे नाव जैनविष्णुचे उपासक वैष्णवलिंगपूजक ते लिंगायत असे सांगत त्यांनी हिंदु हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून वा संस्थापकावरून किंवा धर्ममतामधून निघालेले नसल्याचे सांगतिलेत्यामुळेच त्यांनी केलेली हिंदुंची व्याख्या विचारात घेण्यासारखी आहेकारण त्यामागे राष्ट्र आणि विशेष करून भूमीनिष्ठ अशा सामूहीकतेची जाण त्यांनी ठेवली होतीकिंबहुना आज जगामध्येही भूमीनिष्ठतेवरूनच अनेक देशातील लोकांना ओळखले जातेती भूमी त्यांची मानली जातेआणि त्यामुळे अधिक धर्मिय असलेल्यांना त्यांची भूमी ही मालकीची वाटत आहेमात्र हिंदुंना हिंदुस्थानावर झालेल्या अनेक आक्रमकांच्या आक्रमणातील पराभूततेच्या मानसिकतेमधून सावरकरांनी बाहेर काढलेभारतीय भूमीचा इतिहास देदिप्यमानच होताहे सांगण्यासाठी त्यांनी 'हिंदुपदपादशाहीलिहिले.  त्यातूनच आसिंधुसिंधु भारतभूमिका ही ज्याची पितृभू आणि पुण्यभू आहे तो हिंदुहे स्पष्ट करणारी हिंदुत्त्वाची व्याख्या नीट लक्षात घेतलीतर त्यांच्या हिंदुत्त्वाचा नेमका उलगडा होतो.

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...