तत्वज्ञान सावरकरांचे - ६
समाजाची, देशाची अचूक नाडीपरीक्षा
सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात लढाई करण्यासाठी मुस्लिमाना स्पष्ट सांगितले होते की, याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्या शिवाय आणि विरोधाल तर तुम्हाला विरोधूनही ब्रिटिशांना हाकलण्यासाठी आम्ही संघर्ष करू... मुस्लिमांना या देशात काय स्थान असेल, ते ही त्यांनी स्पष्ट केले होते. ती भूमिका मात्र मुस्लिमांपर्यंत तळागाळापर्यंत आजही कधीच पोहोचवली गेलेली नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेता आणि भारतातील नागरिकांची- भारतीयांची सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि बौद्धिक-मानसिक स्थिती लक्षात घेता केवळ स्वातंत्र्य मिळवणे पुरेसे नाही, ही बाब स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लक्षात आलेली होती. त्यामुळेच अंदमानाातील शिक्षेपूर्वीचे सावरकर, अंदमानातील सावरकर आणि अंदमानानंतरचे सावरकर इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरचे सावरकर हे कालागणिक अद्ययावत होत गेलेले दिसतील. त्यांचे पायाभूत विचार हे केवळ पुराणवादी हिंदुंचे नसून ते बुद्धीवादालाही स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे होते. त्यामुळेच
![]() |
| फोटो सौजन्य - सावरकर स्मारक |
हा समाज अनेक जाती जातींमध्ये विभागलेला होता, पारंपरिक अशा छोट्या स्तरावर मानल्या जाणाऱ्या वर्गातही उपजातींचा प्रादुर्भाव होता, स्पृश्यास्पृशता होती. ती समूळ नष्ट करण्याचा सावरकरांचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. आजकालच्या भाषेत सांगावयाचे तर मायक्रोलेव्हलला त्यांनी हात घातला होता. त्यासाठी त्यांच्या दुर्दैवाने अन्य राजकीय विचारांकडून मात्र त्यांना तेव्हा तशी साथ मिळाली नाही, ती का मिळाली नाही हा देखील संशोधनाचा विषय ठरावा. मुळात या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले काम हे बहुआयामी होते. ब्रिटिशोत्तर भारत कसा असेल, कसा असावा, याची ठाम कल्पना सावरकरांना तेव्हा आली होती. त्यामुळेच सावरकरांनी सांगितलेल्या हिंदुच्या व्याख्येनुसार असलेल्या हिंदुनाच नव्हे तर अहिंदुंबद्दलही त्यांनी या देशातील घटक म्हणूनच विचार केला होता. त्यामुळे मुसलमानांच्या मुस्लीम लीगने आपल्या मुस्लीम समाजासाठी हिंदुच्या पेक्षा अधिक मागण्या ज्या अवास्तव होत्या त्या मागितल्या तरी मुस्लीम लीगपेक्षाही मुसलमानी समाजाला सावरकरांनी योग्य ओळखले होते. त्यामुळे त्यांनी पोथिनिष्ठता सोडावी असे स्पष्टपणे सांगण्याची ताकद सावरकरांमध्ये होती. मात्र ती ताकद मुस्लीम नेत्यांकडे तेव्हा किती प्रमाणात तयार झाली होती किवां मुस्लीमांचे लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेसी विचारांनीही ती ताकद का दर्शवली नाही, यातच आजही मुस्लीम समाज अनेक ठिकाणी मागासलेला दिसतो तो का, त्याचे उत्तर मिळू शकेल. सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात लढाई करण्यासाठी मुस्लिमाना स्पष्ट सांगितले होते की, याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्या शिवाय आणि विरोधाल तर तुम्हाला विरोधूनही ब्रिटिशांना हाकलण्यासाठी आम्ही संघर्ष करू... मुस्लीमांना या देशात काय स्थान असेल, ते ही त्यांनी स्पष्ट केले होते. ती भूमिका मात्र मुस्लिमांपर्यंत तळागाळापर्यंत आजही कधीच पोहोचवली गेलेली नाही.
भारत ही हिंदुंसाठी भूमी आहे, जगात अन्यत्र त्यांना भूमी नाही, पण मुळातच आपली स्वभूमी असूनही हिंदु समाजालाच त्याची जाणीव नव्हती. थोडक्यात सातबारा हिंदुंच्या नावे असूनही ती जमीन हिंदुंची नाहीच आम्हीच येथील सत्ताधारी आहोत, अशा प्रकारची धारणा ब्रिटिशांनी आणि मुस्लीम नेत्यांनी करून दिली होती. बळजबरीने तशी भूमिका लादायचा प्रयत्नही चालवला होता, त्यांचा तोच प्रयत्न सावरकरांनी 'हिंदुत्व' सांगून हाणून पाडण्यासाठी कंबर कसली होती. त्यावेळच्या हिंदु मुस्लीम दंग्यांमध्ये हिंदुंसाठी मात्र वेगळा उपदेश काँग्रेसवाले देत, ब्रिटिशही वेगळा न्याय लावीत. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे सारथी पत्रकार ही महात्मा गांधीजींची भलावण करीत होते. नौखालीतील गांधी एकटेच निर्भयतेने हिंडत होते असे आचार्य अत्रे यांनी त्यावेळी लिहिले होते. मात्र त्यावेळी लॉर्ड वेव्हेलने आपल्या जर्नलमध्ये सांगितलेली स्थिती पार वेगळी होती. तेथे गांधींसाठी आपल्या पथकातील २० उत्तम पोलीस अधिकारी तैनात केल्याचे सांगितले आहे.. अशा सर्व परिस्थितीतही सावरकरांचा हिंदु समाजावर असणारा विश्वास मोठा होता, त्यांना हिंदुंचे संघटन त्यासाठीच हवे होते. कारम हिंदु समाज हा भारतात संख्याबळानेही अधिक होता. त्याला कमी लेखून मुसलमानांचे लांगूलचालन जे विरोधी काँग्रेसजन आणि ब्रिटिश सत्ताही त्यांच्या स्वार्थासाठी करीत होते, ते सावरकरांना संपुष्टात आणावयाचे होते. या साऱ्या स्थितीमध्ये सावरकरांची भाषणे वा लेख यातील उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत.
🔷🔷११ ऑक्टोबर, १९३८ रोजी पुण्यामध्ये एका भाषणात सावरकर म्हणतात...
🔷।।'हिंदुत्वाला जातीय मानणाऱ्या या काँग्रेस- राष्ट्रीयांना मला असे विचारावयाचे आहे की, तुमची मतदारांत असलेली गणना हिंदू म्हणून आहे. तुम्ही मते हिंदूंची मागता, परंतु त्यांच्या हितसंबंधांच्या रक्षणाची वेळ आली, म्हणजे मात्र हिंदुत्वाबद्दल तुम्ही नाके मुरडून राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली हिंदूंची गळचेपी करता. माझा असा सवाल आहे की, हिंदुत्वाची जर तुम्हांला इतकी चीड असेल, तर तोपर्यंत हिंदू म्हणून स्वत:चे वर्णन केल्याविना जोपर्यंत स्वतःच्या निवडणुकी होत नाहीत, तुम्ही निवडणुकीला उभे का राहता ? '
🔷२३ मार्च, १९३९ या दिवशी बिहार प्रांतीय हिंदुसंमेलन मुंगेर येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर म्हणतात...
🔷।। जे लोक हिंदुधर्माला भ्रममूलक समजतात, त्यांनी मुसलमान, ख्रिस्ती, आदी धर्मांनाही भ्रममूलक म्हटले पाहिजे. परंतु तसे कोणी म्हणत नाही... '
🔷🔷३१ जुलै, १९३७ रोजी पुण्यात पुरोगामी विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानपत्र दिले. त्यात एस. एम. जोशी, भाऊ फाटक होते. त्यावेळी 'सावरकरांची आजची राजकीय मते आम्हांस मान्य नाहीत. आम्हांस १९०८ चे सावरकर मान्य आहेत. ते आम्हांला पाहिजेत. त्यांची आजची हिंदुसंस्थानिकांसंबंधीची भूमिका आम्हांला पटत नाही. हिंदू हे हिंदू ह्या नात्याने संघटित होऊन राजकारणात एक प्रभावी शक्ती म्हणून कार्य करू शकतील, असे आम्हांस वाटत नाही... असे फाटक म्हणाले होते. हिंदूंनी एकत्र येऊन मुसलमानी आक्रमणाला तोंड द्यावे, एवढे फक्त त्यांना खटकत होते. उत्तर देताना सावरकर म्हणाले...
🔷 ।।'... धर्म ही अफूची गोळी वाटत असेल, तर टाकून द्यायला मी केव्हाही सिद्ध आहे. पण हा न्याय केवळ हिंदू धर्माला लावून चालणार नाही. तो सर्व धर्मांना लावा. हे माझे मत तुम्हांला मान्य नाही काय?'
🔷🔷 कर्णावती - अहमदाबाद येथे डिसेंबर १९३७ मधे हिंदुमहासभेच्या वार्षिक अधिवेशन सावरकर म्हणाले होते...
🔷।। '... आम्ही एक राष्ट्र नाही, असे म्हणणारे काही पंडित ग्रेट ब्रिटन, रशिया, अमेरिका, जर्मनी ह्यांना मात्र एक राष्ट्र म्हणून मान्यता देतात. ह्या राष्ट्रांतही अंतर्गत विभेद आहेतच. पण त्या अंतर्गत विभेदांपेक्षा बाह्य जगांपेक्षा त्यांच्यांत जी एकात्मता आहे आणि शेजाऱ्यांपासून उठून दिसणारा जो बेगळेपणा आहे, त्यामुळे ही जशी एकेक राष्ट्र म्हणून ओळखली जातात, त्याच न्यायाने हे हिंदुराष्ट्री स्वयंमेव एकराष्ट्र आहे. शतावधी वर्षांपासून आमचा धर्म, आमची संस्कृती, भाषा, लिपी एक आहे.
🔷🔷कोणता धर्म शांतताप्रिय आहे ? या २७ जानेवारी, १९२७ च्या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात...
🔷।। बॅरिस्टर अमीन यांचे दिल्लीचे अत्यंत उद्दाम भाषण गांधीजींनी वाचले नसेल असे थोडेच आहे! परंतु त्याबद्दल त्यांच्या मुसलमान संबगड्यांबरोबरच त्यांनी मौन स्वीकारून 'संख्याबलामध्ये काय आहे' अशी चर्पटपंजरी चालविली आहे. मुसलमानांना अशा वेळीही स्पष्ट इशारा देण्याचे नैतिक धैर्य गांधीजींना स्फुरत नाही व एखादा तेजस्वी आर्यसमाजी या प्रकारच्या मुसलमानांच्या चवचाल बढाईस उत्तर देऊ लागला, म्हणजे मात्र त्या आर्यसमाजावर एखाद्या मारक्या पंतोजीप्रमाणे चिडखोरपणे आपल्या लेखणीची छडी उगारून तुटून पडण्यात त्यांना मोठा पुरुषार्थ वाटतो, हेच शल्य हिंदू लोकांच्या मनांत बोचत असते. गांधीजी महात्मे आहेत व म्हणून पक्षपातातीत आहेत हे आम्हांला कळते. परंतु स्वजातीकडे झुकणे याला जसे पक्षपात हे नाव आहे, तसे परज्ञातीकडे झुकणे यालाही पक्षपात हेच नाव शब्दकोशामध्ये आहे. यावर उपाय केला, सर्व काही सुयंत्र होणार आहे. इस्लाममध्ये जे शांततेचे, सहिष्णुपणाचे, भूतदयेचे उपदेश महात्माजींना अवगत आहे. ते वास्तविक महात्माजींनी मुसलमानांना 'यंग इंडिया 'मधून शिकविले पाहिजेत व त्यांचे पट्टशिष्य अल्लीबंधू यांच्याकरवी खिलाफतीवर जशीं व्याख्याने झाली, तशी इस्लाममधल्या शांतीच्या मंत्रांवर व्याख्याने करविली पाहिजेत. मुसलमानांना राष्ट्रीयवृत्ती शिकविण्याकरिता प्रसंगी कडू, परंतु अंती गुणकारी असे बोध केले पाहिजेत. परंतु हे सर्व सोडून, ज्या वेळी ते गुळमुळीत बोलू लागतात व हिंदूंनाच निष्कारण दोषी धरतात, मुसलमानांच्या कोहाटसारख्या सर्वापराधांची निश्चिती झाली असूनही ती ज्या वेळी ते मौन स्वीकारतात, त्या वेळी निश्चयाने व निकराने सांगणे आम्ही कर्तव्य समजतो की, हे निदान चुकीचे आहे व खऱ्या कलहाचे कारण अन्यत्र आहे.
🔷🔷'संख्याबळ हेही वळच आहे !!' या १७ फेब्रुवारी, १९२७ च्या लेखात सावरकर म्हणतात...
🔷।। 'आम्हांस गुणबळ तर हवेच आहे; पण आम्हांस संख्याबळही हवे आहे. आमचे हिंदू राष्ट्र आम्ही संख्येनेही घटू देणार नाही; गुणानेही घटू देणार नाही. अस्पृश्यतानिवारण आणि शुद्धी या दुहेरी साधनांनी आम्ही आमचे संख्याबळही बाढवू आणि गुणबळही वाढवू. आणि केवळ गुणबळ पंगू आहे, केवळ संख्याबळ अंध आहे, हे सामाजिक सत्य तुमच्यापेक्षा आम्हांस पक्केपणी कळले आहे. 'नुसत्या संख्याबळात काय आहे हे शहाणपण आम्हांस शिकविण्याची तसदी आपण घेऊ नये. अगदी राहवतच नसेल, तर ते शहाणपण मुसलमानादिक आपल्या भाईबंदांना जुम्मा मशिदीत जाऊन - शिकवा. त्यांस त्याची खरोखर फार आवश्यकता आहे. अर्थातच जुम्मा मशिदीची पायरी, हें शहाणपण शिकविण्यासाठी, चढण्याचे धैर्य तुम्हांस होत असेल, तर !!
राजकीय दृष्टीने सावरकरांनी सांगितलेली ही विधाने, प्रतिपादने सावरकरी विचारांचा स्पष्टपणा येथे दाखवून देतात. सावरकर इतक्यावरच थांबलेले नाहीत तर हे सर्व करताना सामाजिक सुधारणांबद्दल त्यांनी केलेले कार्य हे खरे हिंदु समाजामध्ये घडवलेली क्रांतीच आहे. ती सविस्तर पाहावी, विचार करावी आणि सावरकरांबद्दल केले गेलेले अपप्रचार त्यातूनच संपुष्टात येऊ शकतील. अर्थात ही बाब तार्किकतेने विचार करणाऱ्या आणि पूर्वग्रह न ठेवता तटस्थपणे गांभीर्याने विचार करणाऱ्यांना समजू शकेल. सावरकर हे यातूनही बुद्धिवादाला आणि व्यक्तिस्वातंत्र्यालाही किती महत्त्व देत होते, ते देखील त्यांच्या त्या कामांमधूनही दिसून येईल. आणि त्यातूनच त्यांच्या हिंदुसमाजाच्या नाडील परीक्षेचीही नक्कीच कल्पना येऊ शकेल.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

हिंदू आणि मुसलमान या मुख्य दोन हिंदुस्थानातील धर्मांमध्ये गांधीजींची हिंदू धर्माविषयी ची असलेली बोटचेपी भूमिका सावरकर पदोपदी उघड करतात. सावरकरांना गुणबळाची महती तर पटलीच होती, पण संख्याबळाचे भानही त्यांना होते. त्यामुळे राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी ते मुस्लिमांना आवाहन करतात; पण त्यासाठी कोणतीही लाचारी पत्करत नाहीत हे त्यांच्या जगण्यातून, निवेदनातून सतत जाणवते.
उत्तर द्याहटवा