तत्वज्ञान सावरकरांचे - ८
आजही देव, देश आणि धर्म यांचे परस्परसंबंध कमी झालेले नाहीत. राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि घर, घराच्या उंबरण्यापासून ते राज्य, देश आणि जगाच्या विविध देशांपर्यंत या परस्परसंबंधांवर आधारित सत्ताकारण आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यवीरांना राजकारणापासून अलिप्त राहाण्याचे बंधन घातले गेले होते, ते त्यांनी जरी पाळले असले तरी ते त्या सर्वांचा मूलभूत गाभा हा स्वातंत्र्याच्या उद्घोषाचाच होता. या संबंधात सखोल विचार करणाऱ्यांनाच त्यातील बारकावे समजू शकतील. रत्नागिरीतील त्यांचे १९३७ पर्यंतचे वास्तव्य हा देखील त्यांच्याद्वारे देश, देव, धर्म, मानवता, समाज यासाठी झालेला वास्तववादी, समानतावादीस समतावादी, समाजवादी इतकेच कशाला गांधीवादी आणि धर्मवादी म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारीच घटना होती.
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा काळ कसा होता, त्यावेळी हिंदु समाजाची मानसिकता कशी होती, त्यावेळी हिंदु समाज क्रांतिकारक बदल किती क्षमतेने स्वीकारणारा होता , रितीरिवाज, पोथिनिष्ठ धर्माचे किती मोठ्या प्रमाणात अनुकरण करणारा होता केवळ समाजच नव्हे तर या हिंदु समाजाचे धार्मिक आणि समाजातील मान असणारे लोक, नेते, धर्मगुरूही कशा प्रकारचे होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय अचूकपणे ओळखले होते. विशेष म्हणजे ती सारी वास्तवता लक्षात घेऊनही त्यांनी राष्ट्रोन्नतीसाठी, समाजोन्नतीसाठी आणि धर्माच्या नावे होणाऱ्या रिती-रिवाज, परंपरा यांच्यासंबंधात लोकांच्या असणाऱ्या भावना, मानसिकता यामधील त्यांची वैयक्तिकता वा व्यक्तीस्वातंत्र्याचा भागही जपत रत्नागिरीमधील स्थानबद्धतेत त्यांनी समाजक्रांतिचे काम केले. ते काम खरे म्हणजे देशभरात पोहोचणे तेव्हाही आवश्यक होते आणि आजही त्याचे महत्त्व तसूभरही कमी झालेले आहे असे वाटत नाही. याचे कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते, काँग्रेसवीर नव्हते. स्वातंत्र्य या शब्दाच अर्थ खऱ्या अर्थाने त्यांनी जाणला होता. केवळ राजकीय स्वातंत्र्य इतकीच संकल्पना त्यांनी मनामध्ये बाळगली नाही, त्यामुळे स्वातंत्र्याचे सत्त्व, तत्त्व आणि महत्त्व त्यांनी पू्र्ण जाणून त्यादृष्टीने आपल्या बंधनाच्या काळातही रत्नागिरीतील स्थानबद्धतेत देश, धर्म, समाज, व्यक्ती, मानवता अशा व्यापक अर्थाने हिंदु धर्माला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. नव्हे ती तर एका क्रांतिकारकाने घडवलेली सामाजिक क्रांतीच होती.
आजही देव, देश आणि धर्म यांचे परस्परसंबंध कमी झालेले नाहीत. राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि घर, घराच्या उंबरण्यापासून ते राज्य, देश आणि जगाच्या विविध देशांपर्यंत या परस्परसंबंधांवर आधारित सत्ताकारण आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यवीरांना राजकारणापासून अलिप्त राहाण्याचे बंधन घातले गेले होते, ते त्यांनी जरी पाळले असले तरी ते त्या सर्वांचा मूलभूत गाभा हा स्वातंत्र्याच्या उद्घोषाचाच होता. या संबंधात सखोल विचार करणाऱ्यांनाच त्यातील बारकावे समजू शकतील. रत्नागिरीतील त्यांचे १९३७ पर्यंतचे वास्तव्य हा देखील त्यांच्याद्वारे देश, देव, धर्म, मानवता, समाज यासाठी झालेला वास्तववादी, समानतावादीस समतावादी, समाजवादी इतकेच कशाला गांधीवादी आणि धर्मवादी म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारीच घटना होती. काहींनी त्याकडे भले हेतूपुरस्सर स्वार्थात्मक दृष्टीने दुर्लक्ष केले असले तरी त्या काळात त्यांचे तेथील वास्तव्य हे कर्मवीर शिंदे, व्ही. व्ही. एस. अय्यर, गांधीजी, आंबेडकर, माधव बागल, डॉ. हेडगेवार, ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक यांच्यासारख्यांना महत्त्वाचे वाटले, त्यांनी त्यासाठी रत्नागिरीत येऊन सावरकरांची भेटही घेतली. ही बाब कोणी कितीही राजकीय अर्थ काढत आज सावरकरविरोधी टीकेसाठी वा आरोपांसाठी जरी वापरली तरी त्यातूनही सावरकर यांचे तेथील कार्य आणि रत्नागिरीतील अस्तित्त्व- वास्तव्य किती परिणामकारक होते, त्याचीच साक्षदायी ठरते.
स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगांव या गावात विष्णुपंत दामले यांच्या घरातील १२ फूट लांब आणि सात फूट रुंद इतक्या खोलीत वास्तव्य करून होते. ही खोली म्हणजे मूळ भाताचे कोठार होती. त्या वास्तव्यासंबंधातील विविध आठवणी दामले यांचे पुत्र मोरेश्वर दामले यांनी लिहिल्या होत्या. केसरीमध्ये त्या लेख रुपाने प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर पुस्तकरूपात (सावरकर स्मृति) त्या प्रकाशित करण्यात आल्या. त्यातील सावरकरांसबंधातील वाक्ये, घटना, त्यावेळची सावरकरांची विधाने आणि तत्कालीन परिस्थतीचे दर्शन देणारी माहिती वाचल्यानंतर सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचे महत्त्व लक्षात येईल. याच रत्नागिरीमधील वास्तव्यात त्यांनी नेपाळी आंदोलन, मोपल्यांचे बंड, संगीत उःशाप, लिपी शुद्धी, माझी जन्मठेप, हिंदुपद पादशाही, भाषा शुद्धी, संगीत संन्यस्त खड्ग, उत्तर क्रिया, किर्लोस्कर मासिकांतील विज्ञाननिष्ठ निबंध तसेच क्रांतिकारक भगतसिंग यांच्या फाशीनंतर दुसऱ्या दिवशी रत्नागिरीत प्रभातफेरी काढली त्यावेळी लिहिलेली गायिली गेलेली कविता ही सावरकर यांनीच अतिशय गुप्तपणे तयार करून दिली होती.
सावरकरांचे रत्नागिरीतील हे वास्तव्य जन्मजात जातिभेद नष्ट करण्यासाठी झगडणारे होते, सर्वस्तरातील हिंदुंना एकत्रित आणणे, त्यांच्यामधील भेदभाव संपवणे आणि हिंदुंनीच लादलेल्या धर्मांतर्गत सात बेड्यांना तोडण्याचे कामही अतिशय जोरकसपणे केले. हे सर्व कार्य हे साधे नव्हते. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या, जातिभेद- उपजातिभेद मानणाऱ्या समाजाला, अगदी धार्मिक गुरुंनाही सुनावण्याचे काम सावरकरांनी केले.
🔴🔴
🔷 शिरगावातील गुरव समाजाने बांधलेल्या हनुमानाच्या छोट्या मंदिरातील उत्सवासाठी जेव्हा सावरकरांना बोलावण्यात आले तेव्हा सावरकरांनी अट घातली तेव्हा सांगितले की,
🔶।। 'मी उत्सवाला येईन, पण एका अटीवर आणि ती ही की माझ्याप्रमाणेच गावांतील महार-चांभार वगैरे मंडळींना, ज्यांना तुम्ही अस्पृश्य समजता त्यांना, आमंत्रण दिले गेले पाहिजे.' मोठ्या मिनतवारीने गुरव यानी अस्पृश्यांना उत्सवाचे आमंत्रण देण्याचे मान्य केले. सुमारे अर्धा तासापर्यंत सावरकर त्यांच्याशी युक्तिवाद करीत होते.
सावरकरांनी त्यावेळी दामले यांना सांगितलेकी, शेकडो लेख किंवा व्याख्याने यापेक्षा प्रत्यक्ष केलेल्या कार्याचाच जास्त परिणाम होत असतो. आता हनुमान जयंतीच्या दिवशी तू पाहशीलच. त्याच रात्री सावरकरांनी एक फुटकी दगडी पाटी व बारीकशी दगडी पेन्सिल घेऊन त्यावर तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु' या एकता गीताची | रचना केली.
🔷🔷
बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनानंतर त्यामधीली काही नेते मंडळी हिंदु-मुस्लीम एकी संबंधात जेव्हा रत्नागिरीत सावरकरांना भेटायला आली होती. तेव्हा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सावरकरांनी त्यांना सुनावले, ते शब्द त्यांच्या स्वराज्य या शब्दाला असलेले महत्त्वच विशद करणारे आहेत. ते म्हणतात...
🔶 ।। मी, पंडित मदनमोहन मालवीय, लाला लजपत राय, डॉ. मुंजे, स्वामी श्रद्धानंद इत्यादि हिंदु संघटन करणारे लोक स्वराज्य दूर दवडीत आहेत ? महाशय! ज्यावेळी तुमचा जन्महि झाला नसेल त्यावेळी आम्ही स्वराज्यास्तव फाशीच्या फळ्यांपर्यंत जाऊन आलो आहोत. ज्यांचा सर्व जन्म स्वराज्यास्तव अनन्वित हालअपेष्टा आणि कष्ट काढण्यांत गेला आणि जात आहे अशांबद्दल हे उद्गार काढण्यास तुम्हांला कसलीच दिक्कत वाटली नाही हे कोणत्या मनोभावनेचे द्योतक? लक्षांत ठेवा की तिकडे केमालपाशा खिलफतींची खिरापत करतो आहे तर आम्ही इकडे 'खिलाफत' डोक्यावर घेऊन नाचत आहों कां तर हिंदु-मुसलमानांच्या एकीसाठी. तबलीघच्या ( हिंदुना मुसलमान करुन घेण्याची चळवळ ) चळवळीविरूद्ध आम्ही हिंदु 'ब्र' काढत नाही ; का तर हिंदु मुसलमानांच्या एकीसाठी ! अनेक ठिकाणी मुसलमानाच्या आगळिकीने दंगे होतात, पण आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवीत नाही. का तर हिंदु-मुसलमानांची एकी बिघडेल म्हणून. आणि 'स्वराज्य स्वराज्य म्हणजे तरी काय हो ? ज्यात स्वत्व राहते तेच स्वराज्य ना ? मग ज्यात आपले हिंदूंचे स्वत्व रहाणार नसेल ते आमचे स्वराज्य होईल काय ? तुमच्यासारख्यांच्या भोंगळ बावळट आणि कचखाऊ वृत्तीमुळेच मुसलमान शेफारून जातात, गेलेहि आहेत. मुसलमानांना त्यांचे योग्य ते हक्क देऊ नये म्हणून आम्ही कधी तरी म्हटले आहे का ? सुखेनैव त्यांनी भारतात सुखासमाधानाने नांदावे. पण ते जर अद्यापहि आपल्या एका काळाच्या हिंदुस्थानावरील राजकीय वर्चस्वाच्या स्वप्नात दंग असतील व तशीच भविष्यकाळाची स्वप्ने रंगवीत असतील तर ते मात्र आम्ही चालू देणार नाही.
🔷🔷
पतितपावन मंदिराची उभारणी हा देखील एक रत्नागिरीतीलच नव्हे तर सामाजिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि क्रांतिकारक विषय होता. त्यावेळी उद्योजक भागोजीशेट कीर यांनी एका उत्सवाला सावरकरांना बोलावले होते. त्यावेळी शिवपूजेसंबंधात त्यांना सावरकरांनी सांगितले आणि त्यातूनच कीर यांनीद्वारे हे पतितपावन मंदिर उभारले गेले. त्यावेळी संभाषणात सावरकर म्हणाले होते.....
🔶।। आपणाला शिवपूजा बांधू न देण्यांत सनातनी लोकांनी अन्याय केला यात शंकाच नाही. कारण देव भावाचा भुकेलेला असतो. पण सनातन्यांच्या अन्यायामुळे आपण ज्या सात्विक आनंदाला मुकला होता त्याच आनंदाला आपले पूर्वांस्पृश्य बांधव आज शेकडो वर्षे मुकले आहेत त्याचे काय ? आपण सवर्ण असल्याने देवळांत जाऊन देवदर्शन तरी घेऊ शकतो; पण त्यालाहि अस्पृश्यांना बंदी आहे. तेव्हा आपणावर जो अन्याय झाला त्याहीपेक्षा जास्त अन्याय आपल्या अस्पृश्य बांधवांवर होत आहे, हे खरे नाही का ? आपण धनाढ्य असल्याने हे शिवमंदिर बांधू शकलात. पण त्याहोन-दीन दुवळ्या अस्पृश्यांचे काय ? त्यांच्यासाठी त्यांना स्वहस्ते देवमूर्तीची पूजा करता येईल असे एखादे मंदिर आपण बांधून दिले तर सनातन्यांवरील आपला राग मी सार्थ समजेन
त्यावर कीर यांनी 'होईल, आपण म्हणता तसेहि प्रभूची इच्छा असेल तर होईल, ” असे सांगितले आणि हे संभाषण हेच या रत्नागिरीतील पतितपावन मंदिरासंबंधातील सूतोवाच ठरले.
🔷🔷
तत्कालीन रुढीप्रिय समाज सावरकरांनी मांडलेल्या अशा समाजक्रांतिकारी कामांमुळे, विधानांमुळे त्यांच्यावर संतापलेलाही होता. काहींनी त्यांना पाखंडीही म्हटले होते. जातिभेदाच्या विरोधातील त्यांच्या कार्यक्रमात असलेले सहभोजन असो की, मंदिरातील दर्शन, असो सात बेड्यांना तोडण्याचा त्यांचा सुस्पष्ट आदेश असो. त्या संबंधातील सावरकरांचे काम हे निर्धाराने चालू होते. या काळात त्यांनी काही विधाने व उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत.
🔶।। हिंदु जातीच्या सध्याच्या दुबळेपणाला, विस्कळीतपणाला हिंदूतील जातिभेद हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे
🔶।। जातिभेद हा सप्तपाद प्राणी आहे. ते सात पाय म्हणजे बेदोक्तबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी. या सात पायांपैकी सिंधूबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी हे तीन पाय कालौघात बरेचसे कमकुवत झाले आहेतच. आता उरलेले चार पाय, म्हणजं वेदोक्तबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी हे चार पाय विशेषतः स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी हे तीन पाय आपण तोडले म्हणजे जातिभेदरूपी सप्तपाद प्राणी खाली कोसळलाच म्हणून समजा. जातिभेद-निर्मूलनासाठी सहभोजने झाली पाहिजेत बाणि ती सुद्धा 'जातिभेदोच्छेनार्थ अखिल हिंदु सहभोजन करिष्ये' असा संकल्प सोडून.
🔶।। “शेटजी, देऊळ आपले, आपण धनी ; तेव्हा समारंभ आपण करालच. पण प्रत्येक हिंदूला वेदोक्ताचा अधिकार आहे या तत्त्वाला आपण सोडणार असाल तर आपण मलाहि सोडल्यासारखेच होईल. जुनी देवळे थोडीं नाहीत. तत्त्वाचे अधिष्ठान म्हणून हे नवें देऊळ हवे आहे. ते साधत नसेल तर आपण मलाहि सोडावें. पण जर आपण तत्त्वास सोडणार नसाल तर याहि परिस्थितीत समारंभ मी पार पाडीन. पण आमच्या अखिल हिंदु-स्मृतीच्या आधारे, पूर्वास्पृश्यासह अखिल हिंदूंचा जो हजारोचा समुदाय आज आलेला आहे त्या हजारो हिंदूच्या हस्ते देवमूर्ति उचलून जय देवा' असा घोष करून आम्ही ती मूर्ति स्थापणार हाच आमचा विधी; 'हिंदुधर्म की जय ' चे हजारो कंठातून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि 'भावेहि विद्यते देवो हाच आमचा शास्त्राधार.
🔶 ।। 'वेदकाली जातिभेद नव्हता. वर्णभेद होता. मनुष्याचे आचार विचार आणि धंदे यावर तो ठरविला जात असे. ज्या घराण्यांत जो आचार-विचार किंवा धंदा असे तोच सामान्यतः पुढेहि चाले आणि त्यामुळे हे वर्णहि जन्माने ठरूं लागले. पुढे या वर्णातील लोकहि निरनिराळे धंदे करू लागले, त्यांचे आचार-विचारहि निरनिराळे होऊ लागले. तेव्हा चार वर्णातहि अनेक भेद झाले व त्याच जाती म्हणून ओळखण्यात येऊ लागल्या. पुढे ज्या जातींत जो जन्माला आला तो त्या जातीचा म्हणून गणला जाऊ लागला. मग त्याचे आचार-विचार कसेहि असोत. मनस्मृतीच्या आधारे आज किती लोक स्वतःला ब्राह्मण म्हणवू शकतील ? या जन्मजात जातिभेताचे मुख्य गमक म्हणजे मुख्यतः इतर जातींशी रोटीबंदी व बेटीबंदी. त्यामुळे आपल्या समाजांत अनेक भेद पडले, आपाप सांत हेवेदावे निर्माण झाले आणि आपक। एकजिनसी आणि सामर्थ्य-संपत्त हिंदु समाज विस्कळीत आणि दुबळा झाला. तो जर परत एकजिनसी आणि सामर्थ्यसंपन्न व्हावयास पाहिजे असेल तर त्यांच्यांतील हे कुचकामी, घातक आणि आज तरी कोणत्याहि दृष्टीने समर्थन न करता येणारे जन्मजात जातिभेद नष्ट झालेच पाहिजेत. ते अपोमान नष्ट होत नसतील तर बुद्धया नष्ट केले पाहिजेत.
🔶।। श्रुति, स्मृति, पुराणें कांहीहि म्हणोत, सद्यःस्थितीत जर हे जातिभेद हिंदु समाजाला घातक ठरत असतील तर श्रुति, स्मृति, पुराणांत कांही हि सांगितलेले असले तरी तो वाजूला सारून समाजाने हे जातिभेद नष्ट केले पाहिजेत असे माझे ठाम मत आहे. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. जन्मजात जातिभेद नव्हे. हा जातिभेद हिंदुसमाजाला विस्कळीत, दुर्बल, तेजोहीन बनवीत आहे आणि म्हणून तो मोडला पाहिजे, तोडला पाहिजे.
🔶।। महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर कर्वे यांच्यावर लोकांचे हेच आक्षेप होते. पण आता चाळीस-पन्नास वर्षानंतर त्यांची मतें जवळजवळ सर्वमान्य झाली आहेत. कोणी सांगावें, चाळीस-पन्नास वर्षानंतर' माझी ही जात्युच्छेदनाची चळवळहि अत्यंत योग्य होती असाहि हिंदुसमाज कौल देईल. आणि ह्याच मूठभर असणाऱ्या आम्हां लोकांची मतें सवं समाजाचीहि होतील. माझ्याविषयी म्हणाल तर हिंदु समाज सामर्थ्यसंपन्न व्हावा म्हणून ज्या ज्या गोष्टी मला आवश्यक वाटतात त्या त्या मी निर्भीडपणे सांगणार प्रचारविणार. मग त्यामुळे मी एकटा उरलो किंवा लोकांनी माझें टाळकें फोडलें तरी त्याची मला पर्वा नाही.'
(क्रमश:)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा