तत्वज्ञान सावरकरांचे - ९
सावरकरांचे सम्यक हिंदुत्त्व
सावरकरांचे हिंदुत्व हे भूमिनिष्ठ आहे, विज्ञानधर्माला मानणारे अद्ययावत होत लोकांनी पोथिनिष्ठता सोडून कालाप्रमाणे जगावे असे सांगणारे आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सनातनी धर्माच्या म्हणजे आजच्या घडीला चातुर्वर्ण्य मानणाऱ्या, जातिव्यवस्था मानणाऱ्यांना चांगलीच चपराक देत सावरकरांनी सर्वांना समतेचा धडा दिला होता. सामाजिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर त्यांनी या धर्मव्यवस्थेला जुन्या रिवाजातून नव्या कालाप्रमाणे अद्ययावत होत विज्ञाननिष्ठ व्हायला प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली. हे सारे करीत असताना सामाजिक स्तरावर असणारे बौद्धिक शिक्षणाचे प्रमाणही त्यांना जाणवलेेले होते. यामुळेच त्यांचे त्या स्तरावरही असणारे हे प्रयत्न किंबहुना व्यवहारिक स्तरावर जात साम्यवादी विचारांना भारतीय पद्धतीने साकारण्याचा असावा, असे म्हणता येते. त्याचबरोबर हे करीत असताना त्यांनी त्या कालातील समाजधुरिणांनाही झटका दिला, त्यांच्यावरही धर्मसंबंधातील विविध पोथिनिष्ठ बाबींवर वाद घालून पेचात पकडले आणि जातिभेदामुळे तळागाळातील लोकसमूहाला एका समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न यशस्वी केला होता. रत्नागिरीतील त्यांचे ते कार्य हे त्याचेच उदाहरण आहे. तेथील त्यांचे ते काम म्हणजे साम्यवादातील समाजव्यवस्थेला भारतीय साच्यात बसवण्याचा त्यांचा भर असल्याचे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही.... थेट समाजवाद वा साम्यवाद म्हणत काम करणाऱ्या आजच्या अनेक नेत्यांना अजूनही न जमलेल्या गोष्टी सावरकरांनी त्या काळात केल्या होत्या, काळाप्रमाणे विचार करून ती तुलना केल्यास सावरकरांचा हा राष्ट्रधर्माला जागून हिंदुसमाजाला जागवणारा विचार हा किंबहुना जगातील मार्क्स-एंगेल्स आदींच्या साम्यवादाचे हिंदुरूप म्हणायला हरकत नाही. किंबहुना सावरकरांचे हिंदुत्त्व हे सम्यक हिंदुत्त्व होते. असे म्हणणे अधिक रास्त वाटते.
सावरकरांचे तत्त्वज्ञान हिंदुस्थानातील राष्ट्रवादाबरोबरच साम्यवादाच्या धर्तीवर राष्ट्रधर्माच्या विचाराने समतेच्या दृष्टीने जाऊ पाहाणारे होते. सर्व धर्माच्या भारतीयांचे अस्तित्त्व त्यांनी नाकारलेले नव्हते, नकारलेले ही नव्हते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीयतेची, धर्माची, जातिभेद निर्मूलनाची आणि आर्थिक-औद्योगिक, लष्करी, परराष्ट्रीय धोरणांची सूत्रेही त्यांनी राष्ट्रहिताच्यादृष्टीने स्पष्ट केलेली होती. त्यांचे आर्थिक उन्नतीसंबंधातील वा उत्पादन, उत्पन्न, कामगार, शेतकरी यांच्या संबंधातली विचार त्यांनी मार्क्ससारखे अर्थविषयक तज्ज्ञ नसूनही संक्षिप्त पद्धतीने मांडताना सुस्पष्ट मांडले आहेत वास्तविक त्यावेळी सत्ता हातात नव्हती ना सत्तेची पाकळीही त्यांच्याप्रत आलेली नव्हती. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधून बाहेर पडल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात इंग्रजांच्या निर्बंधांनंतर ते उतरल्यानंतर आणि हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचीही चाहुल लागली गेली होती. अशा स्थितीतही त्यांनी औद्योगिकरण, हिंदुंचे सैनिकीकरण करण्याबरोबरच शिक्षण, यंत्रांचा स्वीकार आणि त्यांचे महत्त्व तसेच शेती, ग्रामीण भाग येथील सुधारणांचा विकासही कसा व्हावा याबद्दल त्यांनी सुतोवाच केले होते. त्यामागील सूत्रे, तत्त्वे तसेच वैज्ञानिक-लष्करी विकास याबद्दलही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी भूमिका मांडली. स्थानबद्धता संपुष्टात आल्यानंतर सावरकर कोणाकडे येणार याबद्दल मोठी आकांक्षा- उत्सुकता काँग्रेसप्रमाणेच साम्यवाद्यांनाही होती, त्यामुळे त्यांचे स्वागतही तितकेच राजकीय पद्धतीने केले गेले होते, हे संबंधित कालातील घटना वाचल्यानंतर लक्षात येईल. त्यांचे महत्त्व तेव्हाही लक्षणीय होते हे म्हणूनच नाकारता येत नाही. अशा स्थितीत सावरकरांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षीय भाषणातून आर्थिक क्षेत्रासंबंधात जी प्रतिपादने केली ती काळजीपूर्वक पाहून विचार करायला लावणारी आहेत.
सावरकरांनी हिंदुत्वामध्ये केलेली हिंदुत्वाची व्याख्या ही नीटपणे लक्षात घेतली तर त्यांचे हिंदुत्व हे भूमिनिष्ठ आहे, विज्ञानधर्माला मानणारे अद्ययावत होत लोकांनी पोथिनिष्ठता सोडून कालाप्रमाणे जगावे असे सांगणारे आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सनातनी धर्माच्या म्हणजे आजच्या घडीला चातुर्वर्ण्य मानणाऱ्या, जातिव्यवस्था मानणाऱ्यांना चांगलीच चपराक देत सावरकरांनी सर्वांना समतेचा धडा दिला होता. सामाजिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर त्यांनी या धर्मव्यवस्थेला जुन्या रिवाजातून नव्या कालाप्रमाणे अद्ययावत होत विज्ञाननिष्ठ व्हायला प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली. हे सारे करीत असताना सामाजिक स्तरावर असणारे बौद्धिक शिक्षणाचे प्रमाणही त्यांना जाणवलेेले होते. यामुळेच त्यांचे त्या स्तरावरही असणारे हे प्रयत्न किंबहुना व्यवहारिक स्तरावर जात साम्यवादी विचारांना भारतीय पद्धतीने साकारण्याचा असावा, असे म्हणता येते. त्याचबरोबर हे करीत असताना त्यांनी त्या कालातील समाजधुरिणांनाही झटका दिला, त्यांच्यावरही धर्मसंबंधातील विविध पोथिनिष्ठ बाबींवर वाद घालून पेचात पकडले आणि जातिभेदामुळे तळागाळातील लोकसमूहाला एका समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न यशस्वी केला होता. रत्नागिरीतील त्यांचे ते कार्य हे त्याचेच उदाहरण आहे. तेथील त्यांचे ते काम म्हणजे साम्यवादातील समाजव्यवस्थेला भारतीय साच्यात बसवण्याचा त्यांचा भर असल्याचे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. हे करीत असताना त्यांनी लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचाही सहानुभूतीने विचार केला होता. त्यांच्या त्यांच्या धार्मिक मताला बदलण्यासाठी बदलवण्यासाठी त्यांनी झटून काम केले होते. अर्थात हे सर्व काम करताना परिस्थिती एका रात्रीत बदलू शकणार नाही, हे कोणीही मान्य करील पण तरीही त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नव्हता. थेट समाजवाद वा साम्यवाद म्हणत काम करणाऱ्या आजच्या अनेक नेत्यांना अजूनही न जमलेल्या गोष्टी सावरकरांनी त्या काळात केल्या होत्या, काळाप्रमाणे विचार करून ती तुलना केल्यास सावरकरांचा हा राष्ट्रधर्माला जागून हिंदुसमाजाला जागवणारा विचार हा किंबहुना जगातील मार्क्स-एंगेल्स आदींच्या साम्यवादाचे हिंदुरूप म्हणायला हरकत नाही. किंबहुना सावरकरांचे हिंदुत्त्व हे सम्यक हिंदुत्त्व होते. असे म्हणणे अधिक रास्त वाटते.
हिंदुरुप हा शब्द सावरकरांच्या भूमिनिष्ठ- विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाबरोबर, पराभूत मानसिकतेतून बहुसंख्य हिंदुंची अस्मिता जागवणाऱ्या हिंदु शब्दाशी समान आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे. वि. दा. सावरकर यांचे हिंदुत्व आणि अन्य संघटना संस्थांचे सध्या सांगण्यात येणारे हिंदुत्व यात बराच मोठा मूलभूत फरकही आहे हे या निमित्ताने येथे लक्षात घेतले पाहिजे.
धर्म आणि समाजव्यवस्थेबरोबरच आर्थिक व्यवस्थेत भारतात एकेकाळी असणारी कृषी आधारित समाजव्यवस्था बदलणार आहे, नव्या जागतिक घडामोडींमुळे मोठे बदल त्यात होतील. यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण याचबरोबर भारतातील मुस्लीम लीगसारख्या अल्पसंख्याक असलेल्या धार्मिक समाजाच्या नेतृत्वाने धारण केलेले आक्रमक रूप, त्यांच्या अवास्तव असलेल्या आणि बहुसंख्य हिंदुनांच दडपणाऱ्या मागण्या आणि त्यापुढे मान तुकवणारे काँग्रेस आणि गांधीनिष्ठ नेतृत्त्व यामुळे होणारे नुकसान केवळ हिंदुंचे नसेल, ते राष्ट्राचे असेल, हे सावरकरांनी त्यावेळी जाणले तसे त्यांनी लक्षात घेऊन अनेक बाबतीत स्पष्टही केले. हे करताना मुसलमानांना त्यांचे नागरिक म्हणून असणारे योग्य अधिकार देय असतील हे ही त्यांनी स्पष्ट केले. नागरिक म्हणून समान पातळीवर विचार करण्याबरोबरच मुस्लिमांच्या अवाजवी मागण्यांना त्यांनी नेहमीच चपराक दिली. खरे म्हणजे साम्यवाद्यांनी खिलाफतीला भारतात जो पाठिंबा दर्शवला होता, तो साम्यवादी विचाराला धरून होता का, याचा विचार करायला हवा.
हिंदु हा शब्द उच्चारणे म्हणजे जातियता असा काही विचार गेल्या काही वर्षांमध्ये बोकाळला आहे, त्याला कारण सावरकर नक्कीच नाहीत. कारण आत आणि बाहेर असे त्यांनी काही ठेवलेले दिसत नाही. ते स्पष्टपणे बाजू मांडतात आणि हिंदु संघटनेबद्दल सांगताना ते राष्ट्राला महत्त्व देतात. त्यामुळे या संबंधातील त्यांची काही विधाने येथे पाहाणे आवश्यक आहे.
🔵🔵
🔶।। जे हिंदी देशभक्त एखाद्या वैश्विक राज्याची कोणती चळवळ चालू करण्याचे नि तिला मिळण्याचे सोडून त्याच्या आंतच थबकतात नि एखाया ' हिंदी' चळवळीलाच मिळून'हिंदु संघटना ' ची मात्र आकुंचित नि जातिनिष्ठ नि क्षेत्रनिष्ठ म्हणून टवाळी करण्याचें चालूच ठेवतात ते केवळ स्वतःचीच टवाळी करण्यांत नेमके यशस्वी ठरतात ! परंतु हिंदी देशाभिमानाच्या समर्थनार्थ जर असे सांगितले जात असेल किंवा सांगितले जात असतें की हिंदुस्थान देशांत वसति करून असलेले लोक हे एक पूर्वपीठिका, एक भाषा, एक संस्कृति, एक इतिहास इत्यादि बंधांनीं बांधलेले असल्यामुळे हिंदुस्थानाचाइरेलि दुसऱ्या कोणत्याहि लोकांपेक्षा एकमेकांना अधिक जवळचे वा आप्त आहेत आणि त्या करितांच दुसन्या अहिंदी राष्ट्रांच्या वर्चस्वापासून नि अतिक्रमणापासून आमच्या राष्ट्राचे रक्षण करणे आम्हां हिंदी लोकांना आमचे पहिले कर्तव्य वाटतें - तर तेच कारण हिंदु संघटनाच्या चळवळीच्या समर्थना करितांहि तंतोतंत लागू पडतेंच.
🔶।। जोपर्यंत ती चळवळ विशिष्ट राष्ट्राच्या वा लोकांच्या वा जातीच्या न्याय्य व मूलभूत अधिकारांचें दुसऱ्या लोकांच्या नि दुसऱ मानवी संघांच्या बलात्कारी नि उद्दाम अतिक्रमणापासून रक्षण करण्या करितांच झटत असते आणि दुसऱ्याच्या समान नि न्याय्य अधिकाराला नि स्वातंत्र्याला ढळ लावीत नाहीं, तोपर्यंत तें राष्ट्र किंवा ती जाति हा तादृश एक लहान संघ आहे एवढयाच निव्वळ कारणाकरितां ती निषेधितां वा तुच्छ लेखतां येत नाहीं. जेव्हां एखादें राष्ट्र वा जाति दुसन्या बंधुराष्ट्रांचे वा बंधु जातींचे अधिकार तुडविते आणि मानवजातीचे अधिक मोठाले गट नि संघ बनविण्याच्या मार्गौत उद्दाम आगळिकीने बाध आणते तेव्हांच त्यांचा राष्ट्र बाद किंवा जातिवाद मानवतेच्या दृष्टीनें धिक्कारार्ह ठरतो. राष्ट्रवाद किंवा जातिबाद समर्थनीय कोणता नि असमर्थनीय कोणता है ठरविण्याची हीच कसोटी आहे. हिंदु संघटनाची चळवळ राष्ट्रनिष्ठ वा जातिनिष्ठ वा क्षेत्रनिष्ठ तुमच्या इच्छेनुसार कशीहि म्हणा, ह्या खऱ्या कसोटीवर पारखली असतां ती हिंदी देशाभिमानाइतकीच समर्थनीय ठरते.
🔶।। आक्रमक नि संरक्षक संधींनी परस्परांशीं बांधल्या गेलेल्या अरबस्थानपासून अफगाणिस्थानापर्यंतच्या मुसुलमान राष्टांची सांखळी जोडून पॅन इस्लामच्या चळवळीच्या चालू असलेल्या हिंदूविरोधी • योजना आणि धार्मिक नि सांस्कृतिक द्वेषानें हिंदूंना चिरडण्याच्या वायव्य सीमेवरील टोेळ्यांच्या क्रूर प्रवृत्ति आम्ही हिंदु पुरेपूर ओळवून असल्यामुळें आम्ही इतःपर केव्हांहि तुमच्यावर विश्वास टाकून आणखी कोणते 'कोरे कागद ' तुम्हांला देणार नाहीं. इतर सर्व घटकांच्या 'स्वत्वा ' सवेंच आमचें स्वत्व 'हि ज्यांत सुरक्षित राहील तें स्वराज्य जिंकून घेण्याला आम्ही सन्निद्ध झालो आहोत.
🔶।। केवळ एक धनि जाऊन दुसरा धनि यावा म्हणून कांहीं इंग्लंडशी झुंज खेळण्याला आम्ही उद्युक्त झालेलों नाहीं, तर आमच्या स्वतःच्या घराचे आम्ही स्वतःच धनि झालों पाहिजे हाच आम्हां हिंदूंचा रोख आहे. आमच्या शरणागतीवर नि स्वतः हिंदुत्वाचेंच मोल देऊन जे मिळू शकणार असेल ते तसलें स्वराज्य आम्हां हिंदूना आमच्या आत्महत्येसारखेच आहे.
🔶।। यापुढें हिंदु-मुस्लीम-ऐक्यासंबंधीचे हिंदूचं सूत्र हेच राहणार की " - याल तर तुमच्यासहं, न याल तर तुमच्यावांचून, विरोधाल तर तुम्हांस विरोधून हिंदु-राष्ट्र आपलें भवितव्य बनेल तसे घडवील ! ”
🔵🔵
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुमहासभेच्या अधिवेशनांमध्ये अध्यक्षीय भाषणांमध्ये आपल्या या भूमिका स्पष्ट मांडल्या. मुस्लीम नेते, ब्रिटिश यांचे अंतर्गत संबंध आणि काँग्रेसने हिंदु-मुस्लीम ऐक्याच्यासाठी सातत्याने केलेली मुस्लीमांची मतझेलणी यामुळे मुस्लीम समाजाकडून उमटलेल्या विविध प्रक्रियांमुळेच सावरकरांना अशी भूमिका घेणे भाग पडलेले दिसते. अन्यथा मुस्लिमांनीही पोथिनिष्ठता सोडावी आणि विज्ञाननिष्ठ व्हावे तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकेल, असे सांगणाऱ्या सावरकरांवर अहिंदू असलेल्या मुस्लीमांना असेसांगण्याची वेळच आली नसती. तरीही त्यांनी मुस्लिमांशी ऐक्य करण्याचे सूत्र सांगताना मुस्लिमांना स्पष्ट बजावले होते.
हे सारे विचार मांडणाऱ्या सावरकरांनी भारतात असलेल्या राजकीय, आर्थिक आणि धार्मिक वातावरणाचा अचूक मागोवा घेतलेला होता. त्यामुळे राष्ट्र या संकल्पनेमध्ये सुस्पष्टता ठेवीत त्यांनी अर्थकारणही एका सूत्रात बांधले त्यासंबंधी कोलकाता येथील १९३९ मधील हिंदुमहासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात तपशीलवार माहिती दिली होती. त्यात ते म्हणाले होते....
🔶।। हिंदुस्थानांत असलेली विशिष्ट परिस्थिति आणि सामाजिक प्रगतीची आजची पायरी लक्षांत घेतां जवळच्या भविष्यकाळांत आपल्या आकांक्षाशीं जुळणारा जर कोणता अर्थशास्त्र विषयक सांप्रदाय असेल तर तो राष्ट्रीयत्ववादी अर्थशास्त्रज्ञांचा होय. आमच्या आर्थिक धोरणांचे मुख्य घटकावर एका सुलभ सूत्रांत मांडावयाचे तर त्याला '" वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय ' असें नांव द्यावेंसें मला वाटतें. हिंदूसंघटनी भूमिकेचा हा आर्थिक पैलू होय.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा