तत्वज्ञान सावरकरांचे - १०
हिंदुत्व, साम्यवाद, सावरकर आणि वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय
राष्ट्र या एका संकल्पनेला त्यांनी विशद केले होते आणि त्याच संकल्पनेतून, विचारातून त्यांनी ‘हिंदुत्व’ साकारले, राष्ट्र म्हणजे काय, हिंदुत्वाच्या त्यांच्या संकल्पनेत एकंदरचजगातील स्तरावरही तुलना करून त्यांनी राष्ट्राचा अर्थ साकारला त्यामध्ये जातीयतेपेक्षा वा एका धर्मनिरपेक्षतेच्या कथित पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या दाव्यापेक्षा व्यवहार्य, इतिहासाला जागून आणि विज्ञानवादी अद्ययावत समाजनिर्मितीचाच प्रयत्न त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी सांगितलेले आर्थिक धोरण आणि त्यासंबंधात केलेेली व्याख्या पाहाता ती साम्यवादी विचारसरणीला जणू भारतीय पार्श्वभूमीवर विचारात घेत समाजाकडून बुद्धिवादी होण्याची अपेक्षा व्यक्त करणारी ठरते. साम्यवादातील वर्गसंघर्षाचा अतिरेकही टाळत राष्ट्रधर्माला विविधांगी स्तरावर आकृष्ट करणारी त्यांची आर्थिक विचारांची सूत्रे होती.
भारतात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर उठसूठ आरोप करणे, त्यांच्यावर जातीयतेचे, धार्मिक चिथावणी देण्यासंबंधातील आरोप करणे, त्यांनी काहीच केलेले नाही, इतपर्यंत येऊन आरोप करणाऱ्यांची मजल जाते. ही त्या त्या आरोप करणाऱ्या लोकांच्यादृष्टीने अतिशय लाजीरवाणी बाब म्हमावी लागते. याचे कारम त्यांनी सावरकर वाचलेले नाहीत, त्यांना सावरकर समजलेले नाहीत, त्यांनी सावरकर समजून घेतलेले नाहीत. त्यांनी देशाचाही, तेथील वातावरण, सामाजिक धार्मिकता आदी स्थिती आणि सर्वसामान्यांची मानसिक, बौद्धिक, धार्मिक, शैक्षणिक आदी विविध घटकांच्या स्तरावरील क्षमता यांचाही अभ्यास सावरकरांवर आरोप करणाऱ्यांनी नीट केलेला नाही. किंवा त्यांचे हे आरोप हे त्यांच्या स्वार्थाशी निगडीत आहेत. डाव्या विचारसरणीच्या पक्ष, संघटना तसेच काँग्रेस आणि संलग्न पक्ष यांच्याकडून सावरकरांवर अभ्यासशून्य आरोप होत असतात. मुळात सावरकरांच्या संबंधात आजच्या काळातील चष्म्यामधूनही बघितले तरीही त्यांच्या काळातील स्थितीमध्ये त्यांनी मांडलेले विचार हे क्रांतिकारक होते, असेच दिसून येते. राष्ट्र या एका संकल्पनेला त्यांनी विशद केले होते आणि त्याच संकल्पनेतून, विचारातून त्यांनी ‘हिंदुत्व’ साकारले, राष्ट्र म्हणजे काय, हिंदुत्वाच्या त्यांच्या संकल्पनेत एकंदरच जगातील स्तरावरही तुलना करून त्यांनी राष्ट्राचा अर्थ साकारला त्यामध्ये जातीयतेपेक्षा वा एका धर्मनिरपेक्षतेच्या कथित पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या दाव्यापेक्षा व्यवहार्य, इतिहासाला जागून आणि विज्ञानवादी अद्ययावत समाजनिर्मितीचाच प्रयत्न त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी सांगितलेले आर्थिक धोरण आणि त्यासंबंधात केलेेली व्याख्या पाहाता ती साम्यवादी विचारसरणीला जणू भारतीय पार्श्वभूमीवर विचारात घेत समाजाकडून बुद्धिवादी होण्याची अपेक्षा व्यक्त करणारी ठरते. साम्यवादातील वर्गसंघर्षाचा अतिरेकही टाळत राष्ट्रधर्माला विविधांगी स्तरावर आकृष्ट करणारी त्यांची आर्थिक विचारांची सूत्रे होती.
जागतिक स्तरावर साम्यवादी विचारांचा प्रसार होत होता, मार्क्ससारख्या अर्थशास्त्रीय विचारवंताने मांडलेली रचना ही भारताच्या संरचनेत जिग्सॉ पझलमध्ये जसे त्या त्या खाचेत तुकडे बसवले जातात, तसेच ही रचना चपखलपणे नाही तर सक्तीने बसवण्याचा प्रयत्न जो साम्यवादी विचाराने केला. त्यामुळेच साम्यवादी विचारांचा पगडा केवळ नामधारी स्वरूपात भारतात बसला. तरुणपणामध्ये वाटणारे त्या विषयीचे आकर्षण अनेकदा पुढे टिकत नाही, असा तरुणपणातील आक्रमक पद्धतीचा वाटणारा हा विचार सावरकरांनी मात्र भारतीय परिस्थितीला साजेल अशा प्रकाराच्या विचारसरणीने मांडला. मात्र देशातील धार्मिकतेच्या पगड्यामुळे तसेच विविध स्तरावर असलेल्या जातिभेदासारख्या अति कर्मठ आणि जीर्ण झालेल्या तणावामुळे आजही तो दूर होऊ शकलेला नाही. सावरकरांच्या एकांगी प्रयत्नामुळे मात्र त्यांनी या विचाराला भारताच्या वा हिंदुस्थानच्या जिग्सॉ पझलमधील विविध मोकळ्या जागांना भरण्यासाठी विचारधारणा निर्माण केली ती आजही पुनर्जिवित करण्याची गरज आहे. कारण ती स्थायी नाही, चिरंतन नाही, तर कालाप्रमाणे बदला असे सांगणारी आणि भविष्याला सामोरे जाणारी ‘अद्ययावत’ राहाणारी त्यांची विचारधारा वाटते. हिंदुमहासभेच्या कोलकाता येथे १९३९ मध्ये झालेल्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात त्यांनी 'वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय ' या नावाने मांडलेली सूत्रबद्ध अशी रचना बारकाईने लक्षात घेण्यासारखी आहे. त्यातून त्यांची नेमकी विचारकृतीही कशी अपेक्षित असेल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामधील मुख्य मुद्दे त्यामुळेच वाचण्यासारखे आहेत. साम्यवादी विचारांचा अभ्यास करताना मांडले जाणआरे मुद्दे, त्यामागील समाजासंबंधातील विचार आणि मूल्ये यांचा मार्ग हा अनेकदा सावरकरी विचारांशी साधर्म्य साधणारा वाटतो. साम्यवादी विचारांमधील अनेक विचारवंतांची मते, रचना, मांडणी या बरोबरच सावरकरांची विचारसरणी यामधील साम्य पाहाता मूळ उद्देशासाठी समाज, राष्ट्र आणि त्या मागचा माणूस, कामगार, शेतकरी हे घटक सावरकरांनीही विचारात घेतले आणि प्रभावीपणे त्यांच्यासंबंधात सूत्र मांडले आहे. या अधिवेशनातील त्यांची काही महत्त्वाची सूत्रे आजही लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यातील बारकावे शोधल्यावर त्यांचे महत्त्व लक्षात येईल.
🔵🔵
🔶।। सर्वांच्या आर्थिक हितसंबंधाच्या ऐक्यावर भर देऊन आणि निदान हिंदुस्थानांतले सर्व लोक तरी एका आर्थिक भूमिकेवर एकत्रित केल्याने सर्व धार्मिक, वंशविषयक, राष्ट्रीय आणि संस्कृतिक वैरभाव चुटकीसरशीं नाहींह ोतील असल्या मृगजलाच्या आशांच्या नादीं न लागता आणि मानवी आर्थिक फळी उत्पन्न करण्याचें पुस्तकी शास्त्रीय उपाय सोडून देऊन हिंदुसंघटनी लोकांनीं व्यावहारिक राजकारणी धोरणानें केवळ हिंदुराष्ट्राच्या आर्थिक उन्नती पुरताच आपला तात्कालिक आर्थिक कार्यक्रम मर्यादित ठेवावा. हिंदुस्थानांत असलेली विशिष्ट परिस्थिति आणि सामाजिक प्रगतीची आजची पायरी लक्षांत घेतां जवळच्या भविष्यकाळांत आपल्या आकांक्षाशीं जुळणारा जर कोणता अर्थशास्त्र विषयक सांप्रदाय असेल तर तो राष्ट्रीयत्ववादी अर्थशास्त्रज्ञांचा होय.
🔶।। आमच्या आर्थिक धोरणांचे मुख्य घटकावर एका सुलभ सूत्रांत मांडावयाचे तर त्याला ' वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय ' असें नांव द्यावेंसें मला वाटतें. हिंदूसँघटनी भूमिकेचा हा आर्थिक पैलू होय. आमचे आर्थिक धोरण वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय
🔶।। प्रथम आम्ही यंत्राचें स्वागतच करतों कारण हैं यंत्रयुग आहे. इस्तव्यवसायांना देखील एक स्थान आहे आणि ते उत्तेजनाही आहे. परंतु राष्ट्रीय उत्पादन है शक्य तितक्या अधिकतम विस्तृत यांत्रिक प्रमाणा बरच चालेल.
🔶।। शेतकरी आणि कामकरी वर्ग हाच राष्ट्रीय संपन्नतेचा, शक्तीचा आणि आरोग्याचा मुख्य पाया आहे. कारण देशाला आरोग्य आणि संपत्ति पुरवणाऱ्या याच दोन वर्गावर बलिष्ठ सैन्याच्या भरतीची केंद्रे मुख्यत: अवलंबून असतात. म्हणून त्या वर्गीच्या शक्तीचे आणि त्यांचीं निवासस्थान म्हणून खेडेगवांचें पुनरुज्जीवन होणें अवश्य आहे. केवळ जीवनाला नितांत आवश्यक वस्तू त्यांना मिळाव्यांत इतकेच नव्हे तर सर्वसामान्य सुखसोयीं वा लाभ त्यांना व्हावा आणि तो लाभ करून घेण्यास त्यांना समर्थ करण्याइतका राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपास त्यांचा विभाग त्यांना मिळवतां येईल अशी व्यवस्था झाली पाहिजे. तरीहि हें लक्षांत ठेवलें पाहिजे की, सर्वसामान्यपणे राष्ट्राचेंच ते अवयव आहेत आणि अर्थात त्यांनी आपल्या कर्तव्याचा नि उत्तरदायित्वाचा वांटा उचलला पाहिजे. पाहिजे. म्हणून राष्ट्रीय उद्योगधंदे, उत्पादन नि संपत्ति यांची सुरक्षितता आणि सर्वसमाजाची प्रगति यांच्याशी सुसंगत होईल अशा रीतीनेंच त्यांना त्यांचा अंशभाग मिळेल.
🔶।। राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादन त्यांच्यासाठी राष्ट्रीय भांडवल असणे अपरिहार्य असल्याने आणि ते भांडवल सद्य परिस्थितींत मुख्यतः वैयक्तिक असल्यानें त्यालाहि आजच्या परिस्थितींत उत्तेजन आणि पुरस्कार योग्यप्रकारें देण्यांत येईल.
🔶।। भांडवल आणि श्रम या दोहोंचें हितसंबंध सर्व राष्ट्राच्या सामान्य आवश्यकतेला पूरक म्हणूनच मानण्यांत येतील.
🔶।। एखादा उद्योग जर भरभराटीत असेल तर त्याच्या लाभांतून मोठा विभाग श्रमिकांना मिळेल. परंतु उलट जर तो उद्योग आर्थिक दृष्ट्या हानिकारक होईल तर केवळ भांडवलवाल्यालाच नव्हे तर कांहीं अंशी काम कऱणाऱ्यालाही अल्पलांभावर संतुष्ट राहावें लागेल हेतु हा की, भांडवलवाले नि कामकरी यांच्या स्वार्थी वर्ग हिताच्या अवास्तव धोरणानें राष्ट्रीय उद्योगांची सर्वस्वी वाताहात होऊं नये.
🔶।। सारांश, भांडवल नि श्रम यांच्या आकांक्षांचा वेळोवेळीं समन्वय करून सर्व राष्ट्रांचे उद्योग आणि उत्पादन यांचे संवर्धन व्हावे आणि राष्ट स्वयंपूर्ण व्हावे असा प्रयत्न करण्यांत येईल.
🔶।। व्यक्तिगत प्रयत्नांपेक्षां जे उद्योग अधिक कार्यक्षमतेनें चालवतां येतील आणि जे उद्योग राष्ट्रीय राजसत्ता स्वतः चालवूं शकेल असे मुख्य मुख्य उद्योगधंदे यांचे सर्वस्वीं राष्ट्रीकरण करण्यांत येईल. तेंच तत्त्व शेतीलाहि लागू पडेल. कूळ किंवा शेतकरी आणि शेतांचे धनी यांच्या स्वार्थी वर्गविषयक हितसंबंधांचे द्वंद्व माजूं न देतां शेताचें घनी आणि शेतकरी यांच्या हितसंबंबंधांचा अशा रीतीनें समन्वय करण्यांत येईल की, एकंदर राष्ट्रीय शेतीच्या उत्पन्नाचे संवर्धन व्हावें.
🔶।। मोठ्या यंत्रांच्या सहाय्यानें, मोठ्या प्रमाणांवर आणि शास्त्रीय पद्धतीनें राज्याकडूनहि शेती विकत घेऊन कांहीं अंशीं चालवण्यांत येईल. यांत हेतू हा राहील की, याचा उपयोग शेतकऱ्यांना शेर्ताचे शिक्षण देण्यांकडे व्हावा.
🔶।। राष्ट्राची आर्थिक शक्ति ज्यायोगें क्षीण होईल आणि सामान्यतः राष्ट्रीय उद्योग नि उत्पादन यांची हानि होणे अपरिहार्य होईल; अशा रीतीनें किंवा तशाच उद्देशानं जे संप किंवा टाळेबंद होतील त्यांचा निकाल राष्ट्रीय पंचायतीमार्फत करण्यांत येईल आणि गंभीर परिस्थिति उत्पन्न झाल्यास निग्रहानें त्यास प्रतिबंधहि करण्यांत येईल.
🔶।। व्यक्तिगत मिळकत ही सामान्यतः सुरक्षित मानण्यांत येईल.
🔶।। कोणत्याहि परिस्थितींत योग्यमूल्य दिल्यावांचून राजसत्ता अशा व्यक्तिगत मिळकतीचा अपहार करणार नाहीं विरोधी परकीय उद्योगधंद्यांपासून राष्ट्रीय उद्योगाच्या संरक्षणाचे कामी राज्याकडून सर्वप्रकार प्रयत्न होईल. या वर दिलेल्या गोष्टी उदाहरणादाखल जातांजातां दिल्या आहेत.
🔶।। राष्ट्राच्या आर्थिक शक्तीचे संवर्धन व्हावें आणि तें आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावें या दोन मुख्य सूत्रांवर वरील सर्व घोरण आधारलेलें आहे.
🔵🔵
१९३९ मध्ये मांडलेल्या सावकरांच्या या आर्थिक विचारांवरून त्यांचे सुस्पष्ट राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्रविषयक धोरणांचा दृष्टिकोन परखड आणि कणखर होता असेच दिसून येते. साम्यवादातील विविध विचारांना त्यांनी वर्गसंघर्षाच्या पार्श्वभूमीऐवजी वर्गहिताच्या राष्ट्रीय समन्वयाच्या विचारातून पाहिले, हेच आजही तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन पिढी कदाचित या विचारांना अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकेल, असाही विश्वास खरे म्हणजे प्रत्येक भारतीयाने करावयास हवा.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा