तत्वज्ञान सावरकरांचे - १४
सावरकर ... हिंदु बीजतत्त्वाचा प्रणेता
सावरकरी तत्त्वाला बाजूला सारत सर्व समाजाला समानतेच्या वागणुकीने प्रेरित करू पाहाणाऱ्या या सावरकरांच्या समाजक्रांतिला, धर्मक्रांतिला, राष्ट्रक्रांतिला समजून घेण्याची मानसिक सक्षमताच भारतातील समाजाने गमावली. ती का गमावली, याचा खरे म्हणजे प्रत्येक भारतीयाने तटस्थपणे विचार करायला हवा. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टीका करणाऱ्यांना, आरोप करणाऱ्यांना कधी तसा प्रकार हा देशाचा, भूमीचा, राज्याचा, माणुसकीचा वा राष्ट्रीयतेचा अवमान वाटला नाही, यासारखे करंटेपण या देशाला दुसरे कुठले ?सावरकरांवरील बेताल आरोपाना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी खरे म्हणजे सावरकरांसारख्या ज्वालामुखीसारख्या नेतृत्वाची आजही गरज वाटते ती यामुळेच. कारण आजही तसे नेतृत्व काही अंशाने तरी आहे, असे वाटत नाही.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव एका व्यक्तीचे, हिंदु संघटकाचे, पक्षप्रमुखाचे, क्रांतिकारकाचे वा समाजसुधारकाचे नाही. सावरकर हा विचार आहे, बीजतत्त्व देणारा मार्गदर्शक आहे, अद्ययावत बनू पाहाणारे आणि नव्या पिढीलाही वैचारिकदृष्टीने पुढे नेण्यासाठी ताित्त्वक विचार करायला लावणारे तत्त्वज्ञान आहे. विशेष म्हणजे ते तत्त्व पोथिनिष्ठ नाही तर प्रवाही आणि मानवी संवेदनांना, समजून घेत समाजाला कालाभिमुख करणारे, यंत्रादी आधुनिक शोध-संशोधी वृत्तीला सामावून घेणारे हे तत्त्व आजच्या समाजालाही समजून घेणे गरजेचे आहे. याचे कारण समाजाला, त्यातील प्रत्येक मानवाला साक्षरतेनंतर, समज आल्यानंतर प्रगल्भ करू पाहाणारे सावरकर हे भारतीय संस्कृतीला हिंदुभूमीचे नैतिक, व्यावहारिक, तात्विक, मानवी आणि राष्ट्रीयच नव्हे तर वैश्विक अधिष्ठान प्राप्त करू देणारे विज्ञाननिष्ठ, संवादी आणि नैसर्गिक समानतेकडे माणसाला नेणारे सावरकर तत्त्व हे अद्ययावत राहाणारे आहे. ते लक्षात घेतले तर केवळ भारताचेच नव्हे, हिंदुंचेच नव्हे तर अखिल मानवजातीला स्वीकार्य ठरू शकेल इतके व्यापक आहे. फक्त त्यासाठी सारासार विचार तारतम्य भाव बाळगावा लागेल. राजकारणाचा स्वार्थी सत्तालोलूप अविष्कार बाजूला ठेवावा लागेल.
भारत भूमीला अनेक वर्षांपासून अनेक परकीय आक्रमकांना सामोरे जावे लागले. त्यात येथील समाजाकडून पाळला जाणारा धर्म हा ज्या पद्धतीने अनुकरणीय झाला त्याच अनुकरणीयतेमुळे तो स्वघातकी पद्धतीनेही स्वीकारला गेला. अशा या धर्मातील चांगले काही नीरक्षीर विवेकबुद्धीने स्वीकारणे गरजेचे होते. ते कसे ते सांगण्याचे काम आधुनिक काळातील सावरकर तत्त्वाने केले. त्या तत्त्वाने भारतातील हिंदुंना हिंदुभूमीचे स्वरूपाही सांगितले, तसे पाहायला गेले तर नवकालानुसार सावरकरांनी हिंदुभूमीला हिंदुत्वाच्या व्याख्येत मर्यादित केले असले तरी त्यात हिंदुहिताचाच भाग होता. मात्र हिंदुभूमीला मर्यादित करताना त्यांनी
आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।
ही व्याख्या करून आहे त्या भारतभूमीला संरक्षित करण्यासाठी नव्हे तर हिंदुंना आपल्या भूमीला आपली मानून तिचे राष्ट्र म्हणून संवर्धन करण्याची दिशाच स्पष्ट केली. इतकेच नव्हे तर हे एकप्रकारे आक्रमक असणाऱ्या आणि भारतातील अनेकानेक मूळ भूधर्म धारण करणाऱ्या हिंदुंना बाटवून मुस्लीम करणाऱ्या आक्रमकांमुळे झालेल्या परिणामांनाही स्पष्ट करीत एकप्रकारे आव्हान आणि आवाहन केले होते. शुद्धीकरण हा त्यातीलच एक एका हिंदुने याच भूमीतील हिंदुंना दिलेली साद होती. पण दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी मुस्लीम आणि ख्रिश्चन बनलेल्या मूळच्या हिंदुंनाही त्याचे महत्त्व समजले नाही की आजही हिंदु हा भूधर्म स्वीकारणाऱ्यांनाही ते कळले नाही. पुरोगामीपणाच्या कथित मानवतावादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरणाऱ्यांनाच या भूमीचा राष्ट्रधर्म समजला नाही. यामुळे सावरकरी तत्त्वाला बाजूला सारत सर्व समाजाला समानतेच्या वागणुकीने प्रेरित करू पाहाणाऱ्या या सावरकरांच्या समाजक्रांतिला, धर्मक्रांतिला, राष्ट्रक्रांतिला समजून घेण्याची मानसिक सक्षमताच भारतातील समाजाने गमावली. ती का गमावली, याचा खरे म्हणजे प्रत्येक भारतीयाने तटस्थपणे विचार करायला हवा. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टीका करणाऱ्यांना, आरोप करणाऱ्यांना कधी तसा प्रकार हा देशाचा, भूमीचा, राज्याचा, माणुसकीचा वा राष्ट्रीयतेचा अवमान वाटला नाही, यासारखे करंटेपण या देशाला दुसरे कुठले ?सावरकरांवरील बेताल आरोपाना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी खरे म्हणजे सावरकरांसारख्या ज्वालामुखीसारख्या नेतृत्वाची आजही गरज वाटते ती यामुळेच. कारण आजही तसे नेतृत्व काही अंशाने तरी आहे, असे वाटत नाही.
या आधी सावरकरांच्या आर्थिक विचारांवर आधारित असलेले त्यांचे 'वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय' साधणारे सावरकर... हे तत्त्व सांगण्यामागे हाच उद्देश होता. साम्यवादी विचारांपेक्षाही राष्ट्रनिष्ठतेवर आधारित असे हे सावरकरी तत्वाचे सत्त्व भारतीय नागरिक आणि हिंदुनाही कळू नये, यासारखे बुद्धिशून्य आणि विवेकहीन अस्तित्त्व गेल्या ८० वर्षांमध्ये या हिंदुस्थानने जोपासले आहे, त्यामुळेच आजही वर्गहितांचा समन्वय नीट राहिला नसल्याने विषमतेचा प्रश्न - समस्या ही मानसिक, शारिरीक, आर्थिक, बौद्धिक, राजकीय स्तरावर पूर्णपणे पकड ठेवून आहे. विषमतेमुळे समाजव्यवस्था कोलमडलेली आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये परिस्थिती याहूनही वेगळी नाही. त्यामुळेच जोपर्यंत ही पकड वा विळखा सोडवला जात नाही तोपर्यंत या देशाच्या सीमांमध्ये असणारे राष्ट्र म्हणजे नेमके काय आहे, राष्ट्र या संज्ञेची व्याख्या नेमकी काय आहे, काय करावी लागणार आहे आणि त्यादृष्टीने प्रत्येक राजकीय नेत्याने काही चिंतन तरी कधी केले आहे का, तो ते करणार आहे का, असे अनेक चिंताजनक प्रश्न कायमच राहाणार आहेत. धर्म, पंथ, आर्थिक, भाषिक, प्रादेशिक या गटातटांवर, भेदांवर असणारी या भूमिनिष्ठ नसणाऱ्यांची पकड जोपर्यंत हिंदुभूमीनिष्ठ स्वरूपात जागृत होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीच्या गटातटांचा परिणाम सकारात्मक सत्ताधारणेवर होणार नाही. तो व्हावा यासाठी सध्याचा कोणताही पक्ष परिपूर्ण नाही, ते पक्ष केवळ सत्तालोलुप राजकारणाने बरबटलेले आहेत. इतकेच नव्हे तर संस्था - संघटना यांच्यातीलही सत्तालोलुपता वाढल्याने सावरकरी तत्त्वाचा अंशात्मक स्पर्शही येथे होऊ शकलेला नाही.
सावरकरांचे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, परराष्ट्रविषयक मतांना, विचारांना असणारा वैचारिक आधार समजून घेण्यासाठी प्रामाणिक वर्तनाची आवश्यकता आहे. मुळात देशाचे स्वातंत्र्य या बरोबरच देशाचे अस्तित्त्व, त्याची संकल्पना, देशातील जनता, तिचे अस्तित्त्व यासाठी सावरकरांनी जो विचार मांडला तो तार्किक होताच पण त्याबरोबरच हिंदुत्वनिष्ठ असूनही सर्वधर्मांना, सर्व प्रांताना एकाच तराजूने तोलणाऱ्या नागरी विचारांचा होता. नागरीकरणामुळे होणारे परिणाम त्यांनी पाहिले, अंदाजित केले आणि त्यामुळेच नागरी आणि कृषी आधारित असलेल्या या देशामध्ये विचारांना वाव देताना त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यही तितक्याच प्रगल्भपणे स्वीकारले. किंबहुना त्यांची ही वृत्ती वा प्रगल्भता तत्कालिन हिंदुंमध्ये, सर्व अल्पसंख्याकांमध्ये आली असती तर भारतीय स्वातंत्र्याला अद्ययावत, विकसित राष्ट्र होण्यामध्ये इतका काळही लागला नसता. पण हे युगांतर होण्यासाठी सावरकरांसारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाला समंजस, विज्ञानवादी वृत्तीचे, समाजातील भेदाभेदशून्यता स्वीकारणारे आणि धर्माच्या पोथिवादालाही योग्य अंतरावर ठेवणारे नागरिक- भारतीय आणि हिंदुही मिळाले नाहीत. ऐहिकतेतून व्यावहारिक विकासाने मूठभरांचा बौद्धिक विकास झाला तरी संपूर्ण भारतीय समाजाला मात्र सावरकरांचे तत्त्वज्ञान समजू शकले नाही, पचविताही आले नाही, हाच यातून मिळणारा एक धडा आहे. सावरकर तत्त्व संबंधात उद्याचे म्हणजे भविष्यातील काय, ते ठरवणे मात्र आता सावरकरांना समजून घेण्यासाठी त्यांच्या मूलभूत, पायाभूत अशा क्रांतिकारक बीजतत्त्वाचा अभ्यास वैचारिक स्तरावर व्हायला हवा तर, प्रगल्भ राष्ट्रनिष्ठ हिंदुना विज्ञानवादी युगात ताठ मानेने वावरता येऊ शकेल.... तूर्तास इतकेच!
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा