शुक्रवार, ३० जून, २०२३

   तत्वज्ञान सावरकरांचे - ११

सावरकरांची भूमिका राष्ट्रनिष्ठ मानवहितकारी बुद्धिवाद्याचीच

रत्नागिरीमधील त्यांचे वास्तव्य आणि तेथील कार्य हे सामाजिकस्तरावरील, राष्ट्रसुधारणेच्या स्तरावरील आणि भविष्यात देश कसा असावा, यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या दीपस्तंभासारखे होते. त्यांनी प्रत्यक्ष त्याचे प्रयोग करून तेथे दाखवले होते. त्यामुळेच ते प्रयोग, त्यांचे ते मार्गदर्शन तेथेच थांबणे, इतकेच नव्हे तर ते स्वातंत्र्यानंतरही तेथे पूर्णविरामाने थांबणे गरजेचे नव्हते. ती त्यांची अव्याहत चालणारी बुद्धिवादी पायवाटेची सुरुवात होती. त्यानंतरही   ती काळाप्रमाणे अद्ययावत होणे वा ठेवणे हे पुढच्या पिढीचे काम हवे होते. कारण त्यांचे हिंदुत्त्व हे अद्ययावत असे होते. ते पोथिनिष्ठ नव्हते आणि नाही, असे त्यांचे ते पोथिनिष्ठ न राहिलेले तत्त्वज्ञान स्वीकारण्यासाठी बुद्धिवादी आणि काळाबरोबर चालणाऱ्यांचीच गरज अधिक आहे. आपण तसे आहोत का, याचा विचार खरे म्हणजे सावरकरांवर टीका करणाऱ्याप्रमाणेच सावरकरांचा अनुनय करीत आहोत, असे सांगणाऱ्यांनीही वेळोवेळी करायला हवा.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारणे हे सोपे नाही, कारण त्यांच्या क्रांतिकारक अशा बुद्धिवादातून ते तत्त्वज्ञान तयार झाले आहे. त्यावेळचे सोडा आजही त्यांच्या बुद्धिवादाला स्वीकारून तसे कृतीत आणणे सोपे नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जाण्यासाठी त्यांनी त्या त्या सामाजिक स्तरावर जाऊन तसे कार्य प्रत्यक्ष केले आहे. त्यांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे होते, त्याचा अवलंब देशाने करायला हवा होता. पण तो झाला नाही. या आधीच्या लेखांमध्ये सावरकर हे नास्तिक होते आणि आस्तिकही होते असे म्हटले होते. त्याप्रमाणेच त्यांनी स्वीकारलेली बौद्धिक कार्यान्वयनाची प्रक्रिया रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधील वास्तव्यात त्यांनी कृतीत आणून दाखवलेली होती. त्यावर अलीकडच्या तथाकथित डाव्या विचारसरणीला अर्धवटपणे जोपासणाऱ्यांनी टीकाही केलेली आढळून आली पण त्यांच्या टीकेकडे फार लक्ष द्यावे असे वाटत नाही, कारण अलीकडच्या अशा अनेकांना मुळात बुद्धिवादाचा मार्गच गवसलेला नाही, तेथे अधिक न बोलणे चांगले.
रत्नागिरीमधील त्यांचे वास्तव्य आणि तेथील कार्य हे सामाजिकस्तरावरील, राष्ट्रसुधारणेच्या स्तरावरील आणि भविष्यात देश कसा असावा, यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या दीपस्तंभासारखे होते. त्यांनी प्रत्यक्ष त्याचे प्रयोग करून तेथे दाखवले होते. त्यामुळेच ते प्रयोग, त्यांचे ते मार्गदर्शन तेथेच थांबणे, इतकेच नव्हे तर ते स्वातंत्र्यानंतरही तेथे पूर्णविरामाने थांबणे गरजेचे नव्हते. ती त्यांची अव्याहत चालणारी बुद्धिवादी पायवाटेची सुरुवात होती. त्यानंतरही   ती काळाप्रमाणे अद्ययावत होणे वा ठेवणे हे पुढच्या पिढीचे काम हवे होते. कारण त्यांचे हिंदुत्त्व हे अद्ययावत असे होते. ते पोथिनिष्ठ नव्हते आणि नाही, असे त्यांचे ते पोथिनिष्ठ न राहिलेले तत्त्वज्ञान स्वीकारण्यासाठी बुद्धिवादी आणि काळाबरोबर चालणाऱ्यांचीच गरज अधिक आहे. आपण तसे आहोत का, याचा विचार खरे म्हणजे सावरकरांवर टीका करणाऱ्याप्रमाणेच सावरकरांचा अनुनय करीत आहोत, असे सांगणाऱ्यांनीही वेळोवेळी करायला हवा. अद्ययावत राहा, वा राहाणे हेच सावरकरांचे मानवाला असणारे सांगणे होते.  त्यात कर्मकांडापेक्षा राष्ट्र, भूमिनिष्ठ धर्म, इतिहासातील चुकांना नव्हे तर घोडचुकांना पुन्हा होऊ नयेत म्हणून टाळा असे सांगणारे तंत्र आणि धर्मातील पोथिनिष्ठता संपवा असे संागत समाजाला अद्ययावत करणारे प्रतिपादन असणारे सावरकरांचे हिंदुत्त्व होते. ते संन्यासी, गोसावी, कर्मकांड करणारे भिक्षुकादींकाचे नव्हते तर विद्वत्तेवर आणि बुद्धिवादावर भर देणारे होते.
सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल, त्यांच्या सामाजिक-राजकीय आणि राष्ट्रीय विचारसरणीबद्दल तसेच साम्यवाद आणि वर्गहितांचा समन्वय साधण्याच्या, राष्ट्रहित आणि मानवहित पाहाण्याच्या दृष्टीबद्दल अधिक चर्चा होणे गरजेचे आहे. सावरकरांकडे गेल्या काही काळामध्ये केवळ राजकीय दृष्टीने, राजकीय स्वार्थाने पाहिले गेले त्याऐवजी त्यांच्याकडे त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, सतत बदलण्याची अद्ययावत राहाण्याची त्यांची नजर आणि धर्माबद्दलचे, धर्मांबद्दलचे अचूक निदान लक्षात घेण्याची मीमांसा करणे अधिक संयुक्तिक वाटते. यासाठी सावरकरांच्या या दृष्टीबद्दल अधिक बारकाईने पाहावे लागेल. या विविध मुद्द्यांमध्ये असणारा दृष्टिकोन आणि त्यामागची कारणे ही शोधताना विविध घटनांशी, परिस्थितीशी आणि भविष्याशीही परस्परसंबंधही कसा होता याचा उहापोह होणे गरजेचे आहे. ते समजून घेतले की, सावरकरांची भूमिका ही केवळ राजकारण्याची, दिशादर्शकाची, हिंदुसंघटकाची, क्रांतिकारक समाजसुधारकाची, तत्त्वज्ञाची नव्हती तर ती व्यापक अशा राष्ट्रनिष्ठ मानवहितकारी बुद्धिवाद्याचीच होती, असे दिसून येईल.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

 


गुरुवार, २९ जून, २०२३

तत्वज्ञान सावरकरांचे - १०

हिंदुत्व, साम्यवाद, सावरकर आणि वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय

राष्ट्र या एका संकल्पनेला त्यांनी विशद केले होते आणि त्याच संकल्पनेतून, विचारातून त्यांनी ‘हिंदुत्व’ साकारले, राष्ट्र म्हणजे काय, हिंदुत्वाच्या त्यांच्या संकल्पनेत एकंदरच

जगातील स्तरावरही तुलना करून त्यांनी राष्ट्राचा अर्थ साकारला त्यामध्ये जातीयतेपेक्षा वा एका धर्मनिरपेक्षतेच्या कथित पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या दाव्यापेक्षा व्यवहार्य, इतिहासाला जागून आणि विज्ञानवादी अद्ययावत समाजनिर्मितीचाच प्रयत्न त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी सांगितलेले आर्थिक धोरण आणि त्यासंबंधात केलेेली व्याख्या पाहाता ती साम्यवादी विचारसरणीला जणू भारतीय पार्श्वभूमीवर विचारात घेत समाजाकडून बुद्धिवादी होण्याची अपेक्षा व्यक्त करणारी ठरते. साम्यवादातील वर्गसंघर्षाचा अतिरेकही टाळत राष्ट्रधर्माला विविधांगी स्तरावर आकृष्ट करणारी त्यांची आर्थिक विचारांची सूत्रे होती.

भारतात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर उठसूठ आरोप करणे, त्यांच्यावर जातीयतेचे, धार्मिक चिथावणी देण्यासंबंधातील आरोप करणे, त्यांनी काहीच केलेले नाही, इतपर्यंत येऊन आरोप करणाऱ्यांची मजल जाते. ही त्या त्या आरोप करणाऱ्या लोकांच्यादृष्टीने अतिशय लाजीरवाणी बाब म्हमावी लागते. याचे कारम त्यांनी सावरकर वाचलेले नाहीत, त्यांना सावरकर समजलेले नाहीत, त्यांनी सावरकर समजून घेतलेले नाहीत. त्यांनी देशाचाही, तेथील वातावरण, सामाजिक धार्मिकता आदी स्थिती आणि सर्वसामान्यांची मानसिक, बौद्धिक, धार्मिक, शैक्षणिक आदी विविध घटकांच्या स्तरावरील  क्षमता यांचाही अभ्यास सावरकरांवर आरोप करणाऱ्यांनी नीट केलेला नाही. किंवा त्यांचे हे आरोप हे त्यांच्या स्वार्थाशी निगडीत आहेत. डाव्या विचारसरणीच्या पक्ष, संघटना तसेच काँग्रेस आणि संलग्न पक्ष यांच्याकडून सावरकरांवर अभ्यासशून्य आरोप होत असतात. मुळात सावरकरांच्या संबंधात आजच्या काळातील चष्म्यामधूनही बघितले तरीही त्यांच्या काळातील स्थितीमध्ये त्यांनी मांडलेले विचार हे क्रांतिकारक होते, असेच दिसून येते. राष्ट्र या एका संकल्पनेला त्यांनी विशद केले होते आणि त्याच संकल्पनेतून, विचारातून त्यांनी ‘हिंदुत्व’ साकारले, राष्ट्र म्हणजे काय, हिंदुत्वाच्या त्यांच्या संकल्पनेत एकंदरच जगातील स्तरावरही तुलना करून त्यांनी राष्ट्राचा अर्थ साकारला त्यामध्ये जातीयतेपेक्षा वा एका धर्मनिरपेक्षतेच्या कथित पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या दाव्यापेक्षा व्यवहार्य, इतिहासाला जागून आणि विज्ञानवादी अद्ययावत समाजनिर्मितीचाच प्रयत्न त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी सांगितलेले आर्थिक धोरण आणि त्यासंबंधात केलेेली व्याख्या पाहाता ती साम्यवादी विचारसरणीला जणू भारतीय पार्श्वभूमीवर विचारात घेत समाजाकडून बुद्धिवादी होण्याची अपेक्षा व्यक्त करणारी ठरते. साम्यवादातील वर्गसंघर्षाचा अतिरेकही टाळत राष्ट्रधर्माला विविधांगी स्तरावर आकृष्ट करणारी त्यांची आर्थिक विचारांची सूत्रे होती.
जागतिक स्तरावर साम्यवादी विचारांचा प्रसार होत होता, मार्क्ससारख्या अर्थशास्त्रीय विचारवंताने मांडलेली रचना ही भारताच्या संरचनेत जिग्सॉ पझलमध्ये जसे त्या त्या खाचेत तुकडे बसवले जातात, तसेच ही रचना चपखलपणे नाही तर सक्तीने बसवण्याचा प्रयत्न जो साम्यवादी विचाराने केला. त्यामुळेच साम्यवादी विचारांचा पगडा केवळ नामधारी स्वरूपात भारतात बसला. तरुणपणामध्ये वाटणारे त्या विषयीचे आकर्षण अनेकदा पुढे टिकत नाही, असा तरुणपणातील आक्रमक पद्धतीचा वाटणारा हा विचार सावरकरांनी मात्र भारतीय परिस्थितीला साजेल अशा प्रकाराच्या विचारसरणीने मांडला. मात्र देशातील धार्मिकतेच्या पगड्यामुळे तसेच विविध स्तरावर असलेल्या जातिभेदासारख्या अति कर्मठ आणि जीर्ण झालेल्या तणावामुळे आजही तो दूर होऊ शकलेला नाही. सावरकरांच्या एकांगी प्रयत्नामुळे मात्र त्यांनी या विचाराला भारताच्या वा हिंदुस्थानच्या जिग्सॉ पझलमधील विविध मोकळ्या जागांना भरण्यासाठी विचारधारणा निर्माण केली ती आजही पुनर्जिवित करण्याची गरज आहे. कारण ती स्थायी नाही, चिरंतन नाही, तर कालाप्रमाणे बदला असे सांगणारी आणि भविष्याला सामोरे जाणारी ‘अद्ययावत’ राहाणारी त्यांची विचारधारा वाटते. हिंदुमहासभेच्या कोलकाता येथे १९३९ मध्ये झालेल्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात त्यांनी  'वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय ' या नावाने मांडलेली सूत्रबद्ध अशी रचना बारकाईने लक्षात घेण्यासारखी आहे. त्यातून त्यांची नेमकी विचारकृतीही कशी अपेक्षित असेल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामधील मुख्य मुद्दे त्यामुळेच वाचण्यासारखे आहेत. साम्यवादी विचारांचा अभ्यास करताना मांडले जाणआरे मुद्दे, त्यामागील समाजासंबंधातील विचार आणि मूल्ये यांचा मार्ग हा अनेकदा सावरकरी विचारांशी साधर्म्य साधणारा वाटतो. साम्यवादी विचारांमधील अनेक विचारवंतांची मते, रचना, मांडणी या बरोबरच सावरकरांची विचारसरणी यामधील साम्य पाहाता मूळ उद्देशासाठी समाज, राष्ट्र आणि त्या मागचा माणूस, कामगार, शेतकरी हे घटक सावरकरांनीही विचारात घेतले आणि प्रभावीपणे त्यांच्यासंबंधात सूत्र मांडले आहे. या अधिवेशनातील त्यांची काही महत्त्वाची सूत्रे आजही लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यातील बारकावे शोधल्यावर त्यांचे महत्त्व लक्षात येईल.

🔵🔵

🔶।। सर्वांच्या आर्थिक हितसंबंधाच्या ऐक्यावर भर देऊन आणि निदान हिंदुस्थानांतले सर्व लोक तरी एका आर्थिक भूमिकेवर एकत्रित केल्याने सर्व धार्मिक, वंशविषयक, राष्ट्रीय आणि संस्कृतिक वैरभाव चुटकीसरशीं नाहींह ोतील असल्या मृगजलाच्या आशांच्या नादीं न लागता आणि मानवी आर्थिक फळी उत्पन्न करण्याचें पुस्तकी शास्त्रीय उपाय सोडून देऊन हिंदुसंघटनी लोकांनीं व्यावहारिक राजकारणी धोरणानें केवळ हिंदुराष्ट्राच्या आर्थिक उन्नती पुरताच आपला तात्कालिक आर्थिक कार्यक्रम मर्यादित ठेवावा. हिंदुस्थानांत असलेली विशिष्ट परिस्थिति आणि सामाजिक प्रगतीची आजची पायरी लक्षांत घेतां जवळच्या भविष्यकाळांत आपल्या आकांक्षाशीं जुळणारा जर कोणता अर्थशास्त्र विषयक सांप्रदाय असेल तर तो राष्ट्रीयत्ववादी अर्थशास्त्रज्ञांचा होय.
🔶।। आमच्या आर्थिक धोरणांचे मुख्य घटकावर एका सुलभ सूत्रांत मांडावयाचे तर त्याला ' वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय ' असें नांव द्यावेंसें मला वाटतें. हिंदूसँघटनी भूमिकेचा हा आर्थिक पैलू होय. आमचे आर्थिक धोरण वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय
🔶।। प्रथम आम्ही यंत्राचें स्वागतच करतों कारण हैं यंत्रयुग आहे. इस्तव्यवसायांना देखील एक स्थान आहे आणि ते उत्तेजनाही आहे. परंतु राष्ट्रीय उत्पादन है शक्य तितक्या अधिकतम विस्तृत यांत्रिक प्रमाणा बरच चालेल.
🔶।। शेतकरी आणि कामकरी वर्ग हाच राष्ट्रीय संपन्नतेचा, शक्तीचा आणि आरोग्याचा मुख्य पाया आहे. कारण देशाला आरोग्य आणि संपत्ति पुरवणाऱ्या याच दोन वर्गावर बलिष्ठ सैन्याच्या भरतीची केंद्रे मुख्यत: अवलंबून असतात. म्हणून त्या वर्गीच्या शक्तीचे आणि त्यांचीं निवासस्थान म्हणून खेडेगवांचें पुनरुज्जीवन होणें अवश्य आहे. केवळ जीवनाला नितांत आवश्यक वस्तू त्यांना मिळाव्यांत इतकेच नव्हे तर सर्वसामान्य सुखसोयीं वा लाभ त्यांना व्हावा आणि तो लाभ करून घेण्यास त्यांना समर्थ करण्याइतका राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपास त्यांचा विभाग त्यांना मिळवतां येईल अशी व्यवस्था झाली पाहिजे. तरीहि हें लक्षांत ठेवलें पाहिजे की, सर्वसामान्यपणे राष्ट्राचेंच ते अवयव आहेत आणि अर्थात त्यांनी आपल्या कर्तव्याचा नि उत्तरदायित्वाचा वांटा उचलला पाहिजे. पाहिजे. म्हणून राष्ट्रीय उद्योगधंदे, उत्पादन नि संपत्ति यांची सुरक्षितता आणि सर्वसमाजाची प्रगति यांच्याशी सुसंगत होईल अशा रीतीनेंच त्यांना त्यांचा अंशभाग मिळेल.
🔶।।  राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादन त्यांच्यासाठी राष्ट्रीय भांडवल असणे अपरिहार्य असल्याने आणि ते भांडवल सद्य परिस्थितींत मुख्यतः वैयक्तिक असल्यानें त्यालाहि आजच्या परिस्थितींत उत्तेजन आणि पुरस्कार योग्यप्रकारें देण्यांत येईल.
🔶।। भांडवल आणि श्रम या दोहोंचें हितसंबंध सर्व राष्ट्राच्या सामान्य आवश्यकतेला पूरक म्हणूनच मानण्यांत येतील.
🔶।।  एखादा उद्योग जर भरभराटीत असेल तर त्याच्या लाभांतून मोठा विभाग श्रमिकांना मिळेल. परंतु उलट जर तो उद्योग आर्थिक दृष्ट्या हानिकारक होईल तर केवळ भांडवलवाल्यालाच नव्हे तर कांहीं अंशी काम कऱणाऱ्यालाही अल्पलांभावर संतुष्ट राहावें लागेल हेतु हा की, भांडवलवाले नि कामकरी यांच्या स्वार्थी वर्ग हिताच्या अवास्तव धोरणानें राष्ट्रीय उद्योगांची सर्वस्वी वाताहात होऊं नये.
🔶।। सारांश, भांडवल नि श्रम यांच्या आकांक्षांचा वेळोवेळीं समन्वय करून सर्व राष्ट्रांचे उद्योग आणि उत्पादन यांचे संवर्धन व्हावे आणि राष्ट स्वयंपूर्ण व्हावे असा प्रयत्न करण्यांत येईल.
🔶।।  व्यक्तिगत प्रयत्नांपेक्षां जे उद्योग अधिक कार्यक्षमतेनें चालवतां येतील आणि जे उद्योग राष्ट्रीय राजसत्ता स्वतः चालवूं शकेल असे मुख्य मुख्य उद्योगधंदे यांचे सर्वस्वीं राष्ट्रीकरण करण्यांत येईल. तेंच तत्त्व शेतीलाहि लागू पडेल. कूळ किंवा शेतकरी आणि शेतांचे धनी यांच्या स्वार्थी वर्गविषयक हितसंबंधांचे द्वंद्व माजूं न देतां शेताचें घनी आणि शेतकरी यांच्या हितसंबंबंधांचा अशा रीतीनें समन्वय करण्यांत येईल की, एकंदर राष्ट्रीय शेतीच्या उत्पन्नाचे संवर्धन व्हावें.
🔶।।  मोठ्या यंत्रांच्या सहाय्यानें, मोठ्या प्रमाणांवर आणि शास्त्रीय पद्धतीनें राज्याकडूनहि शेती विकत घेऊन कांहीं अंशीं चालवण्यांत येईल. यांत हेतू हा राहील की, याचा उपयोग शेतकऱ्यांना शेर्ताचे शिक्षण देण्यांकडे व्हावा.
🔶।।  राष्ट्राची आर्थिक शक्ति ज्यायोगें क्षीण होईल आणि सामान्यतः राष्ट्रीय उद्योग नि उत्पादन यांची हानि होणे अपरिहार्य होईल; अशा रीतीनें किंवा तशाच उद्देशानं जे संप किंवा टाळेबंद होतील त्यांचा निकाल राष्ट्रीय पंचायतीमार्फत करण्यांत येईल आणि गंभीर परिस्थिति उत्पन्न झाल्यास निग्रहानें त्यास प्रतिबंधहि करण्यांत येईल.
🔶।।  व्यक्तिगत मिळकत ही सामान्यतः सुरक्षित मानण्यांत येईल.
🔶।।  कोणत्याहि परिस्थितींत योग्यमूल्य दिल्यावांचून राजसत्ता अशा व्यक्तिगत मिळकतीचा अपहार करणार नाहीं  विरोधी परकीय उद्योगधंद्यांपासून राष्ट्रीय उद्योगाच्या संरक्षणाचे कामी राज्याकडून सर्वप्रकार प्रयत्न होईल. या वर दिलेल्या गोष्टी उदाहरणादाखल जातांजातां दिल्या आहेत.
🔶।। राष्ट्राच्या आर्थिक शक्तीचे संवर्धन व्हावें आणि तें आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावें या दोन मुख्य सूत्रांवर वरील सर्व घोरण आधारलेलें आहे.
🔵🔵
१९३९ मध्ये मांडलेल्या सावकरांच्या या आर्थिक विचारांवरून त्यांचे सुस्पष्ट राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्रविषयक धोरणांचा दृष्टिकोन परखड आणि कणखर होता असेच दिसून येते. साम्यवादातील विविध विचारांना त्यांनी वर्गसंघर्षाच्या पार्श्वभूमीऐवजी वर्गहिताच्या राष्ट्रीय समन्वयाच्या विचारातून पाहिले, हेच आजही तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन पिढी कदाचित या विचारांना अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकेल, असाही विश्वास खरे म्हणजे प्रत्येक भारतीयाने करावयास हवा.
(क्रमश:)
- शल्य बोचरे
 
 


   तत्वज्ञान सावरकरांचे - ९    

सावरकरांचे सम्यक हिंदुत्त्व

सावरकरांचे हिंदुत्व हे भूमिनिष्ठ आहे, विज्ञानधर्माला मानणारे अद्ययावत होत लोकांनी पोथिनिष्ठता सोडून कालाप्रमाणे जगावे असे सांगणारे आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सनातनी धर्माच्या म्हणजे आजच्या घडीला चातुर्वर्ण्य मानणाऱ्या, जातिव्यवस्था मानणाऱ्यांना चांगलीच चपराक देत सावरकरांनी सर्वांना समतेचा धडा दिला होता. सामाजिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर त्यांनी या धर्मव्यवस्थेला जुन्या रिवाजातून नव्या कालाप्रमाणे अद्ययावत होत विज्ञाननिष्ठ व्हायला प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली. हे सारे करीत असताना सामाजिक स्तरावर असणारे बौद्धिक शिक्षणाचे प्रमाणही त्यांना जाणवलेेले होते. यामुळेच त्यांचे त्या स्तरावरही असणारे हे प्रयत्न किंबहुना व्यवहारिक स्तरावर जात साम्यवादी विचारांना भारतीय पद्धतीने साकारण्याचा असावा, असे म्हणता येते. त्याचबरोबर हे करीत असताना त्यांनी त्या कालातील समाजधुरिणांनाही झटका दिला, त्यांच्यावरही धर्मसंबंधातील विविध पोथिनिष्ठ बाबींवर वाद घालून पेचात पकडले आणि जातिभेदामुळे तळागाळातील लोकसमूहाला एका समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न यशस्वी केला होता. रत्नागिरीतील त्यांचे ते कार्य हे त्याचेच उदाहरण आहे. तेथील त्यांचे ते काम म्हणजे साम्यवादातील   समाजव्यवस्थेला भारतीय साच्यात बसवण्याचा त्यांचा भर असल्याचे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही.... थेट समाजवाद वा साम्यवाद म्हणत काम करणाऱ्या आजच्या अनेक नेत्यांना अजूनही न जमलेल्या गोष्टी सावरकरांनी त्या काळात केल्या होत्या, काळाप्रमाणे विचार करून ती तुलना केल्यास सावरकरांचा हा राष्ट्रधर्माला जागून हिंदुसमाजाला जागवणारा विचार हा किंबहुना जगातील मार्क्स-एंगेल्स आदींच्या साम्यवादाचे हिंदुरूप म्हणायला हरकत नाही. किंबहुना सावरकरांचे हिंदुत्त्व हे सम्यक हिंदुत्त्व होते.  असे म्हणणे अधिक रास्त वाटते.

सावरकरांचे तत्त्वज्ञान हिंदुस्थानातील राष्ट्रवादाबरोबरच साम्यवादाच्या धर्तीवर राष्ट्रधर्माच्या विचाराने समतेच्या दृष्टीने जाऊ पाहाणारे होते. सर्व धर्माच्या भारतीयांचे अस्तित्त्व त्यांनी नाकारलेले नव्हते, नकारलेले ही नव्हते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीयतेची, धर्माची, जातिभेद निर्मूलनाची  आणि आर्थिक-औद्योगिक, लष्करी, परराष्ट्रीय धोरणांची सूत्रेही त्यांनी राष्ट्रहिताच्यादृष्टीने स्पष्ट केलेली होती. त्यांचे आर्थिक उन्नतीसंबंधातील वा उत्पादन, उत्पन्न, कामगार, शेतकरी यांच्या संबंधातली विचार त्यांनी मार्क्ससारखे अर्थविषयक तज्ज्ञ नसूनही संक्षिप्त पद्धतीने मांडताना सुस्पष्ट मांडले आहेत वास्तविक त्यावेळी सत्ता हातात नव्हती ना सत्तेची पाकळीही त्यांच्याप्रत आलेली नव्हती. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधून बाहेर पडल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात  इंग्रजांच्या निर्बंधांनंतर ते उतरल्यानंतर आणि  हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचीही चाहुल लागली गेली होती. अशा स्थितीतही त्यांनी औद्योगिकरण, हिंदुंचे सैनिकीकरण करण्याबरोबरच शिक्षण, यंत्रांचा स्वीकार आणि त्यांचे महत्त्व तसेच शेती, ग्रामीण भाग येथील सुधारणांचा विकासही कसा व्हावा याबद्दल त्यांनी सुतोवाच केले होते. त्यामागील सूत्रे, तत्त्वे तसेच वैज्ञानिक-लष्करी विकास याबद्दलही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी भूमिका मांडली. स्थानबद्धता संपुष्टात आल्यानंतर सावरकर कोणाकडे येणार याबद्दल मोठी आकांक्षा- उत्सुकता काँग्रेसप्रमाणेच साम्यवाद्यांनाही होती, त्यामुळे त्यांचे स्वागतही तितकेच राजकीय पद्धतीने केले गेले होते, हे संबंधित कालातील घटना वाचल्यानंतर लक्षात येईल. त्यांचे महत्त्व तेव्हाही लक्षणीय होते हे म्हणूनच नाकारता येत नाही. अशा स्थितीत सावरकरांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षीय भाषणातून आर्थिक क्षेत्रासंबंधात जी प्रतिपादने केली ती काळजीपूर्वक पाहून विचार करायला लावणारी आहेत.
सावरकरांनी हिंदुत्वामध्ये केलेली हिंदुत्वाची व्याख्या ही नीटपणे लक्षात घेतली तर त्यांचे हिंदुत्व हे भूमिनिष्ठ आहे, विज्ञानधर्माला मानणारे अद्ययावत होत लोकांनी पोथिनिष्ठता सोडून कालाप्रमाणे जगावे असे सांगणारे आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सनातनी धर्माच्या म्हणजे आजच्या घडीला चातुर्वर्ण्य मानणाऱ्या, जातिव्यवस्था मानणाऱ्यांना चांगलीच चपराक देत सावरकरांनी सर्वांना समतेचा धडा दिला होता. सामाजिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर त्यांनी या धर्मव्यवस्थेला जुन्या रिवाजातून नव्या कालाप्रमाणे अद्ययावत होत विज्ञाननिष्ठ व्हायला प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली. हे सारे करीत असताना सामाजिक स्तरावर असणारे बौद्धिक शिक्षणाचे प्रमाणही त्यांना जाणवलेेले होते. यामुळेच त्यांचे त्या स्तरावरही असणारे हे प्रयत्न किंबहुना व्यवहारिक स्तरावर जात साम्यवादी विचारांना भारतीय पद्धतीने साकारण्याचा असावा, असे म्हणता येते. त्याचबरोबर हे करीत असताना त्यांनी त्या कालातील समाजधुरिणांनाही झटका दिला, त्यांच्यावरही धर्मसंबंधातील विविध पोथिनिष्ठ बाबींवर वाद घालून पेचात पकडले आणि जातिभेदामुळे तळागाळातील लोकसमूहाला एका समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न यशस्वी केला होता. रत्नागिरीतील त्यांचे ते कार्य हे त्याचेच उदाहरण आहे. तेथील त्यांचे ते काम म्हणजे साम्यवादातील   समाजव्यवस्थेला भारतीय साच्यात बसवण्याचा त्यांचा भर असल्याचे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. हे करीत असताना त्यांनी लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचाही सहानुभूतीने विचार केला होता. त्यांच्या त्यांच्या धार्मिक मताला बदलण्यासाठी बदलवण्यासाठी त्यांनी झटून काम केले होते. अर्थात हे सर्व काम करताना परिस्थिती एका रात्रीत बदलू शकणार नाही, हे कोणीही मान्य करील पण तरीही त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नव्हता. थेट समाजवाद वा साम्यवाद म्हणत काम करणाऱ्या आजच्या अनेक नेत्यांना अजूनही न जमलेल्या गोष्टी सावरकरांनी त्या काळात केल्या होत्या, काळाप्रमाणे विचार करून ती तुलना केल्यास सावरकरांचा हा राष्ट्रधर्माला जागून हिंदुसमाजाला जागवणारा विचार हा किंबहुना जगातील मार्क्स-एंगेल्स आदींच्या साम्यवादाचे हिंदुरूप म्हणायला हरकत नाही. किंबहुना सावरकरांचे हिंदुत्त्व हे सम्यक हिंदुत्त्व होते.  असे म्हणणे अधिक रास्त वाटते.
हिंदुरुप हा शब्द सावरकरांच्या भूमिनिष्ठ- विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाबरोबर, पराभूत मानसिकतेतून बहुसंख्य हिंदुंची अस्मिता जागवणाऱ्या हिंदु शब्दाशी समान आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे. वि. दा. सावरकर यांचे हिंदुत्व आणि अन्य संघटना संस्थांचे सध्या सांगण्यात येणारे हिंदुत्व यात बराच मोठा मूलभूत फरकही आहे हे या निमित्ताने येथे लक्षात घेतले पाहिजे.
धर्म आणि समाजव्यवस्थेबरोबरच आर्थिक व्यवस्थेत भारतात एकेकाळी असणारी कृषी आधारित समाजव्यवस्था बदलणार आहे, नव्या जागतिक घडामोडींमुळे मोठे बदल त्यात होतील. यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण याचबरोबर भारतातील मुस्लीम लीगसारख्या अल्पसंख्याक असलेल्या धार्मिक समाजाच्या नेतृत्वाने धारण केलेले आक्रमक रूप, त्यांच्या अवास्तव असलेल्या आणि बहुसंख्य हिंदुनांच दडपणाऱ्या मागण्या आणि त्यापुढे मान तुकवणारे काँग्रेस आणि गांधीनिष्ठ नेतृत्त्व यामुळे होणारे नुकसान केवळ हिंदुंचे नसेल, ते राष्ट्राचे असेल, हे सावरकरांनी त्यावेळी जाणले तसे त्यांनी लक्षात घेऊन अनेक बाबतीत स्पष्टही केले. हे करताना मुसलमानांना त्यांचे नागरिक म्हणून असणारे योग्य अधिकार देय असतील हे ही त्यांनी स्पष्ट केले. नागरिक म्हणून समान पातळीवर विचार करण्याबरोबरच मुस्लिमांच्या अवाजवी मागण्यांना त्यांनी नेहमीच चपराक दिली. खरे म्हणजे साम्यवाद्यांनी खिलाफतीला भारतात जो पाठिंबा दर्शवला होता, तो साम्यवादी विचाराला धरून होता का, याचा विचार करायला हवा. 
 हिंदु हा शब्द उच्चारणे म्हणजे जातियता असा काही विचार गेल्या काही वर्षांमध्ये बोकाळला आहे, त्याला कारण सावरकर नक्कीच नाहीत. कारण आत आणि बाहेर असे त्यांनी काही ठेवलेले दिसत नाही. ते स्पष्टपणे बाजू मांडतात आणि हिंदु संघटनेबद्दल सांगताना ते राष्ट्राला महत्त्व देतात.  त्यामुळे या संबंधातील त्यांची काही विधाने येथे पाहाणे आवश्यक आहे.
🔵🔵

🔶।। जे हिंदी देशभक्त एखाद्या वैश्विक राज्याची कोणती चळवळ चालू करण्याचे नि तिला मिळण्याचे सोडून त्याच्या आंतच थबकतात नि एखाया ' हिंदी' चळवळीलाच मिळून'हिंदु संघटना ' ची मात्र आकुंचित नि जातिनिष्ठ नि क्षेत्रनिष्ठ म्हणून टवाळी करण्याचें चालूच ठेवतात ते केवळ स्वतःचीच टवाळी करण्यांत नेमके यशस्वी ठरतात ! परंतु हिंदी देशाभिमानाच्या समर्थनार्थ जर असे सांगितले जात असेल किंवा सांगितले जात असतें की हिंदुस्थान देशांत वसति करून असलेले लोक हे एक पूर्वपीठिका, एक भाषा, एक संस्कृति, एक इतिहास इत्यादि बंधांनीं बांधलेले असल्यामुळे हिंदुस्थानाचाइरेलि दुसऱ्या कोणत्याहि लोकांपेक्षा एकमेकांना अधिक जवळचे वा आप्त आहेत आणि त्या करितांच दुसन्या अहिंदी राष्ट्रांच्या वर्चस्वापासून नि अतिक्रमणापासून आमच्या राष्ट्राचे रक्षण करणे आम्हां हिंदी लोकांना आमचे पहिले कर्तव्य वाटतें - तर तेच कारण हिंदु संघटनाच्या चळवळीच्या समर्थना करितांहि तंतोतंत लागू पडतेंच.
🔶।।  जोपर्यंत ती चळवळ विशिष्ट राष्ट्राच्या वा लोकांच्या वा जातीच्या न्याय्य व मूलभूत अधिकारांचें दुसऱ्या लोकांच्या नि दुसऱ मानवी संघांच्या बलात्कारी नि उद्दाम अतिक्रमणापासून रक्षण करण्या करितांच झटत असते आणि दुसऱ्याच्या समान नि न्याय्य अधिकाराला नि स्वातंत्र्याला ढळ लावीत नाहीं, तोपर्यंत तें राष्ट्र किंवा ती जाति हा तादृश एक लहान संघ आहे एवढयाच निव्वळ कारणाकरितां ती निषेधितां वा तुच्छ लेखतां येत नाहीं. जेव्हां एखादें राष्ट्र वा जाति दुसन्या बंधुराष्ट्रांचे वा बंधु जातींचे अधिकार तुडविते आणि मानवजातीचे अधिक मोठाले गट नि संघ बनविण्याच्या मार्गौत उद्दाम आगळिकीने बाध आणते तेव्हांच त्यांचा राष्ट्र बाद किंवा जातिवाद मानवतेच्या दृष्टीनें धिक्कारार्ह ठरतो. राष्ट्रवाद किंवा जातिबाद समर्थनीय कोणता नि असमर्थनीय कोणता है ठरविण्याची हीच कसोटी आहे. हिंदु संघटनाची चळवळ राष्ट्रनिष्ठ वा जातिनिष्ठ वा क्षेत्रनिष्ठ तुमच्या इच्छेनुसार कशीहि म्हणा, ह्या खऱ्या कसोटीवर पारखली असतां ती हिंदी देशाभिमानाइतकीच समर्थनीय ठरते.
🔶।। आक्रमक नि संरक्षक संधींनी परस्परांशीं बांधल्या गेलेल्या अरबस्थानपासून अफगाणिस्थानापर्यंतच्या मुसुलमान राष्टांची सांखळी जोडून पॅन इस्लामच्या चळवळीच्या चालू असलेल्या हिंदूविरोधी • योजना आणि धार्मिक नि सांस्कृतिक द्वेषानें हिंदूंना चिरडण्याच्या वायव्य सीमेवरील टोेळ्यांच्या क्रूर प्रवृत्ति आम्ही हिंदु पुरेपूर ओळवून असल्यामुळें आम्ही इतःपर केव्हांहि तुमच्यावर विश्वास टाकून आणखी कोणते 'कोरे कागद ' तुम्हांला देणार नाहीं. इतर सर्व घटकांच्या 'स्वत्वा ' सवेंच आमचें स्वत्व 'हि ज्यांत सुरक्षित राहील तें स्वराज्य जिंकून घेण्याला आम्ही सन्निद्ध झालो आहोत.
🔶।। केवळ एक धनि जाऊन दुसरा धनि यावा म्हणून कांहीं इंग्लंडशी झुंज खेळण्याला आम्ही उद्युक्त झालेलों नाहीं, तर आमच्या स्वतःच्या घराचे आम्ही स्वतःच धनि झालों पाहिजे हाच आम्हां हिंदूंचा रोख आहे. आमच्या शरणागतीवर नि स्वतः हिंदुत्वाचेंच मोल देऊन जे मिळू शकणार असेल ते तसलें स्वराज्य आम्हां हिंदूना आमच्या आत्महत्येसारखेच आहे.
🔶।। यापुढें हिंदु-मुस्लीम-ऐक्यासंबंधीचे हिंदूचं सूत्र हेच राहणार की " - याल तर तुमच्यासहं, न याल तर तुमच्यावांचून, विरोधाल तर तुम्हांस विरोधून हिंदु-राष्ट्र आपलें भवितव्य बनेल तसे घडवील ! ”
🔵🔵
  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुमहासभेच्या अधिवेशनांमध्ये अध्यक्षीय भाषणांमध्ये आपल्या या भूमिका स्पष्ट मांडल्या. मुस्लीम नेते, ब्रिटिश  यांचे अंतर्गत संबंध आणि काँग्रेसने हिंदु-मुस्लीम ऐक्याच्यासाठी सातत्याने केलेली मुस्लीमांची मतझेलणी यामुळे मुस्लीम समाजाकडून उमटलेल्या विविध प्रक्रियांमुळेच सावरकरांना अशी भूमिका घेणे भाग पडलेले दिसते. अन्यथा मुस्लिमांनीही पोथिनिष्ठता सोडावी आणि विज्ञाननिष्ठ व्हावे तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकेल, असे सांगणाऱ्या सावरकरांवर अहिंदू असलेल्या मुस्लीमांना असेसांगण्याची वेळच आली नसती. तरीही त्यांनी मुस्लिमांशी ऐक्य करण्याचे सूत्र सांगताना मुस्लिमांना स्पष्ट बजावले होते.
हे सारे विचार मांडणाऱ्या सावरकरांनी भारतात असलेल्या राजकीय, आर्थिक आणि धार्मिक वातावरणाचा अचूक मागोवा घेतलेला होता. त्यामुळे राष्ट्र या संकल्पनेमध्ये सुस्पष्टता ठेवीत त्यांनी अर्थकारणही एका सूत्रात बांधले त्यासंबंधी कोलकाता येथील १९३९ मधील हिंदुमहासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात तपशीलवार माहिती दिली होती. त्यात ते म्हणाले होते....
🔶।। हिंदुस्थानांत असलेली विशिष्ट परिस्थिति आणि सामाजिक प्रगतीची आजची पायरी लक्षांत घेतां जवळच्या भविष्यकाळांत आपल्या आकांक्षाशीं जुळणारा जर कोणता अर्थशास्त्र विषयक सांप्रदाय असेल तर तो राष्ट्रीयत्ववादी अर्थशास्त्रज्ञांचा होय. आमच्या आर्थिक धोरणांचे मुख्य घटकावर एका सुलभ सूत्रांत मांडावयाचे तर त्याला '" वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय ' असें नांव द्यावेंसें मला वाटतें. हिंदूसंघटनी भूमिकेचा हा आर्थिक पैलू होय.
(क्रमश:)
- शल्य बोचरे


मंगळवार, २७ जून, २०२३

    तत्वज्ञान सावरकरांचे - ८

समाजधर्माचा क्रांतिस्तंभ

आजही देव, देश आणि धर्म यांचे परस्परसंबंध कमी झालेले नाहीत. राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि घर, घराच्या उंबरण्यापासून ते राज्य, देश आणि जगाच्या विविध देशांपर्यंत या परस्परसंबंधांवर आधारित  सत्ताकारण आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यवीरांना राजकारणापासून अलिप्त राहाण्याचे बंधन घातले गेले होते, ते त्यांनी जरी पाळले असले तरी ते त्या सर्वांचा मूलभूत गाभा हा स्वातंत्र्याच्या उद्घोषाचाच होता. या संबंधात सखोल विचार करणाऱ्यांनाच त्यातील बारकावे समजू शकतील. रत्नागिरीतील त्यांचे १९३७ पर्यंतचे वास्तव्य हा देखील त्यांच्याद्वारे देश, देव, धर्म, मानवता, समाज यासाठी झालेला वास्तववादी, समानतावादीस समतावादी, समाजवादी इतकेच कशाला गांधीवादी आणि धर्मवादी म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारीच घटना होती.


भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा काळ कसा होता, त्यावेळी हिंदु समाजाची मानसिकता कशी होती, त्यावेळी हिंदु समाज क्रांतिकारक बदल किती क्षमतेने स्वीकारणारा होता , रितीरिवाज, पोथिनिष्ठ धर्माचे किती मोठ्या प्रमाणात अनुकरण करणारा होता केवळ समाजच नव्हे तर या हिंदु समाजाचे धार्मिक आणि समाजातील मान असणारे लोक, नेते, धर्मगुरूही कशा प्रकारचे होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय अचूकपणे ओळखले होते. विशेष म्हणजे ती सारी वास्तवता लक्षात घेऊनही त्यांनी राष्ट्रोन्नतीसाठी, समाजोन्नतीसाठी आणि धर्माच्या नावे होणाऱ्या रिती-रिवाज, परंपरा यांच्यासंबंधात लोकांच्या असणाऱ्या भावना, मानसिकता यामधील त्यांची वैयक्तिकता वा व्यक्तीस्वातंत्र्याचा भागही जपत रत्नागिरीमधील स्थानबद्धतेत त्यांनी समाजक्रांतिचे काम केले. ते काम खरे म्हणजे देशभरात पोहोचणे तेव्हाही आवश्यक होते आणि आजही त्याचे महत्त्व तसूभरही कमी  झालेले आहे असे वाटत नाही. याचे कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते, काँग्रेसवीर नव्हते. स्वातंत्र्य या शब्दाच अर्थ खऱ्या अर्थाने त्यांनी जाणला होता. केवळ राजकीय स्वातंत्र्य इतकीच संकल्पना त्यांनी मनामध्ये बाळगली नाही, त्यामुळे स्वातंत्र्याचे सत्त्व, तत्त्व आणि महत्त्व त्यांनी पू्र्ण जाणून त्यादृष्टीने आपल्या बंधनाच्या काळातही रत्नागिरीतील स्थानबद्धतेत देश, धर्म, समाज, व्यक्ती, मानवता अशा व्यापक अर्थाने हिंदु धर्माला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. नव्हे ती तर एका क्रांतिकारकाने घडवलेली सामाजिक क्रांतीच होती.
आजही देव, देश आणि धर्म यांचे परस्परसंबंध कमी झालेले नाहीत. राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि घर, घराच्या उंबरण्यापासून ते राज्य, देश आणि जगाच्या विविध देशांपर्यंत या परस्परसंबंधांवर आधारित  सत्ताकारण आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यवीरांना राजकारणापासून अलिप्त राहाण्याचे बंधन घातले गेले होते, ते त्यांनी जरी पाळले असले तरी ते त्या सर्वांचा मूलभूत गाभा हा स्वातंत्र्याच्या उद्घोषाचाच होता. या संबंधात सखोल विचार करणाऱ्यांनाच त्यातील बारकावे समजू शकतील. रत्नागिरीतील त्यांचे १९३७ पर्यंतचे वास्तव्य हा देखील त्यांच्याद्वारे देश, देव, धर्म, मानवता, समाज यासाठी झालेला वास्तववादी, समानतावादीस समतावादी, समाजवादी इतकेच कशाला गांधीवादी आणि धर्मवादी म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारीच घटना होती. काहींनी त्याकडे भले हेतूपुरस्सर स्वार्थात्मक दृष्टीने दुर्लक्ष केले असले तरी त्या काळात त्यांचे तेथील वास्तव्य हे  कर्मवीर शिंदे, व्ही. व्ही. एस. अय्यर, गांधीजी, आंबेडकर, माधव बागल, डॉ. हेडगेवार, ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक यांच्यासारख्यांना महत्त्वाचे वाटले, त्यांनी त्यासाठी रत्नागिरीत येऊन सावरकरांची भेटही घेतली. ही बाब कोणी कितीही राजकीय अर्थ काढत आज सावरकरविरोधी टीकेसाठी वा आरोपांसाठी जरी वापरली तरी त्यातूनही सावरकर यांचे तेथील कार्य आणि रत्नागिरीतील अस्तित्त्व- वास्तव्य किती परिणामकारक होते, त्याचीच साक्षदायी ठरते.
स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगांव या गावात विष्णुपंत दामले यांच्या घरातील १२ फूट लांब आणि सात फूट रुंद इतक्या खोलीत वास्तव्य करून होते. ही खोली म्हणजे मूळ भाताचे कोठार होती. त्या वास्तव्यासंबंधातील विविध आठवणी दामले यांचे पुत्र मोरेश्वर दामले यांनी लिहिल्या होत्या. केसरीमध्ये त्या लेख रुपाने प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर पुस्तकरूपात (सावरकर स्मृति) त्या प्रकाशित करण्यात आल्या.  त्यातील सावरकरांसबंधातील वाक्ये, घटना, त्यावेळची सावरकरांची विधाने आणि तत्कालीन परिस्थतीचे दर्शन देणारी माहिती वाचल्यानंतर सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचे महत्त्व लक्षात येईल. याच रत्नागिरीमधील वास्तव्यात  त्यांनी  नेपाळी आंदोलन, मोपल्यांचे बंड,  संगीत उःशाप,  लिपी शुद्धी,   माझी जन्मठेप,  हिंदुपद पादशाही,  भाषा शुद्धी,  संगीत संन्यस्त खड्ग,  उत्तर क्रिया, किर्लोस्कर मासिकांतील विज्ञाननिष्ठ निबंध तसेच क्रांतिकारक भगतसिंग यांच्या फाशीनंतर दुसऱ्या दिवशी रत्नागिरीत प्रभातफेरी काढली त्यावेळी लिहिलेली गायिली गेलेली कविता ही सावरकर यांनीच अतिशय गुप्तपणे तयार करून दिली होती.
सावरकरांचे रत्नागिरीतील हे वास्तव्य जन्मजात जातिभेद नष्ट करण्यासाठी झगडणारे होते, सर्वस्तरातील हिंदुंना एकत्रित आणणे, त्यांच्यामधील भेदभाव संपवणे आणि हिंदुंनीच लादलेल्या धर्मांतर्गत सात बेड्यांना तोडण्याचे कामही अतिशय जोरकसपणे केले. हे सर्व कार्य हे साधे नव्हते. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या, जातिभेद- उपजातिभेद मानणाऱ्या समाजाला, अगदी धार्मिक गुरुंनाही सुनावण्याचे काम सावरकरांनी केले.
🔴🔴
🔷 शिरगावातील गुरव समाजाने बांधलेल्या हनुमानाच्या छोट्या मंदिरातील उत्सवासाठी जेव्हा सावरकरांना बोलावण्यात आले तेव्हा सावरकरांनी अट घातली तेव्हा सांगितले की,
🔶।। 'मी उत्सवाला येईन, पण एका अटीवर आणि ती ही की माझ्याप्रमाणेच गावांतील महार-चांभार वगैरे मंडळींना, ज्यांना तुम्ही अस्पृश्य समजता त्यांना, आमंत्रण दिले गेले  पाहिजे.'  मोठ्या मिनतवारीने गुरव यानी अस्पृश्यांना उत्सवाचे आमंत्रण देण्याचे मान्य केले. सुमारे अर्धा तासापर्यंत सावरकर त्यांच्याशी युक्तिवाद करीत होते.
सावरकरांनी त्यावेळी दामले यांना सांगितलेकी, शेकडो लेख किंवा व्याख्याने यापेक्षा प्रत्यक्ष केलेल्या कार्याचाच जास्त परिणाम होत असतो. आता हनुमान जयंतीच्या दिवशी तू पाहशीलच. त्याच रात्री सावरकरांनी एक फुटकी दगडी पाटी व बारीकशी दगडी पेन्सिल घेऊन त्यावर तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु' या एकता गीताची | रचना केली.
🔷🔷
बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनानंतर त्यामधीली काही नेते मंडळी हिंदु-मुस्लीम एकी संबंधात  जेव्हा रत्नागिरीत सावरकरांना भेटायला आली होती. तेव्हा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सावरकरांनी त्यांना सुनावले, ते शब्द त्यांच्या स्वराज्य या शब्दाला असलेले महत्त्वच विशद करणारे आहेत. ते म्हणतात...
🔶 ।।  मी, पंडित मदनमोहन मालवीय, लाला लजपत राय, डॉ. मुंजे, स्वामी श्रद्धानंद इत्यादि हिंदु संघटन करणारे लोक स्वराज्य दूर दवडीत आहेत ? महाशय! ज्यावेळी तुमचा जन्महि झाला नसेल त्यावेळी आम्ही स्वराज्यास्तव फाशीच्या फळ्यांपर्यंत जाऊन आलो आहोत. ज्यांचा सर्व जन्म स्वराज्यास्तव अनन्वित हालअपेष्टा आणि कष्ट काढण्यांत गेला आणि जात आहे अशांबद्दल हे उद्गार काढण्यास तुम्हांला कसलीच दिक्कत वाटली नाही हे कोणत्या मनोभावनेचे द्योतक? लक्षांत ठेवा की तिकडे केमालपाशा खिलफतींची खिरापत करतो आहे तर आम्ही इकडे 'खिलाफत' डोक्यावर घेऊन नाचत आहों कां तर हिंदु-मुसलमानांच्या एकीसाठी. तबलीघच्या ( हिंदुना मुसलमान करुन घेण्याची चळवळ ) चळवळीविरूद्ध आम्ही हिंदु 'ब्र' काढत नाही ; का तर हिंदु मुसलमानांच्या एकीसाठी ! अनेक ठिकाणी मुसलमानाच्या आगळिकीने दंगे होतात, पण आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवीत नाही. का तर हिंदु-मुसलमानांची एकी बिघडेल म्हणून. आणि 'स्वराज्य स्वराज्य म्हणजे तरी काय हो ? ज्यात स्वत्व राहते तेच स्वराज्य ना ? मग ज्यात आपले हिंदूंचे स्वत्व रहाणार नसेल ते आमचे स्वराज्य होईल काय ? तुमच्यासारख्यांच्या भोंगळ बावळट आणि कचखाऊ वृत्तीमुळेच मुसलमान शेफारून जातात, गेलेहि आहेत. मुसलमानांना त्यांचे योग्य ते हक्क देऊ नये म्हणून आम्ही कधी तरी म्हटले आहे का ? सुखेनैव त्यांनी भारतात सुखासमाधानाने नांदावे. पण ते जर अद्यापहि आपल्या एका काळाच्या हिंदुस्थानावरील राजकीय वर्चस्वाच्या स्वप्नात दंग असतील व तशीच भविष्यकाळाची स्वप्ने रंगवीत असतील तर ते मात्र आम्ही चालू देणार नाही.
🔷🔷
पतितपावन मंदिराची उभारणी हा देखील एक रत्नागिरीतीलच नव्हे तर सामाजिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि क्रांतिकारक विषय होता. त्यावेळी उद्योजक भागोजीशेट कीर यांनी एका उत्सवाला सावरकरांना बोलावले होते. त्यावेळी शिवपूजेसंबंधात त्यांना सावरकरांनी सांगितले  आणि त्यातूनच कीर यांनीद्वारे हे पतितपावन मंदिर उभारले गेले.  त्यावेळी संभाषणात सावरकर म्हणाले होते.....
🔶।। आपणाला शिवपूजा बांधू न देण्यांत सनातनी लोकांनी अन्याय केला यात शंकाच नाही. कारण देव भावाचा भुकेलेला असतो. पण सनातन्यांच्या अन्यायामुळे आपण ज्या सात्विक आनंदाला मुकला होता त्याच आनंदाला आपले पूर्वांस्पृश्य बांधव आज शेकडो वर्षे मुकले आहेत त्याचे काय ? आपण सवर्ण असल्याने देवळांत जाऊन देवदर्शन तरी घेऊ शकतो; पण त्यालाहि अस्पृश्यांना बंदी आहे. तेव्हा आपणावर जो अन्याय झाला त्याहीपेक्षा जास्त अन्याय आपल्या अस्पृश्य बांधवांवर होत आहे, हे खरे नाही का ? आपण धनाढ्य असल्याने हे शिवमंदिर बांधू शकलात. पण त्याहोन-दीन दुवळ्या अस्पृश्यांचे काय ? त्यांच्यासाठी त्यांना स्वहस्ते देवमूर्तीची पूजा करता येईल असे एखादे मंदिर आपण बांधून दिले तर सनातन्यांवरील आपला राग मी सार्थ समजेन
त्यावर कीर यांनी 'होईल, आपण म्हणता तसेहि प्रभूची इच्छा असेल तर होईल, ” असे सांगितले आणि हे संभाषण हेच या रत्नागिरीतील पतितपावन मंदिरासंबंधातील सूतोवाच ठरले.
🔷🔷
तत्कालीन रुढीप्रिय समाज सावरकरांनी मांडलेल्या अशा समाजक्रांतिकारी कामांमुळे, विधानांमुळे त्यांच्यावर संतापलेलाही होता. काहींनी त्यांना पाखंडीही म्हटले होते. जातिभेदाच्या विरोधातील त्यांच्या कार्यक्रमात असलेले सहभोजन असो की, मंदिरातील दर्शन, असो सात बेड्यांना तोडण्याचा त्यांचा सुस्पष्ट आदेश असो. त्या संबंधातील सावरकरांचे काम हे निर्धाराने चालू होते. या काळात त्यांनी काही विधाने व उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत.
🔶।। हिंदु जातीच्या सध्याच्या दुबळेपणाला, विस्कळीतपणाला हिंदूतील जातिभेद हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे
🔶।। जातिभेद हा सप्तपाद प्राणी आहे. ते सात पाय म्हणजे बेदोक्तबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी. या सात पायांपैकी सिंधूबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी हे तीन पाय कालौघात बरेचसे कमकुवत झाले आहेतच. आता उरलेले चार पाय, म्हणजं वेदोक्तबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी हे चार पाय विशेषतः स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी हे तीन पाय आपण तोडले म्हणजे जातिभेदरूपी सप्तपाद प्राणी खाली कोसळलाच म्हणून समजा. जातिभेद-निर्मूलनासाठी सहभोजने झाली पाहिजेत बाणि ती सुद्धा 'जातिभेदोच्छेनार्थ अखिल हिंदु सहभोजन करिष्ये' असा संकल्प सोडून.
🔶।। “शेटजी, देऊळ आपले, आपण धनी ; तेव्हा समारंभ आपण करालच. पण प्रत्येक हिंदूला वेदोक्ताचा अधिकार आहे या तत्त्वाला आपण सोडणार असाल तर आपण मलाहि सोडल्यासारखेच होईल. जुनी देवळे थोडीं नाहीत. तत्त्वाचे अधिष्ठान म्हणून हे नवें देऊळ हवे आहे. ते साधत नसेल तर आपण मलाहि सोडावें. पण जर आपण तत्त्वास सोडणार नसाल तर याहि परिस्थितीत समारंभ मी पार पाडीन. पण आमच्या अखिल हिंदु-स्मृतीच्या आधारे, पूर्वास्पृश्यासह अखिल हिंदूंचा जो हजारोचा समुदाय आज आलेला आहे त्या हजारो हिंदूच्या हस्ते देवमूर्ति उचलून जय देवा' असा घोष करून आम्ही ती मूर्ति स्थापणार हाच आमचा विधी; 'हिंदुधर्म की जय ' चे हजारो कंठातून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि 'भावेहि विद्यते देवो हाच आमचा शास्त्राधार.
🔶 ।।  'वेदकाली जातिभेद नव्हता. वर्णभेद होता. मनुष्याचे आचार विचार आणि धंदे यावर तो ठरविला जात असे. ज्या घराण्यांत जो आचार-विचार किंवा धंदा असे तोच सामान्यतः पुढेहि चाले आणि त्यामुळे हे वर्णहि जन्माने ठरूं लागले. पुढे या वर्णातील लोकहि निरनिराळे धंदे करू लागले, त्यांचे आचार-विचारहि निरनिराळे होऊ लागले. तेव्हा चार वर्णातहि अनेक भेद झाले व त्याच जाती म्हणून ओळखण्यात येऊ लागल्या. पुढे ज्या जातींत जो जन्माला आला तो त्या जातीचा म्हणून गणला जाऊ लागला. मग त्याचे आचार-विचार कसेहि असोत. मनस्मृतीच्या आधारे आज किती लोक स्वतःला ब्राह्मण म्हणवू शकतील ? या जन्मजात जातिभेताचे मुख्य गमक म्हणजे मुख्यतः इतर जातींशी रोटीबंदी व बेटीबंदी. त्यामुळे आपल्या समाजांत अनेक भेद पडले, आपाप सांत हेवेदावे निर्माण झाले आणि आपक। एकजिनसी आणि सामर्थ्य-संपत्त हिंदु समाज विस्कळीत आणि दुबळा झाला. तो जर परत एकजिनसी आणि सामर्थ्यसंपन्न व्हावयास पाहिजे असेल तर त्यांच्यांतील हे कुचकामी, घातक आणि आज तरी कोणत्याहि दृष्टीने समर्थन न करता येणारे जन्मजात जातिभेद नष्ट झालेच पाहिजेत. ते अपोमान नष्ट होत नसतील तर बुद्धया नष्ट केले पाहिजेत.
🔶।।  श्रुति, स्मृति, पुराणें कांहीहि म्हणोत, सद्यःस्थितीत जर हे जातिभेद हिंदु समाजाला घातक ठरत असतील तर श्रुति, स्मृति, पुराणांत कांही हि सांगितलेले असले तरी तो वाजूला सारून समाजाने हे जातिभेद नष्ट केले पाहिजेत असे माझे ठाम मत आहे. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. जन्मजात जातिभेद नव्हे. हा जातिभेद हिंदुसमाजाला विस्कळीत, दुर्बल, तेजोहीन बनवीत आहे आणि म्हणून तो मोडला पाहिजे, तोडला पाहिजे.
🔶।। महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर कर्वे यांच्यावर लोकांचे हेच आक्षेप होते. पण आता चाळीस-पन्नास वर्षानंतर त्यांची मतें जवळजवळ सर्वमान्य झाली आहेत. कोणी सांगावें, चाळीस-पन्नास वर्षानंतर' माझी ही जात्युच्छेदनाची चळवळहि अत्यंत योग्य होती असाहि हिंदुसमाज कौल देईल. आणि ह्याच मूठभर असणाऱ्या आम्हां लोकांची मतें सवं समाजाचीहि होतील. माझ्याविषयी म्हणाल तर हिंदु समाज सामर्थ्यसंपन्न व्हावा म्हणून ज्या ज्या गोष्टी मला आवश्यक वाटतात त्या त्या मी निर्भीडपणे सांगणार प्रचारविणार. मग त्यामुळे मी एकटा उरलो किंवा लोकांनी माझें टाळकें फोडलें तरी त्याची मला पर्वा नाही.'
(क्रमश:)
- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

मंगळवार, २० जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - ७  

धर्मालाही दिला व्यापक आयाम

आपल्या हिंदू समाजात जी अत्यंत अन्याय्य आणि आत्मघातकी अशी अस्पृश्यतेची रूढी पडलेली आहे, तिचा नायनाट करण्यासाठी आम्ही किती तत्परतेने झटत आहो, हे ‘श्रद्धानंदा' च्या वाचकांस तरी सांगावयास नकोच. अस्पृश्यता जी निघाली पाहिजे, ती मुख्यतः आमच्या सात कोटी धर्मबंधूंना निष्कारण पशूहूनही 'अस्पृश्य' लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे, तर आपल्या स्वतःच्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय... तो केवळ अमक्या जातीत उत्पन्न झाला म्हणूनच, स्पर्श करीत नाही आणि एखाद्या कुत्र्यामांजरास स्पर्श करतो, तेव्हा मी मनुष्यत्वाविरुद्धच एक अत्यंत गंभीर असा अपराध करीत असतो. केवळ आपद्धर्म म्हणून अस्पृश्यता काढणे अवश्य आहे, इतकेच नाही, तर धर्माचा कोणत्याही दृष्टीने विचार केला, तरीही त्या प्रस्तुतच्या अमानुष रूढीचे समर्थन करणे अशक्य आहे, एतदर्थ धर्माची आज्ञा म्हणूनच ती रूढी नष्ट केली पाहिजे. न्यायाचे दृष्टीने, धर्माचे दृष्टीने माणुसकीचे दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे. त्यापासून आजच्या परिस्थितीत लाभालाभ काय आहेत, हा प्रश्न दुय्यम आहे. हा लाभालाभाचा प्रश्नच आपद्धर्म होय आणि अस्पृश्यतानिवारण हाच मुख्य आणि निरपेक्ष धर्म होय.

हिंदु समाजाला पराजितांच्या मानसिकतेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या काळात केला, ज्या पद्धतीने केला ती कृती अतिशय महत्त्वाची आहे. राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक स्तरावरून त्यांनी हिंदु धर्माच्या संबंधात एक नवा आयाम दिला हे मान्य करावे लागेल. त्यांचा तो प्रयत्न दुर्दैवाने समाजातीलच हिंदु लोकांना समजू शकला नाही. त्याकाळातही काँग्रेसच्या आणि ब्रिटिशांच्या वरदहस्ताने झालेल्या नेत्यांना समाजात मिळणारा मान हा त्या त्या नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या मुस्लीमधार्जीण्या लांगूलचालनाला मार्केटिंगने मिळाला होता. धर्मनिरपेक्षतचे भूत तसेच अल्पसंख्य असणाऱ्या मुस्लीम समाजापुढे मान तुकवण्याचे राजकारण हे त्यावेळीही हिंदु समाजाचा अवसानघात करणारे होते. तरीही ते कृत्य सावरकरविरोधकांकडून केले गेले. मुस्लीम नेते, मुस्लीम लीग यांना प्रोत्साहीत करून त्यांच्या मागण्यांना कशाही प्रकारे स्वीकारून आणि बहुसंख्य असणाऱ्या हिंदु समाजाचे नुकसान करून अहिंसेच्या वातावरण निर्मितीची प्रतीक्षा करणाऱ्यांना आजपर्यंतही त्या मुस्लीम समाजाचे समाधान मिळवता आलेले नाही. त्यामुळेच आजही मुस्लीम वा अहिंदु धार्मिक नेते, राजकीय पाठबळावर हिंदुस्थान ही हिंदुची भूमी आहे असे सोडा पण हिंदुंचीही भूमी आहे असे मानायला तयार नाहीत, हेच मोठे भीषण सत्य स्वीकारावे लागत आहे.

भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा मूलभूत विचार म्हणजे सावरकरांनी समाजसुधारणेचा मार्ग ज्या पद्धतीने हाताळला होता, तो. जो बुद्धिवादी होता, खऱ्या अर्थाने धर्ममार्तंडाना समान पातळीवर पाहावयास लावणारा होता. मग तो धर्म हिंदूंमधील आर्य सनातनी असो की ख्रिश्चन असो वा मुस्लीम असो. भविष्य काळातील घडामोडींवर आणि भविष्यावर सावरकर यांची नजर इतकी भेदक होती की पुढील काळात कसे युग अवतरणार आहे, याची पूर्ण जाणीवच त्यांना झालेली होती. त्यामुळेच रत्नागिरीतील हिंदु धर्मासंबंधातील सुधारणेचे काम असो किंवा मुस्लीमांनीही पोथिनिष्ठा सोडावी असे सांगणे असो की, मानसिक दृष्टीने काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदुंच्या बोटचेप्या वृत्तीलाही धुडकावून सर्व मानवतेला समान मानणारे तत्त्वज्ञान असो, हे सारे काम करताना सावरकरांनी कधीही मनात एक आणि जनात एक असे केले नाही. त्यामुळेच हिंदुंच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी मते मागणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रीय म्हणवणाऱ्यांना त्यांनी नेहमीच खडसावले. हिंदु आणि अन्य धर्माची तुलना करीतही त्यांनी सत्य सांगत हिंदुंना विश्वासाने जगण्याचा मार्ग दाखवला.  बहुसंख्य हिंदुना  हा मार्ग दाखवणे हे देखील खरे म्हणजे राष्ट्रीय कार्य होते. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मुक्त होणे इतकेच अभिप्रेत नाही, त्याही पुढे जाऊन ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळवायचे त्या लोकांनाही समाजधर्माचा वा राष्ट्रधर्माचा खरा अर्थ कळणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यासाठीच हिंदुंमधील धार्मिकता ही केवळ अस्मिता जागृतीसाठी होती. मुस्लीम नेत्यांतची तळी उचलण्यापेक्षा त्यांच्या समाजानेही पुढे जाऊन पोथिनिष्ठ न होता विज्ञानवादाची कास धरावी हे सागणारे सांवरकर त्यामुळेच अन्य धर्मांमधील गुणावगुणांचाही अभ्यास करून त्यावर तुलनात्मक मीमांसा करून मोकळे झाले होते. जे अन्य कोणाही राष्ट्रीय नेत्यांनी केले नव्हते. आज त्यांच्या त्या कार्याची दखल घ्यावीशी वाटते. मात्र सर्वधर्मसमभावाच्या वा तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या विचारांमधील फोलपणाही आता खरे म्हणजे अधिक स्पष्ट होऊ लागला आहे. शहरीकरणामुळे वास्तविक विविध धर्मामधील सामान्यांना जीवन म्हणजे काट, जगणे म्हणजे काय, धर्माचा नेमका उद्देश काय ते समजू लागले आहे. मात्र ते वळत नाही अशी स्थिती आहे कारण सावरकरांसारखे सुस्पष्ट नेतृत्व अभावाने दिसत आहे.

सावरकरांच्या या संबंधातील राजकीय, सामाजिक आणि तात्विक विचारांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचे विचार लोकांना समजण्यासाठी त्यांची काही विधाने, भाषणे लक्षात घेण्यासारखी आहेत. 

🔴🔴🔴

🔷🔷 ७ जुलै १९३७ मधील पुण्यात केलेल्या एका भाषणात सावरकर म्हणतात की,

🔷।। आमच्या समाजवादी मित्रांना जर्मन संस्कृती, इंग्लिश संस्कृती, फ्रेंच संस्कृती समजते, मग त्यांना हिंदू संस्कृती का समजू नये ? ती जशी राष्ट्रे आहेत त्याप्रमाणे सिंधूपासून सागरापर्यंत पसरलेले हे हिंदुस्थान हे एक हिंदुराष्ट्र आहे. आमचा देश एक आहे. आमच्या भाषा संस्कृतोत्पन्न आहेत. आमची आकांक्षा एक आहे. आचार विचारात साम्य आहे. इंग्लंडला फार तर एक सहस्र वर्षाचा इतिहास असेल. पण आमचा इतिहास प्राचीन आहे. त्याचा प्रारंभ केव्हा झाला तेही आजच्या विद्वानांना ठरविता येत नाही. या दृष्टीने आम्ही एक राष्ट्र आहोत. आजचे ज्यू जगभर फेकले गेले आहेत. त्यांना आज त्यांचा देशही उरलेला नाही. तरीही एका धर्म पुस्तकाने ते एक होत आहेत. मग आपण आपली भाषा, संस्कृती, धर्म, इतिहास आणि एक देशवासी असताना हिंदुत्वाच्या भावनेने एक का होऊ नये ?

सावरकरांनी गांधीगट वा काँग्रेस यांच्यावरच प्रखर टीकेने हल्ला केला नाही तर राष्ट्रीयत्वाची नेमकी व्याख्याच सांगम्याचा त्याद्वारे प्रयत्न केला. तसेच समाजसुधारणेचे महत्त्वही त्यावेळीच त्यांनी ओळखून त्यासाठी प्रयत्न केले ाणि समाजसुधारणेची गरज का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले मात्र, त्यांचे उद्देश, त्यांची त्यामागची भूमिका आणि धर्म, समाज आणि राष्ट्र यांचे परस्परांमधील असमारे संबंध वा नाते हे त्यांनी अचूक ओळखले होते. विशदही केले मात्र ते ना हिंदंुनी बौद्धिकदृष्टीने मनावर घेतले, ना त्यांच्या विरोधकांनीही समजून घेतले. यामुळे नुकसान या भूमीचे झाले, हे नाकारता येत नाही. समाजसुधारणेच्या आपल्या भूमिकेबद्दल कार्याबद्दल त्यांची मते यासाठी पाहाण्यासारखी आहेत. आजही ती पटू शकतात.

🔷।। समाजकारणातही लोखंडाचे चणे खावे लागतात. ते येरागबाळाचे काम नव्हे.

🔷।। हिंदुराष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण नि समाजकारण हीं दोन्हीही साधने अत्यावश्यक आहेत. राजकारण ही एका हातातील चढती तलवार; समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल. हीं दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे.

🔷।। समाजकारण राजकारणापेक्षा गौण वाटले, तरी त्यांचा निकट संबंध असल्याने समाजकारणही हाती घेणे आवश्यक आहे. कालामानाप्रमाणे सुधारणा होईल, म्हणून गप्प बसणे योग्य नाही. कारण आजच्या गोष्टी आपण कालमानाने घडल्या, असे म्हणतो. त्या त्यापूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळेच घडून आलेल्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी घडाव्या, असे आपणांस वाटते. त्यासाठी तीव्र प्रयत्नांची आवश्यकता आहे.

🔷।। पुस्तकी राजकीय चळवळीपेक्षा हे जात्युच्छेदनाचे प्रत्यक्ष कार्य अधिक महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यावाचून समाजसुधारणा अशक्य, हे निर्विवाद. तरी पण ते स्वातंत्र्य टिकविण्यासाठी समाजसुधारणेचा पाया घातला गेला पाहिजे...'

 🔷।। सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही...

🔷 ।।  अर्थात ज्याअर्थी समाजकारण हेंही हिंदुराष्ट्राच्या अभ्युत्थानार्थ एक अपरित्याज्य साधन होऊन बसलेले आहे आणि ज्या अर्थी हिंदुराष्ट्राच्या पायांत आमच्या आम्हीच ठोकून घेतलेल्या रोटीबंदी प्रभृति आम्ही अनेकवार उल्लेखिलेल्या सात 'स्वदेशी' शृंखला तोडून टाकल्यावाचून हिंदुसमाज एकजीव, एकजात, एकात्म, संघटित, प्रबळ नि प्रगत होणे दुर्घट आहे, त्याअर्थी ज्या पोथीजात उच्चनीचतेच्या मानवी जातिभेदाने ह्या सात शृंखला आमच्या हिंदुराष्ट्राच्या पायात ठोकल्या, त्या जातिभेदाचे उच्चाटन करणे हेही राष्ट्रकार्यच आहे. एक अपरिहार्य कर्तव्यच आहे.'यास्तव जात्युच्छेदक सहभोजनांचे आंदोलन हेंही एक अपरिहार्य राष्ट्रीय आंदोलनच होऊन बसलेलें आहे. कारण जन्मजात जातिभेदाचा राक्षस हा जो आज शतकोशतके त्याच्यावर होणारे सारे हल्ले परतवीत अजिंक्य ठरत आला आहे, तो मुख्यतः रोटीबंदीच्या अभेद्य दुर्गाचे बळावर! त्या रोटीबंदीच्या दुर्गावर बरोबर लागू होणारा भडिमार बाँबच्या गोळ्यांचा नव्हे, तर बुंदीच्या लड्डू गोळ्यांचा ! जे जे सहभोजन प्रकटपणे जात्युच्छेदनार्थ म्हणून घडते, त्याच्या त्याच्या धडक्यासरशी जातिभेदाच्या ह्या आजवर अजिंक्य ठरलेल्या अजस्र दुर्गाच्या तटबंदीस एकेक भगदाड पडतेच पडते; यात शंका नाही ! म्हणून आजच्या परिस्थितीत अखिल हिंदू सहभोजनातून आपल्या महार चांभार- भंगी धर्मबंधूंच्या पंगतीत गोड लाडू खाणे हेच एक कटू कर्तव्य होऊन बसले आहे खरे.

 🔷🔷 सावरकरांचे विचार इतके सुस्पष्ट होते की, त्यांनी ते वेळोवेळी सांगितले. आमच्या 'अस्पृश्य' धर्मबंधूंना धोक्याची सूचना हा त्यांचा लेख  १ सप्टेंबर १९२० रोजी श्रद्धानंदमध्ये प्रसिद्ध झाला. त्यात ते म्हणतात...

🔷।। आपल्या हिंदू समाजात जी अत्यंत अन्याय्य आणि आत्मघातकी अशी अस्पृश्यतेची रूढी पडलेली आहे, तिचा नायनाट करण्यासाठी आम्ही किती तत्परतेने झटत आहो, हे ‘श्रद्धानंदा' च्या वाचकांस तरी सांगावयास नकोच. अस्पृश्यता जी निघाली पाहिजे, ती मुख्यतः आमच्या सात कोटी धर्मबंधूंना निष्कारण पशूहूनही 'अस्पृश्य' लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे, तर आपल्या स्वतःच्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय, म्हणून निघाली पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. अस्पृश्यतानिवारणाने आज आपल्या हिंदू समाजाचे हित आहे, म्हणूनही ती निघाली पाहिजेच. पण वेळ प्रसंगी त्या रूढीपासून हिंदू समाजाचा आंशिक लाभ जरी होत असता, तरीही आम्ही तिच्याविरुद्ध इतक्याच प्रबळपणे खटपट केली असती. कारण माझ्या अस्पृश्य समजलेल्या बंधूस जेव्हा मी, तो केवळ अमक्या जातीत उत्पन्न झाला म्हणूनच, स्पर्श करीत नाही आणि एखाद्या कुत्र्यामांजरास स्पर्श करतो, तेव्हा मी मनुष्यत्वाविरुद्धच एक अत्यंत गंभीर असा अपराध करीत असतो. केवळ आपद्धर्म म्हणून अस्पृश्यता काढणे अवश्य आहे, इतकेच नाही, तर धर्माचा कोणत्याही दृष्टीने विचार केला, तरीही त्या प्रस्तुतच्या अमानुष रूढीचे समर्थन करणे अशक्य आहे, एतदर्थ धर्माची आज्ञा म्हणूनच ती रूढी नष्ट केली पाहिजे. न्यायाचे दृष्टीने, धर्माचे दृष्टीने माणुसकीचे दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे. त्यापासून आजच्या परिस्थितीत लाभालाभ काय आहेत, हा प्रश्न दुय्यम आहे. हा लाभालाभाचा प्रश्नच आपद्धर्म होय आणि अस्पृश्यतानिवारण हाच मुख्य आणि निरपेक्ष धर्म होय.

(क्रमश:)

- शल्य बोचरे

गुरुवार, १५ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - ६   

समाजाची, देशाची अचूक नाडीपरीक्षा

सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात लढाई करण्यासाठी मुस्लिमाना स्पष्ट सांगितले होते की, याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्या शिवाय आणि विरोधाल तर तुम्हाला विरोधूनही ब्रिटिशांना हाकलण्यासाठी आम्ही संघर्ष करू...  मुस्लिमांना या देशात काय स्थान असेल, ते ही त्यांनी स्पष्ट केले होते. ती भूमिका मात्र मुस्लिमांपर्यंत तळागाळापर्यंत आजही कधीच पोहोचवली गेलेली नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेता आणि भारतातील नागरिकांची- भारतीयांची सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि बौद्धिक-मानसिक स्थिती लक्षात घेता केवळ स्वातंत्र्य मिळवणे पुरेसे नाही, ही बाब स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लक्षात आलेली होती. त्यामुळेच  अंदमानाातील शिक्षेपूर्वीचे सावरकर, अंदमानातील सावरकर आणि अंदमानानंतरचे सावरकर इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरचे सावरकर हे कालागणिक अद्ययावत होत गेलेले दिसतील. त्यांचे पायाभूत विचार हे केवळ पुराणवादी हिंदुंचे नसून ते बुद्धीवादालाही स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे होते. त्यामुळेच

फोटो सौजन्य - सावरकर स्मारक
हिंदुं समाजाच्या धर्मनिष्ठेविषयी आणि त्याच्या धर्माला मानण्याच्या स्वीकारण्याच्या वृत्तीविषयीही सावरकरांना पुरती नाडीपरीक्षा झाली होती. मात्र तरीही त्यांनी प्रवाहाविरोधात जाऊन हिंदु समाजसुधारणेसाठी आपल्या रत्नागिरीच्या वास्तव्यात आणि त्यानंतरच्याही कालावधीत हिंदुसमाज अद्ययावत व्हावा यासाठी प्रयत्नपूर्वक भूमिका मांडली. स्वातंत्र्यासाठीचा लढा म्हणजे केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेली क्रांतिकारकाची भूमिका त्यांनी मर्यादित ठेवलेली नाही. त्यांनी क्रांति या शब्दाचा अर्थही पूर्णपणे जाणला होता. त्यामुळेच अंदमानोत्तर सावरकर वेगळे होते, असे म्हणणे ही अतार्किक म्हणावे लागेल. भारतात बहुसंख्य समाज हा हिंदु होता तो जैन, बौद्ध, आर्यसमाजी, आदिवासी, वैदिक अशा विविध पंथ-घटकांमध्ये विभाजिला होता. मात्र त्या समाजाकडे एकीचे बळ सुटले गेलेले होते. काळ बदलल्यानंतर कालाप्रमाणे बदल न स्वीकाल्याने समाजातील व्यवस्था जाती-जातींमध्येही अतिविकेंद्रीत झाली होती. त्यामुळेच संपूर्ण हिंदु समाजाला एकसंघटित करणे हे एक प्रकारे प्राथमिक टप्प्यातील काम पण पायाभूत होते. त्या समाजामध्ये असलेल्या कुप्रथांना, अयोग्य चालीरीतींना बाजूला करण्यासाठी श्रुतीस्मृतीपुराणोक्त विचारांऐवजी वैज्ञानिक आधार दे नव्या कालाला सामोरे जा असे सांगण्याची शक्ती ही सावरकरांनी केलेली क्रांतीच म्हणावी लागते. हिंदु सर्व एकच आहे हे सांगण्यासाठी त्यांनी रत्नागिरीत केलेले विविधांगी आणि व्यापक कार्य हे समाजाला एकाचवेळी पुढे नेण्याचा प्रयत्न करणारा झपाटा हा प्रातिनिधीक स्वरूपात होता. कारण त्यांच्यावर बंधने होती. हे कार्य करणेही स्वातंत्र्यप्राप्तीइतकेच नव्हे तर ते स्वातंत्र्यासाठी असलेल्या कामातीलच होते, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय काम करण्यावर असणारे निर्बंध सावरकरांनी या ठिकाणी अतिशय बेमालूमपणे तोडले होते, असेच स्पष्ट दिसते. पण सावरकरांचे राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर हिंदुसमाजासाठी होते.

हा समाज अनेक जाती जातींमध्ये विभागलेला होता, पारंपरिक अशा छोट्या स्तरावर मानल्या जाणाऱ्या वर्गातही उपजातींचा प्रादुर्भाव होता, स्पृश्यास्पृशता होती. ती समूळ नष्ट करण्याचा सावरकरांचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. आजकालच्या भाषेत सांगावयाचे तर मायक्रोलेव्हलला त्यांनी हात घातला होता. त्यासाठी त्यांच्या दुर्दैवाने अन्य राजकीय विचारांकडून मात्र त्यांना तेव्हा तशी साथ मिळाली नाही, ती का मिळाली नाही हा देखील संशोधनाचा विषय ठरावा. मुळात या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले काम हे बहुआयामी होते. ब्रिटिशोत्तर भारत कसा असेल, कसा असावा, याची ठाम कल्पना सावरकरांना तेव्हा आली होती. त्यामुळेच सावरकरांनी सांगितलेल्या हिंदुच्या व्याख्येनुसार असलेल्या हिंदुनाच नव्हे तर अहिंदुंबद्दलही त्यांनी या देशातील घटक म्हणूनच विचार केला होता. त्यामुळे मुसलमानांच्या मुस्लीम लीगने आपल्या मुस्लीम समाजासाठी हिंदुच्या पेक्षा अधिक मागण्या ज्या अवास्तव होत्या त्या मागितल्या तरी मुस्लीम लीगपेक्षाही मुसलमानी समाजाला सावरकरांनी योग्य ओळखले होते. त्यामुळे त्यांनी पोथिनिष्ठता सोडावी असे स्पष्टपणे सांगण्याची ताकद सावरकरांमध्ये होती. मात्र ती ताकद मुस्लीम नेत्यांकडे तेव्हा किती प्रमाणात तयार झाली होती किवां मुस्लीमांचे लांगूलचालन करणाऱ्या काँग्रेसी विचारांनीही ती ताकद का दर्शवली नाही, यातच आजही मुस्लीम समाज अनेक ठिकाणी मागासलेला दिसतो तो का, त्याचे उत्तर मिळू शकेल. सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात लढाई करण्यासाठी मुस्लिमाना स्पष्ट सांगितले होते की, याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्या शिवाय आणि विरोधाल तर तुम्हाला विरोधूनही ब्रिटिशांना हाकलण्यासाठी आम्ही संघर्ष करू...  मुस्लीमांना या देशात काय स्थान असेल, ते ही त्यांनी स्पष्ट केले होते. ती भूमिका मात्र मुस्लिमांपर्यंत तळागाळापर्यंत आजही कधीच पोहोचवली गेलेली नाही.

भारत ही हिंदुंसाठी भूमी आहे, जगात अन्यत्र त्यांना भूमी नाही, पण  मुळातच आपली स्वभूमी असूनही हिंदु समाजालाच त्याची जाणीव नव्हती.  थोडक्यात सातबारा हिंदुंच्या नावे असूनही ती जमीन हिंदुंची नाहीच आम्हीच येथील सत्ताधारी आहोत, अशा प्रकारची धारणा ब्रिटिशांनी आणि मुस्लीम नेत्यांनी करून दिली होती. बळजबरीने तशी भूमिका लादायचा प्रयत्नही चालवला होता, त्यांचा तोच प्रयत्न सावरकरांनी 'हिंदुत्व' सांगून हाणून पाडण्यासाठी कंबर कसली होती. त्यावेळच्या हिंदु मुस्लीम दंग्यांमध्ये हिंदुंसाठी मात्र वेगळा उपदेश काँग्रेसवाले देत, ब्रिटिशही वेगळा न्याय लावीत. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे सारथी पत्रकार ही महात्मा गांधीजींची भलावण करीत होते.  नौखालीतील गांधी एकटेच निर्भयतेने हिंडत होते असे आचार्य अत्रे यांनी त्यावेळी लिहिले होते. मात्र त्यावेळी लॉर्ड वेव्हेलने आपल्या जर्नलमध्ये सांगितलेली स्थिती पार वेगळी होती. तेथे गांधींसाठी आपल्या पथकातील २० उत्तम पोलीस अधिकारी तैनात केल्याचे सांगितले आहे.. अशा सर्व परिस्थितीतही सावरकरांचा हिंदु समाजावर असणारा विश्वास मोठा होता, त्यांना हिंदुंचे संघटन त्यासाठीच हवे होते. कारम हिंदु समाज हा भारतात संख्याबळानेही अधिक होता. त्याला कमी लेखून मुसलमानांचे लांगूलचालन जे विरोधी काँग्रेसजन आणि ब्रिटिश सत्ताही त्यांच्या स्वार्थासाठी करीत होते, ते सावरकरांना संपुष्टात आणावयाचे होते.  या साऱ्या स्थितीमध्ये सावरकरांची  भाषणे वा लेख यातील उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत.

🔷🔷११ ऑक्टोबर, १९३८ रोजी पुण्यामध्ये एका भाषणात  सावरकर म्हणतात...

🔷।।'हिंदुत्वाला जातीय मानणाऱ्या या काँग्रेस- राष्ट्रीयांना मला असे विचारावयाचे आहे की, तुमची मतदारांत असलेली गणना हिंदू म्हणून आहे. तुम्ही मते हिंदूंची मागता, परंतु त्यांच्या हितसंबंधांच्या रक्षणाची वेळ आली, म्हणजे मात्र हिंदुत्वाबद्दल तुम्ही नाके मुरडून राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली हिंदूंची गळचेपी करता. माझा असा सवाल आहे की, हिंदुत्वाची जर तुम्हांला इतकी चीड असेल, तर तोपर्यंत हिंदू म्हणून स्वत:चे वर्णन केल्याविना जोपर्यंत स्वतःच्या निवडणुकी होत नाहीत, तुम्ही निवडणुकीला उभे का राहता ? '

🔷२३ मार्च, १९३९ या दिवशी बिहार प्रांतीय हिंदुसंमेलन मुंगेर येथे भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर म्हणतात...

🔷।। जे लोक हिंदुधर्माला भ्रममूलक समजतात, त्यांनी मुसलमान, ख्रिस्ती, आदी धर्मांनाही भ्रममूलक म्हटले पाहिजे. परंतु तसे कोणी म्हणत नाही... '

🔷🔷३१ जुलै, १९३७ रोजी पुण्यात पुरोगामी विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानपत्र दिले.  त्यात एस. एम. जोशी, भाऊ फाटक होते. त्यावेळी   'सावरकरांची आजची राजकीय मते आम्हांस मान्य नाहीत. आम्हांस १९०८ चे सावरकर मान्य आहेत. ते आम्हांला पाहिजेत. त्यांची आजची हिंदुसंस्थानिकांसंबंधीची भूमिका आम्हांला पटत नाही. हिंदू हे हिंदू ह्या नात्याने संघटित होऊन राजकारणात एक प्रभावी शक्ती म्हणून कार्य करू शकतील, असे आम्हांस वाटत नाही... असे फाटक म्हणाले होते.  हिंदूंनी एकत्र येऊन मुसलमानी आक्रमणाला तोंड द्यावे, एवढे फक्त त्यांना खटकत होते. उत्तर देताना सावरकर म्हणाले...

🔷 ।।'... धर्म ही अफूची गोळी वाटत असेल, तर टाकून द्यायला मी केव्हाही सिद्ध आहे. पण हा न्याय केवळ हिंदू धर्माला लावून चालणार नाही. तो सर्व धर्मांना लावा. हे माझे मत तुम्हांला मान्य नाही काय?'

🔷🔷 कर्णावती - अहमदाबाद येथे डिसेंबर १९३७ मधे हिंदुमहासभेच्या वार्षिक अधिवेशन  सावरकर म्हणाले होते...

🔷।। '... आम्ही एक राष्ट्र नाही, असे म्हणणारे काही पंडित ग्रेट ब्रिटन, रशिया, अमेरिका, जर्मनी ह्यांना मात्र एक राष्ट्र म्हणून मान्यता देतात. ह्या राष्ट्रांतही अंतर्गत विभेद आहेतच. पण त्या अंतर्गत विभेदांपेक्षा बाह्य जगांपेक्षा त्यांच्यांत जी एकात्मता आहे आणि शेजाऱ्यांपासून उठून दिसणारा जो बेगळेपणा आहे, त्यामुळे ही जशी एकेक राष्ट्र म्हणून ओळखली जातात, त्याच न्यायाने हे हिंदुराष्ट्री स्वयंमेव एकराष्ट्र आहे. शतावधी वर्षांपासून आमचा धर्म, आमची संस्कृती, भाषा, लिपी एक आहे.

🔷🔷कोणता धर्म शांतताप्रिय आहे ? या २७ जानेवारी, १९२७ च्या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात...

🔷।। बॅरिस्टर अमीन यांचे दिल्लीचे अत्यंत उद्दाम भाषण गांधीजींनी वाचले नसेल असे थोडेच आहे! परंतु त्याबद्दल त्यांच्या मुसलमान संबगड्यांबरोबरच त्यांनी मौन स्वीकारून 'संख्याबलामध्ये काय आहे' अशी चर्पटपंजरी चालविली आहे. मुसलमानांना अशा वेळीही स्पष्ट इशारा देण्याचे नैतिक धैर्य गांधीजींना स्फुरत नाही व एखादा तेजस्वी आर्यसमाजी या प्रकारच्या मुसलमानांच्या चवचाल बढाईस उत्तर देऊ लागला, म्हणजे मात्र त्या आर्यसमाजावर एखाद्या मारक्या पंतोजीप्रमाणे चिडखोरपणे आपल्या लेखणीची छडी उगारून तुटून पडण्यात त्यांना मोठा पुरुषार्थ वाटतो, हेच शल्य हिंदू लोकांच्या मनांत बोचत असते. गांधीजी महात्मे आहेत व म्हणून पक्षपातातीत आहेत हे आम्हांला कळते. परंतु स्वजातीकडे झुकणे याला जसे पक्षपात हे नाव आहे, तसे परज्ञातीकडे झुकणे यालाही पक्षपात हेच नाव शब्दकोशामध्ये आहे. यावर उपाय केला, सर्व काही सुयंत्र होणार आहे. इस्लाममध्ये जे शांततेचे,  सहिष्णुपणाचे, भूतदयेचे उपदेश महात्माजींना अवगत आहे. ते वास्तविक महात्माजींनी मुसलमानांना 'यंग इंडिया 'मधून शिकविले पाहिजेत व त्यांचे पट्टशिष्य अल्लीबंधू यांच्याकरवी खिलाफतीवर जशीं व्याख्याने झाली, तशी इस्लाममधल्या शांतीच्या मंत्रांवर व्याख्याने करविली पाहिजेत. मुसलमानांना राष्ट्रीयवृत्ती शिकविण्याकरिता प्रसंगी कडू, परंतु अंती गुणकारी असे बोध केले पाहिजेत. परंतु हे सर्व सोडून, ज्या वेळी ते गुळमुळीत बोलू लागतात व हिंदूंनाच निष्कारण दोषी धरतात, मुसलमानांच्या कोहाटसारख्या सर्वापराधांची निश्चिती झाली असूनही ती ज्या वेळी ते मौन स्वीकारतात, त्या वेळी निश्चयाने व निकराने सांगणे आम्ही कर्तव्य समजतो की, हे निदान चुकीचे आहे व खऱ्या कलहाचे कारण अन्यत्र आहे.

🔷🔷'संख्याबळ हेही वळच आहे !!' या १७ फेब्रुवारी, १९२७ च्या लेखात सावरकर म्हणतात...

🔷।। 'आम्हांस गुणबळ तर हवेच आहे; पण आम्हांस संख्याबळही हवे आहे. आमचे हिंदू राष्ट्र आम्ही संख्येनेही घटू देणार नाही; गुणानेही घटू देणार नाही. अस्पृश्यतानिवारण आणि शुद्धी या दुहेरी साधनांनी आम्ही आमचे संख्याबळही बाढवू आणि गुणबळही वाढवू. आणि केवळ गुणबळ पंगू आहे, केवळ संख्याबळ अंध आहे, हे सामाजिक सत्य तुमच्यापेक्षा आम्हांस पक्केपणी कळले आहे. 'नुसत्या संख्याबळात काय आहे हे शहाणपण आम्हांस शिकविण्याची तसदी आपण घेऊ नये. अगदी राहवतच नसेल, तर ते शहाणपण मुसलमानादिक आपल्या भाईबंदांना जुम्मा मशिदीत जाऊन - शिकवा. त्यांस त्याची खरोखर फार आवश्यकता आहे. अर्थातच जुम्मा मशिदीची पायरी, हें शहाणपण शिकविण्यासाठी, चढण्याचे धैर्य तुम्हांस होत असेल, तर !!

राजकीय दृष्टीने सावरकरांनी सांगितलेली ही विधाने, प्रतिपादने सावरकरी विचारांचा स्पष्टपणा येथे दाखवून देतात. सावरकर इतक्यावरच थांबलेले नाहीत तर हे सर्व करताना सामाजिक सुधारणांबद्दल त्यांनी केलेले कार्य हे खरे हिंदु समाजामध्ये घडवलेली क्रांतीच आहे. ती सविस्तर पाहावी, विचार करावी आणि सावरकरांबद्दल केले गेलेले अपप्रचार त्यातूनच संपुष्टात येऊ शकतील. अर्थात ही बाब तार्किकतेने विचार करणाऱ्या आणि पूर्वग्रह न ठेवता तटस्थपणे गांभीर्याने विचार करणाऱ्यांना समजू शकेल. सावरकर हे यातूनही बुद्धिवादाला आणि व्यक्तिस्वातंत्र्यालाही किती महत्त्व देत होते, ते देखील त्यांच्या त्या कामांमधूनही दिसून येईल. आणि त्यातूनच त्यांच्या  हिंदुसमाजाच्या नाडील परीक्षेचीही नक्कीच कल्पना येऊ शकेल.

(क्रमश:)

- शल्य बोचरे

बुधवार, १४ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - ५   

आधुनिक समाजधारणेचा तत्त्ववेत्ता 

सावरकरांची मानवी समाज या विषयी असणारी धारणा स्पष्ट होते. जी ऐहिक आहे, पारलौकिकत्वाला चांगलाच छेद देणारी आहे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीला प्रोत्साहन देणारी आहे. सावरकरांचा हा दृष्टिकोन पाहिला की, त्या काळात त्यांनी तो मांडला आहे, ते लक्षात घेता आजचा भारतीय, आजच्या काळातही त्यांच्या संकल्पनेतील समाजधर्माला आणि देशधर्माला जागत आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. नव्या आधुनिक समाजाची धारणाच त्यांनी त्या काळात सांगितली होती, हेच सावरकरांचे वैशिष्ट्य आणि द्रष्टेपण होते.

सावरकरांच्या संबंधात तत्वज्ञान, धर्म, संस्कृती, पोथिनिष्ठता, लौकिक आणि पारलौकिक, वास्तवता, चिकित्सक, अशा विविध घटकांबद्दल आतापर्यंत विचार केला. मात्र तरीही सावरकर हे व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार- तत्त्वे संपत नाहीत. याचे कारण त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे, सक्षमतेने समाजजीवनाचा आणि मानवतेचा विचार केला. युरोपातील ऐहिक सुखे, सधनता, विज्ञानवादी दृष्टी याची तुलनाही त्यांनी वेळोवेळी भारतासंबंधात भविष्याचा विचार करीत केली आणि भारताला सबळ करण्यासाठी त्यादृष्टीने मार्गदर्शन केले. केवळ हिंदुंच नव्हे तर एकंदर भारतातील विविध धर्म व्यवस्थेच्या आहारी गेलेल्या समाजाला नवकालाकडे पाहाण्याची दृष्टी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शनच केले. राजकीय व्यासपीठ असो की तात्विक, तार्किक विचार असो, धार्मिक असो की भविष्यगामी विचार असोत सावरकरांच्या दूरदृष्टीचा लाभ अद्यापही भारतीय समाजाने घेतलेला नाही.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, क्रांतिकारी हालचाली करीत ब्रिटिशांच्या मनात सावरकर नावाची भीती निर्माण केली. पण केवळ स्वातंत्र्य मिळवणे इतकेच त्यांच्या लेखी नव्हते, तर स्वातंत्र्यानंतर एक राष्ट्र निर्माण होणार आहे, ते कसे असले पाहिजे, याचा जगातील विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आराखडा सातत्याने सादर केला. त्या काळात सध्यासारखी अतिप्रगत दळणवळणाची साधनेही नव्हती की, गूगलसारखे आंतरजालसंलग्न माहिती प्रसारक, माहिती शोधन यंत्रही नव्हते. अशा काळात मानवतेला महत्त्व देत, उपयुक्ततावाद, विज्ञानाचे महत्त्व आणि यंत्राची, यंत्रयुगाची वाढ अशा सर्व पार्श्वभूमीवरही जग जात असताना भारतात हिंदु-मुस्लीम वादामुळे झालेली अनेक स्तरावर झालेली बौद्धिक पीछेहाट त्यांना मानसिक धक्का देणारी वाटली होती. ब्रिटिशांचा कावा यामागे असला तरीही लोकांनी समाजनिष्ठता स्वीकारत विज्ञानायुगाला सामोरे जात धर्माचा खरा अर्थ सांगत पोथिनिष्ठा बाजूला सारा असे सांगणारा एकमेव राजकीय नेता सावरकर हाच होता. अद्ययावत होण्यासाठी तळमळून समाजाला सांगतानाच मुस्लीम लीगच्या अतिरेकी धार्मिक भूमिकेला विरोध करीत काँग्रेसच्या मुस्लीमलाचारीला सतत विरोध करून बहुसंख्य हिंदुंना अद्ययावत करण्यासाठी आणि त्याच बरोबर मुस्लीमांनीही पोथिनिष्ठा सोडून विज्ञानवादी दृष्टीची कास धरावी  असे सांगणारा मुस्लीमेतर नेताही सावरकरच होते. मात्र त्यांच्या आधुनिक विचारांना स्वीकारण्याची मानसिक क्षमताच तेव्हा समाजाच्या सोडा पण तत्कालीन अन्य नेत्यांमध्येही नव्हती, हेच दुर्दैव म्हणावे लागते. आज ती स्थिती काही बदलली आहे का, त्याचा विचार आजच्या समाजानेच करावा कारण काही का होईना  तो साक्षर तरी बनला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सावरकरांच्या विविध वैचारिक वैशिष्ट्यांचा आढावा घेत त्यांच्या विचारप्रणालीचा वा तत्त्वज्ञानाचा मागोवा घेता येतो. त्यांच्या विविध साहित्य प्रकारांमधून हे दिसून येते. निबंध, आत्मचरित्र, काव्य, भाषणे इतकेच नव्हे तर पत्रांमधून आणि निवेदनांमधूनही सावरकरांची ही सारी वैशिष्ट्ये प्रतीत होत असतात.

सावरकरांच्या आयुष्यातील टप्पे पाहिले तर आस्तिक असणारे सावरकर साधारण वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत त्यादृष्टीने विचार करीत होते. त्यानंतर अनुभवामुळे त्यांच्या मनातील धर्म वा ईश्वरी भावनेबद्दल भक्तीभाव  हा बुद्धिवादी दृष्टीने बदलू लागला. अर्थात तरीही त्यांनी पोथ्यांना बाजूला करा असेे सांगतना त्या कपाटात ठेवा, आदरभावाने वाचा असे मानत भगवंताचे अधिष्ठान वेगळ्या रूपात स्वीकारले. धर्म आणि तत्त्वज्ञान यामध्ये असमारी विसंगीत त्यांनी हेरली त्यांच्या बुद्धिने स्वीकारलेले तत्त्व, विज्ञानाचा पाया स्वीकारीत स्वीकारलेली वास्तववादी दृष्टी ाणि त्यातूनच अद्ययावत होण्यासाठी राष्ट्र वा देश या संकल्पनेला देवत्व देत त्या संकल्पनेला सुधारण्यासाठी समाजसुधारणेचा क्रांतिकारी मार्गही त्यांनी स्वीकारला. त्याचा प्रत्यय रत्नागिरीतील त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळात येतो. तो इतका व्यक्तीवादाला सामोराही जाणारा आहे की, अन्य व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यालाही त्यांनी तेथे कायम ठेवीत, आपले ध्येय त्यांच्यापुढे मांडले. प्रसंगी आपल्याच समाजातून टीका, आरोप, सहन केले. पण हे सारे त्यांनी देशधर्माच्या स्वातंत्र्यासाठी. किंबहुना स्वातंत्र्य हाच धर्म त्यांनी मानल्याने व्यक्तिस्वातंत्र्यही त्यांना अचूक उमगले होते आणि धर्मभावनेला त्यांनी वेगळा आणि स्वतंत्र आयाम दिला. त्यांची अनेक विधाने यादृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहेत.

🔷।। ज्या सत्याने मनुष्याचे एकंदरीत कल्याण साधते ते सत्य.

🔷।। ऐहिकावाचून पारलौकिक पंगू आहे

🔷।। मनुष्य जातीचे हित हेच सर्व सद् गुणांचे समर्थन.

🔷।।  पारलौकिक प्रकरणी नाना क्लुप्ती सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ आपौरुषेय वा इश्वरदत्त नसलून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत.. त्यामुळे क्लृप्ती प्रमाणहीन असल्याने त्याना सनातन धर्म असे म्हणता येणार नाही.

🔷।। मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रिती, निर्बंध हे त्यास जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरवले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत.

🔷।। धर्मसंस्कारात ज्या ज्या क्रिया धार्मिक म्हणून चिरस्थायित्व पावतात, त्या बहुधा त्या त्या काळचा इतिहास असतात. भूगर्भित स्तरांतून जशी त्या त्या काळची सृष्टिस्थिती नि समाजस्थिती चिरेबंद करून टाकलेली असते, तसेच धार्मिक संस्कारांतून त्या त्या काळचे ज्ञान नि अज्ञान अस्थि - स्थिर  चिरेबंद नि चिरंतन करून ठेवलेले असते.

धर्मग्रंथात श्रद्धा ठेवणारा माणूस कसा आहे तर तो एका दूरध्वनी यंत्रासारखा आहे, असे सावरकर सांगतात. ते या अनुषंगाने म्हणतात...

🔷।। शब्दप्रामाण्य हेच जिथे धर्मनिर्णयाचे साधन, तिथे लहानपणी अंकाच्या काळात 'कुराण हाच धर्म' हे गुणगुणले की तो मुसलमान, 'बायबल हाच धर्म ' हे पटविले की तो जन्माचा ख्रिस्ती ! कुराण खरे की बायबल, की वेद हे त्याला स्वत: तोलून पाहण्याची सोयच नाही. ....

ज्या मनुष्याला धर्माचे नुसते एक दूरध्वनियंत्र बनायचे नसेल, माणूस म्हणून स्वतःचे बुद्धिनिष्ठ मत हवे असेल, त्याने शब्द निष्ठेला  उच्छेदून वेदअवेस्ता बायबल कुराण हे सारे आदरणीय नि अभ्यासनीय पण निव्वळ मनुष्य कृत ग्रंथ आहेत, असे ठाम ठरवून, त्यास इतर कोणत्याही मनुष्यकृत ग्रंथाप्रमाणेच सादर अभ्यासावे. जे जिथे आजच्या विज्ञानाच्या कसोटीस उतरेल ते तेथून घ्यावे; जे आज मनुष्यहितसाधक ते आचरावे; जे अनुभवांती आज टाकाऊ, अडाणी, बुद्धिशून्य ठरते ते साफ सोडावे.

🔷।।  धर्मछाप एखाद्या भावनेवर पडला की, ती आंधळी होते आणि तिच्या प्रकरणी मनुष्य प्रज्ञाहत झालाच म्हणून समजावे ! मग तो हिंदु असो, मुस्लीम असो, वा ख्रिश्चन वा यहुदी ! तिथे बुद्धिविजय संपून भक्तिविजयाचा अध्याय लागलाच म्हणून समजावे

सावरकरांची ही विधाने पाहिली की, त्यांच्या देवधर्माविषयीच्या कल्पना स्पष्ट होतात आणि त्यांच्या मानवी समाज या विषयी असणारी धारणाच स्पष्ट होते. जी ऐहिक आहे, पारलौकिकत्वाला चांगलाच छेद देणारी आहे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीला प्रोत्साहन देणारी आहे. सावरकरांचा हा दृष्टिकोन पाहिला की, त्या काळात त्यांनी तो मांडला आहे, ते लक्षात घेता आजचा भारतीय, आजच्या काळातही त्यांच्या संकल्पनेतील समाजधर्माला आणि देशधर्माला जागत आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. नव्या आधुनिक समाजाची धारणाच त्यांनी त्या काळात सांगितली होती, हेच सावरकरांचे वैशिष्ट्य आणि द्रष्टेपण होते.

(क्रमश:)

-  शल्य बोचरे  

मंगळवार, १३ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - ४  

वास्तवतेला स्वीकारणारे सावरकर
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

सावरकरांचा विचाराच्या दिशेतूनच त्यांच्या बुद्धिवादाचे सत्त्व समजून येते. देव या सर्वसामान्य संकल्पनेपेक्षा त्यांचा ‘देव’ वेगळा आहे. त्या देवाची ‘पूजा’ ही देखील वेगळी आहे. ते वास्तवाला, प्रतिकूलतेलाही सामोरे जाऊन आव्हानांना तोंड देणारे व्यक्तिमत्त्व आहे. आव्हानांना मोडीत काढणारे त्यांचे वैचारिक रूप हे वास्तववादाच्या तत्त्वाला स्वीकारणारे आहे.

वास्तवतेला स्वीकारण्याचा, वस्तुस्थितीला सामोरे जात, वस्तुस्थितीचे आव्हान स्वीकारण्याचा आणि त्या वस्तुस्थितीला वैज्ञानिकदृष्टीने, तारतम्याने समजावून घेत विचार मांडण्याचा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू हे केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या स्वातंत्र्यवीराचेच नव्हते तर प्रखर वास्तववादी होते. बुद्धिवादी दृष्टीकोनातून जुन्या कल्पनांना बाजूला सारत, त्यातील तथ्ये पडताळून मगच ती स्वीकारायची की नाहीत ते सांगणारे तत्त्वनिष्ठ असे हे व्यक्तिमत्त्व होते. सावरकर हे केवळ या कर्मकांडाने भरलेल्या हिंदु धर्माभोवती पिंगा घालणारे नव्हते तर हिंदु या शब्दाला नवा आयाम प्राप्त करून देत हिंदु हा शब्द- संकल्पना; अद्ययावत आणि नव्या कालाला सामोरे जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचे जनकच त्यांना म्हटले पाहिजे. किंबहुना आजही धर्म- रितीरिवाज, कर्मकांडे याच्याभोवती किंवा चमत्काराभोवती वा आमच्या पंरपरेत विज्ञान कसे होते, यासाठी अट्टाहासाने काही सिद्ध करण्याच्या आवेशाने काम करणाऱ्या आणि तो भारतातील प्राचीन हिंदु धर्म म्हणून सांगत फिरणाऱ्या हिंदुंना सावरकरांचे हिंदुत्व पूर्ण समजलेले आहे, असे म्हणता येत नाही. सावरकरांचे हिंदुत्व हे मुळात आज हिंदुत्व हा शब्द राजकारणी, हिंदु संघटनांचे अग्रणी म्हणवणारे नेते, प्रतिनिधी, इतकेच नव्हे तर संन्यासी म्हणवून घेणाऱ्या काही अशाच अग्रणींना  हिंदुत्व न कळलेल्या गटात समाविष्ट करावे लागेल. ज्याप्रमाणे सावरकरांवर भलतेसलते आरोप वा टीका करणाऱ्यांना सावरकर समजलेच नाहीत तसेच सावरकरांना आपले म्हणणाऱ्यांनाही सावरकर झेपले नाहीत, असेच अनेकदा दिसून येते. तरुणपिढीने यासाठीच सावरकरांचा बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, त्यांचा वास्तववादी दृष्टिकोन, त्यांचा हिंदुनिष्ठ राष्ट्रधर्म सतत काळाबरोबर राहाण्याचा अद्ययावत राहाण्याचा विचार याबद्दल वाचून, अभ्यास करून सावरकर समजून घेतले पाहिजेत.

विश्व आणि विश्वाचा देव या संबंधात सावरकर काय म्हणतात ते पाहाण्यासारखे आहे. ते म्हणतात...

🔷।। विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही; फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे. असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेवून त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरीखरी तीच पूजा ! 

सावरकरांचा या विचाराच्या दिशेतूनच त्यांच्या बुद्धिवादाचे सत्त्व समजून येते. देव या सर्वसामान्य संकल्पनेपेक्षा त्यांचा ‘देव’ वेगळा आहे. त्या देवाची ‘पूजा’ ही देखील वेगळी आहे. ते वास्तवाला, प्रतिकूलतेलाही सामोरे जाऊन आव्हानांना तोंड देणारे व्यक्तिमत्त्व आहे. आव्हानांना मोडीत काढणारे त्यांचे वैचारिक रूप हे वास्तववादाच्या तत्त्वाला स्वीकारणारे आहे.

अलीकडच्या काळात हिंदु, हिंदुत्व याची मनमानी व्याख्या करीत वा प्रचलित राजकारण आणि राजकीय वा तत्संबंधित संघटना यांच्याशी संलग्न असलेल्या व्यक्ती, त्यांचे विरोधक वा टीकाकार इतकेच नव्हे तर त्या राजकारण, संघटना यांचे प्रतिनिधी- अनुयायी हे देखील  हिंदु- हिंदुत्व सांगत आहेत, त्याचा आणि सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेचा दुरान्वयानेही संबंध नाही. इतकेच कशाला त्यांच्या संबंधात (विरोधक वा टीकाकार आणि तथाकथित अनुयायी) तत्त्वज्ञान असा शब्दही वापरणे अयोग्य आहे, इतके सावरकरांचे विचार हे मूलगामी, वास्तववादी आहेत.

प्रचलित हिंदुत्व, त्यातील चातुर्वर्ण्य, त्यातील जातिव्यवस्था, त्यातील रुढ- रिती रिवाज या सावरकरांच्या हिंदुत्वाचा भाग नाहीत. सात बेड्या जशा त्यांनी तोडल्या त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पोथिनिष्ठ धर्माला, पोथ्यांना कपाटात ठेवून देणेच इष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळेच सावरकरांच्या धर्माला पोथी नाही, त्यांचा हिंदु हा भूमिनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून आणि विविध ऐतिहासिक आक्रमणातून मुक्त करण्यासाठी उभारलेला तसेच अशा प्रकारच्या आक्रमणाने शहाणा होऊन राष्ट्र संकल्पनेला सामोरा जाणारा हिंदु आहे. या हिंदुंच्या जाणीवा आक्रमणातील विविध भीतींपासून नव्या अद्ययावत विज्ञानवादाला सामावून घेणाऱ्या असाव्यात तसेच अहिंदुंनाही सामावून घेत राजकीय शहाणपणातून राष्ट्र संकल्पनेला, मानवतेला समजून आतापर्यंत झालेल्या आक्रमणासारख्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सिद्ध होणाऱ्या असाव्यात अशीच सावरकरांच्या हिंदुची धारणा आहे. हीच त्यांच्या हिंदुत्वाच्या एकसंघटितपणाची शक्ती आहे. ती शक्ती आम्हाला कळली आहे का, याचे चिंतन होणे गरजेचे आहे.

ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय? या निबंधात समर्थ रामदास स्वामींच्या ... सामर्थ्य आहे चळवळीचें। जो जो करील तयाचें। परंतु तेथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।

या चरणाचा उल्लेख केला आहे. केवळ उल्लेख केलेला नाही, तर त्यातून प्रचलित अर्थ सांगत त्याला विरोध न करताही त्यांनी त्याची फोड करीत ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे नेमके काय असते, याचे विवेचन अतिशय तार्किक आणि बुद्धिवादी पद्धतीने केले आहे. या निबंधात महाराष्ट्राच्या इतिहासाचे जसे विवेचन आहे तसेच त्यातून आपण काय शिकावयाचे त्याचेही सुंदर सूत्र त्यांनी मांडले आहे. त्यात ईश्वर येतो, धर्म येतो, धर्मवेड येते, मुस्लीम अत्याचाराचे वर्णन येते, आपल्या उणीवाही येतात अशा विविधांगी तपशीलांमधून सावरकर ईश्वर आणि त्याचे अधिष्ठान समजावून सांगतात तोच खरा वास्ववादाला सामोरे जाणारा विचार असल्याचे प्रचलित हिंदुने ध्यानात घ्यायला हवा. या निबंधातील विवेचनातून सावरकरांच्या हिंदुत्वाचे वैचारिक आणि वास्तववादी अधिष्ठान नक्कीच प्रत्ययास येऊ शकते.

(क्रमश:)

- शल्य बोचरे 



सोमवार, १२ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - ३  

बुद्धिवादातून सूक्ष्मविज्ञानाकडे

धर्मासारखा एक महत्त्वाचा घटक माणसाने निर्माण केलेला आहे. त्याचा अर्थ सावरकरांनी अतिशय अचूकपणे मांडला आहे. चमत्कार आणि चमत्कृती यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळेच देवाबद्दलच्या लोकांच्या कल्पनांना ते तडा देणारे बोलतात, सांगतात. यामागे त्यांचा हेतू अतिशय सुस्पष्ट आणि ऐहिकतावादाकडे झुकणारा आणि लौकिकताही नीट उमजून घेणारा आहे. याचे कारण पारलौकिक प्रकार त्यांना अधिक सूक्ष्मपणे समजलेला आहे. त्यातूनच ते आपले हिंदुत्व साकारताना या सर्व आपल्या तत्त्वज्ञानाला आणि तार्किकतेला समांतर असेच भूमिनिष्ठ समूहजीवनाला साकारताना दिसतात. 

प्रत्यक्ष जीवन जगताना माणसासमोर असणारे सत्य स्वीकारण्याची ताकद स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होती. किंबहुना मानवतेबरोबरच जीवन जगण्याची ऊर्मी विविधांगांनी तयार होत असते. यामध्ये धर्मासारखा एक महत्त्वाचा घटक माणसाने निर्माण केलेला आहे. त्याचा अर्थ सावरकरांनी अतिशय अचूकपणे मांडला आहे. चमत्कार आणि चमत्कृती यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळेच देवाबद्दलच्या लोकांच्या कल्पनांना ते तडा देणारे बोलतात, सांगतात. यामागे त्यांचा हेतू अतिशय सुस्पष्ट आणि ऐहिकतावादाकडे झुकणारा आणि लौकिकताही नीट उमजून घेणारा आहे. याचे कारण पारलौकिक प्रकार त्यांना अधिक सूक्ष्मपणे समजलेला आहे. त्यातूनच ते आपले हिंदुत्व साकारताना या सर्व आपल्या तत्त्वज्ञानाला आणि तार्किकतेला समांतर असेच भूमिनिष्ठ समूहजीवनाला साकारताना दिसतात. सर्वसाधारणपणे वैदिक हिंदु धर्माला मानणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून धर्माच्या नावाने जीवन जगण्यास सांगणाऱ्या नियमांच्या समुच्चयाला स्वीकारणाऱ्या हिंदुधर्माचा, भारतातील अन्य विविध उगम पावलेल्या धर्मकल्पनांना स्वीकारून जीवन जगणाऱ्या पारलौकिक स्तरावर धर्म मानून तो ऐहिक जीवनात कर्मकांडाद्वारे उतवणाऱ्या संकल्पनेला म्हणजेच त्या धर्माचा आणि हिंदुत्वाचा तसा काही संबंध नाही. किंवा सावरकरांचे हिंदुत्व हे सामान्यपणे लोक मानत असलेल्या वैदिक- वेदप्रामाण्य मानणाऱ्या वा न मानणाऱ्या पारंपरिक हिंदुधर्माला कर्मकांडाने स्वीकारणारे नाही. ते हिंदुत्व हे भूमिनिष्ठ समाजाला एकीकृत करण्यासाठी त्यांनी मांडले आहे. धर्म म्हणून लोकांनी काय स्वीकारावे, त्याबद्दल म्हणजे वैदिक धर्माचे, भारतात निर्माण झालेल्या ज्या तत्त्वज्ञानावर आधारित जे धर्म, पंथ आहेत त्या आधारे जगण्याचे नियम सांगणारे सावरकरांचे हिंदुत्व मार्गदर्शक नाही. त्यांचे हिंदुत्व हे त्यांनी मांडलेल्या व्याख्येनुसार दिलेल्या भूभागातील रहिवास असलेल्या या भूमीमध्ये निर्माण झालेल्या धर्मांच्या एकत्रित जगत असेल्या समूहाला म्हणजेच हिंदुस्थानातील या व्यक्ती समूह, पंथ यांचे एकत्र आणून, बळकट समाजाभिमुख करण्यासाठी आहे. या भूभागाला असणारे वैशिष्ट्य हे राष्ट्र म्हणून कसे स्वीकारावे ते सांगणारे आहे. त्यासाठी ते इतिहासातील विविध घटनांचा मागोवा घेत, माहिती देत या हिंदुराष्ट्रातील वा या भूभागातील एकत्रित जीवन जगणाऱ्या आणि त्या भूभागात निर्मिलेल्या पंथ, धर्म, गट, विचार यांना धरून- त्यांनी मांडलेल्या जीवनपद्धतीला स्वीकारणाऱ्यांना ते हिंदु म्हणतात. त्यांचा इतिहास सांगताना तो देदिप्यमान होता, पराभूतांचा नव्हता, असे सांगत सावरकर हिंदुना जागृत करीत ते ज्वालामुखीप्रमाणे धगधगत्या स्वरुपात सामावू पाहातात. याचे कारण त्यांना हिंदु संघटन करण्यासाठी कोणत्याही वेदाधिष्ठित समूहाची, वैदिक- अवैदिक तत्त्व धरून श्रुतिस्मृति पुराणोक्त  कर्मकांड वा नियमावलीची, धर्म नीतीची गरज भासत नाही. त्यांना हिंदु संघटन करण्यासाठी या भूमिनिष्ठांमधील भूमीप्रती असणारी संवेदना, चेतना, जाणीव, संवेदना कालानुसार जागवायची होती. त्यांचा हा हिंदुत्व धर्म आहे. जो हिंदुत्व धर्म भूमिनिष्ठ आहे आणि कालानुसार मार्गक्रमण करणारा म्हणजे कालाप्रमाणे जगणारा आहे. यामुळेच सावरकर हे गृहितक मांडून तर्कशास्त्राच्या आधाराने मनुष्य आणि सृष्टी यांचा संबंधही ज्या प्रकारे मांडतात, त्या प्रकाराला जातीय नव्हे, प्रचलित  अशा हिंदु संकल्पनेनुसार मांनलेल्या हिंदुधर्मानुसार - तत्त्वज्ञानानुसार नव्हे तर बुद्धिवादाला आधारभूत ठेवून आहे. त्यातून सूक्ष्मविज्ञानालाच त्यांनी स्वीकारले आहे. अशा बुद्धिवादी पद्धतीला आपण अजूनही समजून घेतलेले नाही. मानवतावाद, विज्ञान, प्रत्यक्षानुभूती घेण्याची तळमळ, तर्कशास्त्राला स्वीकारून जीवनपद्धती ठरवण्याचे त्यांचे दिग्दर्शन हे महत्त्वाचे ठरते.

सावरकर विश्व आणि निसर्ग यांचा संबंध अतिशय तार्किकपणे समजावून देतात, ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’  या निबंधामधून सावरकरांची ही तार्किक विचारसरणी सहजपणे दिसते. विश्व आणि मानव यांचा संबंध हा तसे म्हणजे गहन आणि क्लीष्ट विषय आहे. मात्र अध्यात्म तो ज्या पद्धतीने मांडतो त्यापेक्षा सावरकर हा तर्काधिष्ठित बुद्धिवादी मांडणीने तो समजावतात. मात्र तो आपल्याला झेपत नाही. कारण ते सत्य आहे आणि ते स्वीकारण्याची तयारी आपली हवी, असेच म्हणावे लागते. विश्व आणि मनुष्य यांच्या संबंधात सावरकरांचे विचार जहाल, प्रखर, बुद्धिवादी आहेत की ते आपल्याला स्वीकारता येतील का, ते खरोखरच ठरवावे लागेल. इतके ते बुद्धिवादाला स्वीकारून वास्तवतेची धग देणारे आहेत. सावरकर म्हणतात...

🔷।। कोणत्या हेतुने वा हेतुवाचून हे जगव्याळ विश्व प्रेरित झाले आहे, हे मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही.

🔷।। देवाने हे सारे विश्व मनुष्यास मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखासाठीच निर्मिले आहे, ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे.

🔷।। जशी कीड, मुंगी, तशाच ह्या अनादि अनंत कालाच्या असंख्य उलाढालीत, हा मनुष्यही एक अत्यंत तुच्छ परिणाम होय. त्याला खायला मिळते म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत, कोथिंबीर खमंग झालेली नाही. धान्य पिकते म्हणून तो खावू शकतो, इतकेच काय ते. पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता, तेव्हाही नद्या वाहतच होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्यावाचूनच काय पण, पृथ्वी नव्हती तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता, आणि हा सूर्यही जरी त्याच्या साऱ्या ग्रहोपग्रहा सुद्धा हरवला तरी, एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेले वाटते तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. विश्वाच्या देवाला एक पलाचेही सुतक, असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरु लागले तरी, धरावे लागणार नाही.

🔷।। ज्या कोणत्या हेतुने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगद्व्याळ चालू आहे, तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या मापाने मोजता यावे, इतकें नि इतक्या सोयी उपभोगिता येतात, हा मात्र आणि एवढाच काय तो विश्वाचा देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर या विश्वाची रचना त्या विश्वाच्या देवानें केली असती तर, त्याचा हात कोण धरणार होता ? हे सुगंध, हे सुस्वर, हे सुख स्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि या सोयी आहेत, त्याही अमुप आहेत. ज्या योगायोगानें मनुष्यास या सर्व लाभत आहेत, त्या योगायोगाला शतशः धन्यवाद असोत !

🔷।। विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही; फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे. असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेवून त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरीखरी तीच पूजा !

सावरकरांची ही सारी विधाने पाहाता त्यांचा केवळ बुद्धिवादच नव्हे तर देव, देवाची पूजादी कर्मे तसेच निसर्ग आणि त्याविषयीची कृतज्ञतेची जाणीव आणि अतिशय सखोल-सूक्ष्म चिंतन यातून त्यांनी समाजाला, हिंदुभूमीतील हिंदुंच नव्हे तर एकंदर मानवालाच चेतवण्याचा, जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा विचार सक्षमतेने आपल्यामध्ये तरी जोडण्याचा, आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न पडतो. त्यांचे हे विचार पारंपरिक हिंदुधर्मनियमांच्याही पलीकडे मानवाला आणि हिंदुंना नेणारे आहेत. पारंपरिक श्रद्धेतून विज्ञाननिष्ठ- तर्कनिष्ठत्व विचारसरणीकडे माणसाला नेऊ पाहातात. ते हिंदुस्थानातील कितींना झेपले आहे, उमगले आहे, यातच सावरकर यांच्या बुद्धिवादाचे आकलन झाले असे म्हणता येऊ शकेल.

(क्रमश:)

- शल्य बोचरे

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...